Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ज्याला सुशीलता म्हणतात, जी शांतीची अवस्था आहे, ज्यामध्ये कोणतीही बाब मनुष्याच्या शांत अवस्थेत घालवू शकत नाही. त्या अवस्थेसंबंधी येथे संत दर्शनसिंहजी महाराज आम्हाला समजावून सांगत आहेत, की आम्ही अशा प्रकारचे जीवन व्यतीत केले पाहिजे आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आम्ही नम्रतेने वागू. कारण की जे निगर्वी जीवन आहे ते परमात्म्यास आवडते. संत कृपालसिंहजी महाराज हुजुरांच्या सत्संगामध्ये कधीही पुढे बसत नसत, ते मागे बसत असत.

Wednesday, May 16, 2012 AT 11:14 PM (IST)

कबीर साहेब सांगताहेत- ""नाम सत जग झूठ है सुरत शब्द पहचान।' की सत्य काय आहे, ते आम्ही या देहात जाणू शकतो. आम्ही जाणू शकतो, की कुठल्या प्रकारचा मार्ग आम्ही आपलासा करावा आणि खोटे काय आहे, बेगडी काय आहे. त्यापासून आम्ही दूर होऊ शकतो. सत्यास असत्यापासून वेगळे करू शकतो, जसे हंसामध्ये हा खास गुण असतो, की दूध आणि पाण्याला तो वेगळे करतो. दूध पिऊन घेतो, पाणी वेगळे करतो.

Wednesday, May 16, 2012 AT 12:26 AM (IST)

करोडो लोक आहेत जे जगात येतात. त्यांच्यातील किती लोक आहेत जे आध्यात्मिकतेकडे जातात? अंधाऱ्या रात्रीत माणूस जगतो. त्याचे जीवनाची संध्या होत आहे आणि त्यात रंगच रंग आले. सुगंधच सुगंध आला. त्याच्या जीवनात आनंद आला आणि त्याचे जीवन प्रेमाने ओतप्रोत भरले गेले.

Tuesday, May 15, 2012 AT 12:16 AM (IST)

जेव्हा आम्ही मनापासून वेगळे होतो आणि जेव्हा आम्ही पिंड, अंड, ब्रह्मांड व पारब्रह्मापलीकडे जातो तेव्हा आम्ही मनाच्या कक्षेपासून दूर निघून जातो. दयाल देशात पोहोचतो. तेव्हा पहिल्यांदा आम्हाला असे ज्ञान होते, की आम्ही चेतन आहोत. तेव्हाच मनुष्यास चिरकाल आनंदाची प्राप्ती होते तेव्हा हे जे दोन शेर आहेत याद्वारे महाराजजी आम्हाला समजावित आहेत, की दु:खाला आम्ही घाबरू नये. आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, की आनंद/सुख आम्हाला कसे मिळू शकते.

Monday, May 14, 2012 AT 01:22 AM (IST)

  आम्हाला चवथ्या पदावर जावयाचे आहे. चार अवस्था कोणकोणत्या आहेत? एक झोपेची अवस्था (सुषुप्ती अवस्था),दुसरी स्वप्नांची अवस्था (स्वप्नावस्था), तिसरी जागेपणीची अवस्था (जागृती अवस्था) व चौथी अवस्था म्हणजे तुरिया अवस्था (उन्मनी अवस्था) होय. येेथे चवथ्या पदावर जावयाचा उल्लेख आहे, तो तुरिया अवस्थेबाबत आहे. जेथे आमचा आत्मा अमृतसरोवरात स्नान करून निघतो आणि काळाच्या प्रदेशाबाहेर पडून तो दयाळ देशात पोहोचतो. अशा या अवस्थेचे वर्णन केले आहे.

Sunday, May 13, 2012 AT 01:37 AM (IST)

दोन बेडकांची आपसात मैत्री होती. त्यातील एक एका तळ्यात राहत होते आणि दुसरा एका रस्त्याकडेला असणाऱ्या डबक्यात राहत होता. अधून-मधून ते एकमेकांना भेटत, एकमेकांची विचारपूस करीत असत. तळ्यातला बेडूक आपल्या मित्राला नेहमी म्हणायचा, "गड्या! सडकेजवळ राहणे धोक्याचे आहे. तू माझ्याकडे राहायला ये. आमच्या तळ्यात खाण्यापिण्याची चंगळ आहे आणि धोका म्हटला तर कोणताच नाही. विचार कर. आपण एकत्र राहण्याने मजा येईल.

Saturday, May 12, 2012 AT 01:24 AM (IST)

मोहब्बत रौनके दुनिया ए सोजो साज होती है। मोहब्बत दो दिलों की एक ही आवाज होती है।। जे सुख-दु:ख येतील त्यातून आम्हा प्रत्येकाला जायचे आहे. परंतु आमचा जो आत्मा आहे त्याचे परमात्म्याशी प्रेम होते तेव्हा त्या दोन अंत:करणाची एकच पुकार निघते. एका ध्वनी बरोबर आमचा आत्मा जोडला जातो. तो ध्वनी नाद आम्ही ऐकला पाहिजे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे तो रोमारोमात भिनला पाहिजे. जोपर्यंत त्या ध्वनीबरोबर जोडला जात नाही तोपर्यंत एकता होऊ शकत नाही.

Saturday, May 12, 2012 AT 01:24 AM (IST)

  आपले कुटुंबीय आपला हुकूम मानत नसले तर आपला राग (संताप) वाढतो. जर आमच्या इच्छेप्रमाणे दुसरे लोक वागले नाहीत तर आमचा क्रोध (संताप) वाढतो. पण येथे तर प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी आहे. प्रत्येकाचा पहाण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणूनच मतभेद होतात. त्यामागे इच्छा हीच प्रमुख समस्या असते. आमची इच्छा पूर्ण झाली नाही, की आम्हाला राग येतो.

Friday, May 11, 2012 AT 01:17 AM (IST)

महापुरुषांच्या जीवनातून आम्हास फार काही शिकावयास मिळते. एक फकीर होता. तो प्रभूच्याजवळ पोहोचला. प्रभूकडे त्याने फिर्याद केली, की आपला जो सर्वाहून मोठा प्रेमी आहे मी त्यास भेटू इच्छितो. कारण, की तो स्वत: प्रभूचा सर्वात मोठा प्रेमी होऊ इच्छित होता. त्याला वाटले चला पाहू तर प्रभूचा सर्वाहून मोठा, सर्वाहून चांगला प्रेमी कोण आहे? आणि तसेच मी माझे जीवन बनवील. तेव्हा प्रभूने त्याला एका पक्ष्यास भेटण्यास्तव पाठविले, की हा माझा सर्वाहून मोठा प्रेमी आहे.

Wednesday, May 09, 2012 AT 11:24 PM (IST)

किसी पर जान देना मकसदे हस्ती समझते है। न हमसे पूछिये हम जिन्दगी का राज क्या जाने।। जर आम्हाला जीवनाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल, नेहमीसाठी मिळणाऱ्या आनंदाचे रहस्य जाणायचे असेल तर आम्ही बलिदान समजून घेतले पाहिजे.

Wednesday, May 09, 2012 AT 01:33 AM (IST)

© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: