Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पा-प्रमाणे राज्याचाही अर्थसंकल्प ग्रामीण आणि कृषिविकासाला चालना देणारा आहे.

Saturday, March 25, 2017 AT 11:29 AM (IST)

  केंद्र सरकारने या आठवड्यात दोन महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. पहिला म्हणजे ईपीएफओ योजनेतील जमा निधीपैकी 90 टक्के रक्कम घरखरेदी-साठी वापरता येणार आहे. दुसरा निर्णय आहे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करण्याचा. या दोन्ही निर्णयांमुळे गृहखरेदीला चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Friday, March 24, 2017 AT 11:29 AM (IST)

राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीतील शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी वारंवार पुढे येते. त्या संदर्भात वेळोवेळी निर्णयही घेण्यात आले. परंतु शेतकर्‍यांची अवस्था सुधारली नाही. या पार्श्‍वभूमीवर आता पुन्हा शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. वास्तविक, सिंचन सुविधांवर भर, शेतमालाच्या साठवणुकीची, वाहतुकीची योग्य व्यवस्था तसंच शेतमालाला वाजवी दर हे प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहेत.

Thursday, March 23, 2017 AT 11:17 AM (IST)

सध्याच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरते, असे अनेक तज्ज्ञ सांगत आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची भीती न बाळगता अनेक मध्यमवर्गीयही पुढे येत आहेत. सध्याच्या परिस्थितीत लाभांश देणार्‍या कंपनीत गुंतवणूक करण्याचा सल्ला प्रामुख्याने दिला जात आहे. मात्र एकदा गुंतवणूक केली, की निर्धास्त न राहता वेळोवेळी लाभांशावर लक्ष ठेवले गेले तर आपण अधिक लाभ मिळवू शकतो.

Tuesday, March 21, 2017 AT 11:19 AM (IST)

स्मार्टफोनमुळे झटपट संपर्क साधून जीव वाचवण्यापासून गुन्हे थांबवण्यापर्यंत कामे होतात. परंतु त्यामुळे मोबाईलचे व्यसन जडते आणि आरोग्यविषयक अनेक समस्या उद्भवतात. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर असंख्य जीवजंतू असतात. त्यामुळे आजारांचीही शक्यता वाढते. पुण्यातही यावर संशोधन झाले. त्याचे निष्कर्ष आरोग्याच्या दृष्टीने घातक नसले, तरी मोबाईलचा अतिवापर विविध विकारांना आमंत्रण देणारा आहे.  स्मार्टफोन हा सध्याच्या युगाचा परवलीचा शब्द बनला आहे.

Friday, March 17, 2017 AT 11:18 AM (IST)

महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांची कर्जे माफ करावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने विधानसभेत केलेल्या मागणीला सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनीही पाठिंबा दिल्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. भाजप या प्रश्‍नावर एकाकी पडला आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दणदणीत यशामुळे देशाच्या काही भागात अजूनही मोदी लाटेचा प्रभाव असल्याचे सिद्ध झाले आहे.

Wednesday, March 15, 2017 AT 11:25 AM (IST)

समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांवर घाव घालून सामान्यांना नामस्मरणाचा-पंढरीरायांच्या भक्तीचा सोपा मार्ग सांगणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. तो दिवस म्हणजे (आज) तुकाराम बीज. त्यानिमित्त... वारकरी परंपरेचा कळस झालेल्या, मराठीपणाचा आदर्श असलेल्या तुकारामांनी विठ्ठलाच्या सगुण स्वरूपाचे वर्णन करणार्‍या अभंगाची वाहती गंगा आपल्या तना-मनावर गेली अनेक वर्षे राज्य करीत आहे, या वाहत्या गंगेत आपण न्हाऊन निघत आहोत.

Tuesday, March 14, 2017 AT 11:25 AM (IST)

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांची 12 मार्च 2017 रोजी 104 वी जयंती. गेल्या काही वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिछेहाटीमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य जनतेला स्व. चव्हाण साहेब आज हवे होते, असे लोकांना वाटते देशात आणि आता महाराष्ट्रातहीं काँग्रेस पक्षाची प्रचंड पिछेहाट झाली आहे.

Saturday, March 11, 2017 AT 11:42 AM (IST)

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचे सावत्र बंधू किम जोंग नाम यांची व्हीएक्स हे विषारी द्रव्य देऊन हत्या करण्यात आली. मलेशियाच्या क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तेरा फेब्रुवारीला हा गुन्हा घडला. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून त्यांनी मदत मागण्याआधीच आणि आघाताबाबत काहीही समजण्याआधीच गुन्हेगारांनी त्यांची सफाईदारपणे हत्या केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Friday, March 10, 2017 AT 11:29 AM (IST)

देशात सर्वत्र पिछेहाट होत असलेल्या काँग्रेसला ओडिशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत देखील जबरदस्त फटका बसला आहे.

Thursday, March 09, 2017 AT 11:28 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: