Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  विभागीय वार्ता

5कराड, दि. 16 : तक्रारदाराच्या मुलावर चालू असलेल्या केसमधील जामीनदाराला मदत करण्यासाठी आणि नोटीस न काढण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेताना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील वरिष्ठ लिपिक संदीप दिगंबर पुजारी याला रंगेहाथ पकडण्यात आले.

Saturday, March 17, 2018 AT 11:02 AM (IST)

5वाई, दि. 16 ः यशवंतनगर (वाई) येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी बारा तोळे सोने व 90 हजाराची रोकड मिळून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद सीताराम दिनकर आमराळे (रा. सिद्धेश्‍वर प्लाझा, यशवंतनगर) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आमराळे हे कुटुंबासह शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता वाघजाईवाडी (ता. वाई) या आपल्या मूळ गावी हळदीकुंकू कार्यक्रमाला गेले होते.

Saturday, March 17, 2018 AT 10:56 AM (IST)

व्यवसाय अडचणीत आल्याचीफेसबुकला पोस्ट व्हायरल 5कराड, दि. 16 : कोपर्डे हवेली, ता. कराड येथील सराफ व्यापारी राहुल फाळके या युवकाने फेसबुकला पोस्ट टाकून शुक्रवारी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दुपारी 1 च्या सुमारास कोपर्डे हवेली येथे घडली. जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यवसाय बंद पडल्याने आत्महत्या करत असल्याची पोस्ट त्याने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवरून व्हायरल केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Saturday, March 17, 2018 AT 10:55 AM (IST)

5फलटण, दि. 16 : विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांचा 69 वा वाढदिवस विविध कार्यक्रम, उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे व शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी दिली. वाढदिवसानिमित्त उद्या, दि. 17 व रविवार, दि.

Saturday, March 17, 2018 AT 10:53 AM (IST)

पाचगणीतील घटना मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी 5पाचगणी, दि. 15 ः पाचगणी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दोन मुलांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. विराज विजय सपकाळ (वय 9) व यश विजय खुडे (वय 4, दोघे रा. भीमनगर, पाचगणी) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेने पाचगणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नगरपालिका शाळा क्र. 2 समोर गुरुवारी सायंकाळी 5.

Friday, March 16, 2018 AT 12:00 PM (IST)

5वडूज, दि. 15 : वडूज येथील तडीपार गुंड जयवंत बजरंग जाधव याने पोलिसांना धक्का देऊन पलायन केले आहे. या प्रकरणी त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, वडूज पोलीस ठाण्याचे कर्मचारी बसस्थानकावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करत असताना हद्दपार असलेला जयवंत जाधव हा मोटरसायकलवर आढळला. कॉन्स्टेबल महेंद्र खाडे यांनी त्याच्याकडे हद्दपार असताना कोणाच्या पूर्वपरवानगीने आला, अशी विचारणा केली.

Friday, March 16, 2018 AT 11:56 AM (IST)

5मेढा, दि. 15 : जावली तालुक्यातील एका 14 वर्षीय बालिकेवर सतत दोन वर्षे अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सागर किसन पार्टे (वय 28, रा. आसणी, ता. जावली) या नराधमावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मेढा परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित सागर पार्टे याने 2015 पासून पीडित बालिकेला नग्नावस्थेतील फोटो दाखवून लैंगिक शोषण केले.

Friday, March 16, 2018 AT 11:55 AM (IST)

5कराड, दि. 15 : फसवून जमीन विकल्या प्रकरणी खाजगी सावकार सुनील निवृत्ती पाटील (रा. नांदगाव, ता. कराड) याच्यावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  सरिता हणमंत खराडे (वय 31, रा. जिंती, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी, फिर्यादी सरिता यांचे पती हणमंत खराडे यांनी त्याच्या आईच्या आजारपणासाठी सुनील पाटील याच्याकडून 30 हजार रुपये 15 टक्के व्याजाने घेतले होते.

Friday, March 16, 2018 AT 11:39 AM (IST)

आणखी काही संशयितांच्या सहभागाची शक्यता 5कराड, दि. 15 : कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहनकराच्या 8 पावती पुस्तकांच्या चोरी प्रकरणी कराड शहर पोलिसांनी कसून तपास करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी शैलेंद्र सदानंद नकाते (वय 29, रा. मंगळवार पेठ, कराड) व प्रवीण प्रल्हाद साळुंखे उर्फ पप्पू परीट (वय 31, रा. कोडोली, ता.कराड) यांना अटक केली आहे. त्यांनी पुस्तके चोरल्याची कबुली दिली आहे.

Friday, March 16, 2018 AT 11:38 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: