Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  स्थानिक वार्ता

सातारा, दि. 16 : सातारा जिल्ह्यातील पदवीधर प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख, शिक्षण सेवक, उपशिक्षक, अपंग शिक्षक यांच्या बढती बदलीसह सेवाविषयक आर्थिक प्रलंबित प्रश्न 30 जून पूर्वी सोडवणार, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती संजय देसाई यांनी दिली. सातारा जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेच्यावतीने आयोजित समस्या निवारण बैठकीत सत्काराला उत्तर देताना दिली.

Thursday, May 17, 2012 AT 12:32 AM (IST)

सातारा, दि.16 : तारळी विस्थापित पुनर्विकास सहकारी मच्छिमारी संस्थेच्या पाठीशी उभे राहणार, अशी ग्वाही आ. विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. सावरघर येथे केंद्र शासनच्या नॅशनल मिशन फॉर पोट्रीन सप्लिमेंटस व राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत नॅशनल फिशरीज ऑर्गनायझेशनद्वारा पाटण तालुक्यातील तारळी जलाशयावर तारळी विस्थापित पुनर्विकास सहकारी मच्छीमारी संस्थेच्या "केज फर्मिंग पथदर्शक प्रकल्पास आ. विक्रमसिंह पाटणकर यांच्या प्रयत्नातून मान्यता मिळाली आहे.

Thursday, May 17, 2012 AT 12:29 AM (IST)

सातारा, दि. 16 : पुणेस्थित बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फौंडेशनतर्फे पर्यावरण रक्षणाची आवड असणाऱ्या रजिस्टर्ड स्वयंसेवा संस्था, शैक्षणिक संस्था व सरकारी खात्यांसाठी दि. 21 रोजी फौंडेशनच्या डॉ. मणिभाई देसाईनगर, वारजे, पुणे येथे सकाळी 11 ते 1.30 या वेळेत कार्यशाळा घेण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी सौ. सुनीता पाटणे, मो. क्र. 9822662124 यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, May 16, 2012 AT 11:38 PM (IST)

सातारा, दि. 16 : मारिया सेंटर ऑफ आय. टी. इंजिनिअरिंग मॅनेजमेंट या संस्थेतर्फे अल्पसंख्याक ओ. बी. सी. ग्रामीण भागातील व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना व महिलांना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी मारिया सेंटर ऑफ आय. टी. इंजिनिअरिंग मॅनेजमेंट, विमल ऑर्केड, मल्हारपेठ, सातारा. मो.क्र.9764610786 यांच्याशी संपर्क साधावा.

Wednesday, May 16, 2012 AT 11:38 PM (IST)

सातारा, दि. 16 : बदलत्या भौगोलिक परिस्थितीत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध सामाजिक संस्थांना 5001 झाडांची रोपे दान करण्याचा भलरी रोपवाटिकेचा उपक्रम प्रशंसनीय असल्याने राज्यातल्या अन्य रोपवाटिकांनी हा आदर्श घ्यावा, असे आवाहन महिला आणि बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अतित येथे नुकतेच केले. भलरी रोपवाटिकेचे मालक संभाजीराव यादव यांनी 5001 वृक्षदानातील पहिला वृक्ष सरकारच्या प्रतिनिधी म्हणून ना. गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला.

Wednesday, May 16, 2012 AT 11:37 PM (IST)

सातारा, दि. 16 : सप्ततारा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने राबविण्यात येणारे सर्वच उपक्रम कौतुकास्पद आहेत. असेच समाजोपयोगी उपक्रम राबवून मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे उद्‌गार पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. आ. प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच सप्ततारा सांस्कृतिक मंडळ व मित्र समूहाला सदिच्छा भेट देवून मंडळाच्या उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी डॉ.

Wednesday, May 16, 2012 AT 11:36 PM (IST)

सातारा, दि. 16 : इफको व जिल्हा परिषद, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कृषी निविष्ठा गुणनियंत्रण प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सभापती किरण साबळे-पाटील, कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी धुमाळ, कृषी अधिकारी काझी, जिल्हा कृषी अधिकारी बरकुडे व इफकोचे विभागीय प्रबंधक  व्ही. एल. शेंडे यांनी मार्गदर्शन केले.

Wednesday, May 16, 2012 AT 11:36 PM (IST)

सातारा, दि. 16 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूर्वेस असलेल्या  बारा इमाम दर्ग्यात बुधवारी खुलेआम बेकायदेशीर पशुहत्या करण्यात आली. याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. मांढरदेव दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात देवांच्या नावाने होणारी पशुहत्या बंद केली होती.

Wednesday, May 16, 2012 AT 11:32 PM (IST)

सातारा, दि. 15 : सातारा शैक्षणिक आणि सांस्कृतिक सोसायटी व सरस्वती शिक्षण मंडळ यांच्यातर्फे इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकत्याच झालेल्या व्यावसायिक प्रशिक्षण मेळाव्यात 150 मुलींनी जरदोसी, ब्युटीपार्लर, मेहेंदीचे प्रशिक्षण घेतले. मुलींनी व स्त्रियांनी औद्योगिक, व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन संसारास हातभार लावावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन हाजी गुलाबभाई शेख यांनी केले.

Wednesday, May 16, 2012 AT 01:39 AM (IST)

सातारा, दि. 15 : श्रीशनैश्वर देवस्थान, सोळशी यांच्यावतीने देण्यात येणारा "श्रीशनैश्वर कृतज्ञता धर्मरक्षक पुरस्कार' राजस्थान येथील संत प. पू. रत्नदीपक विजयजी तथा अद्‌भूत महाराज यांना घोषित करण्यात आला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येथील महानुभाव मठासमोरील श्री अंबामाता देवालयात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यावेळी सोळशी येथील श्रीशनैश्वर देवस्थानचे मठाधीश प. पू.

Wednesday, May 16, 2012 AT 01:04 AM (IST)

© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: