Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सेवानिवृत्तीनंतर आंतर-राष्ट्रीय क्षेत्रात खेळाडू घडवायच्या ध्येयाने झपाटलेल्या भीष्मराज बाम यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील भीष्माचार्य हरपला आहे. 1 ऑक्टोबर 1938 रोजी हैद्राबाद येथे जन्मलेल्या भीष्मराज बाम यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. पोलीस खात्यात सेवा करताना, त्यांनी अनेक पेच प्रसंगाच्या घटना आपल्या लोभस स्वभावाच्या बळावर, सामाजिक तणाव दूर करायचे कार्य केले.

Saturday, May 27, 2017 AT 11:30 AM (IST)

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंहराव यांच्यासह जगातल्या अनेक दिग्गज राजकारण्यांचे निकटवर्ती असलेल्या तांत्रिक चंद्रास्वामी यांचे निधन झाल्याने, राजकारणातल्या ज्येष्ठ नेत्यांवर प्रभाव गाजवणारा बुवा काळाच्या पडद्याआड गेला आहे. चंद्रास्वामी यांचे मूळ नाव नेमिचंद होते. योगविद्या आणि ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

Friday, May 26, 2017 AT 11:29 AM (IST)

अध्यात्माच्या गोंडस नावाखाली महिला-युवतींवर तथाकथित साधू-संन्याशांकडून बलात्कार झाल्याची काही प्रकरणे उघडकीस आली आणि गाजली आहेत. एका युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपा-वरून आसारामबापू तुरुंगात आहेत, तर कर्नाटकातल्या स्वामी नित्यानंदचे लैंगिक चाळेही चव्हाट्यावर आले होते. अशाच एका 54 वर्षे वयाच्या साधूला जन्माची अद्दल शिकवायचे धाडस करणार्‍या युवतीची जाहीर प्रशंसा केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे.

Thursday, May 25, 2017 AT 11:49 AM (IST)

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर, सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा सांगितल्याने, पक्षांतर्गत संघर्षात त्यांची हकालपट्टी झाली. जयललितांच्या विश्‍वासू सहकारी शशिकला यांनी या पदावर पलानीस्वामी यांची निवड केली. नंतर मुख्यमंत्रिपद स्वत:च स्वीकारायची तयारी केली.

Wednesday, May 24, 2017 AT 11:36 AM (IST)

  गुजरातमधील काही माणसे शहीद झाली आहेत पण खूप मोठ्या प्रमाणावर नाहीत. याचे सरळ सरळ कारण हे आहे की देशातील इतर ठिकाणांहून जशी माणसे सैन्यात भरती होतात तितक्या प्रमाणात गुजरातमधून होत नाहीत. गेल्या आठवड्यात ‘गुजराती लोकांमध्ये हुतात्मे आहेत का?’ असा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्रश्‍न विचारला होता.

Monday, May 22, 2017 AT 11:37 AM (IST)

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, हरिभाऊ पाटसकर, काकासाहेब गाडगीळ, डॉ. वसंत गोवारीकर अशा विद्वतजनांनी भूषवलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपती डॉ. नितीन करमळकर यांची झालेली नियुक्ती म्हणजे, विद्यादानाचा वारसा निष्ठेने जपणार्‍या शिक्षकाचाच सन्मान होय. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून ते या पदाची सुत्रे स्वीकारतील. अणुशास्त्रज्ञ डॉ.

Friday, May 19, 2017 AT 11:29 AM (IST)

आपल्या नातेवाईकाच्या विवाहासाठी रजेवर आलेल्या लेफ्टनंट उमर फय्याज यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून निर्घृण खून केल्याच्या घटनेने काश्मीर खोर्‍यातील दहशत-वाद्यांच्या क्रौर्याने कळस गाठला. लष्करात भरती झाल्याबद्दल आपण त्यांना देहदंडाची शिक्षा दिल्याचे दहशतवाद्यांनी सांगितले होते. लष्कर आणि पोलीस खात्यात भरती होणार्‍या काश्मीरी युवकांना अशीच शिक्षा केली जाईल, अशा धमक्या दहशतवाद्यांच्याकडून सातत्याने दिल्या जात आहेत.

Thursday, May 18, 2017 AT 11:33 AM (IST)

केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या डाव्या आघाडीचे, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दोन वर्षात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर सुरु झालेले वाढते हल्ले आणि खुनांच्या घटना रोखले जात नसल्याने, या राजकीय हिंसा-चारामुळे कन्नूर जिल्ह्यातील शांतता आणि कायदा सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात आली आहे.

Wednesday, May 17, 2017 AT 11:26 AM (IST)

संयुक्त राष्ट्र संघाने यापूर्वीच दहशतवादी घोषित  आणि अमेरिकेने त्याला पकडण्यासाठी दहा लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केलेला मुंबईवरच्या भीषण हल्ल्याचा सूत्रधार ‘जमात-उल-दावा’चा म्होरक्या हाफिज सईद आणि त्याचे सहकारी ‘जिहाद’च्या नावाखाली दहशतवाद पसरवत असल्याची पाकिस्तान सरकारने जाहीरपणे दिलेल्या कबुलीने, धर्मांध दहशतवाद पाकिस्तानी लष्करच पोसत असल्याचे उघड झाले आहे.

Tuesday, May 16, 2017 AT 11:38 AM (IST)

गेल्या काही वर्षात सातारा शहरातील दुचाक्यांची (स्कूटर्स-मोटरसायकलींची) संख्या प्रचंड वाढली. राजपथ वगळता शहरातील वर्दळीचे अन्य रस्ते अरुंदच असल्याने, वाहनांच्या प्रचंड गर्दीतून वाट काढत जाणे पायी जाणार्‍यांना अवघड तर झाले आहे. पण, सुसाट वेगाने वेडीवाकडी वळणे घेत, भर गर्दीतून दुचाक्या चालवणार्‍या युवकांच्या वाढत्या वेडामुळे शहराच्या विविध भागात रोज अपघात होतात.

Monday, May 15, 2017 AT 11:32 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: