Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  खेळ वार्ता

केकेआरकडून 49 धावांत खुर्दा 5कोलकाता, दि. 23 (वृत्तसंस्था) : धुवाँधार फलंदाज अशी ख्याती असलेला ख्रिस गेल आणि विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, केदार जाधव अशा एकाहून एक सरस फलंदाजांचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा अवघ्या 49 धावांत खुर्दा उडवून गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने महत्त्वपूर्ण विजय मिळवला. या विजयाने केकेआरने आयपीएलच्या दहाव्या मोसमात गुणतक्त्यामध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

Monday, April 24, 2017 AT 11:50 AM (IST)

5राजकोट, दि. 23 (वृत्तसंस्था) : हाशिम आमलाची आणखी एक तडफदार खेळी, कर्णधार ग्लेन मॅक्सवेल व अक्षर पटेल यांची फटकेबाजी आणि गोलंदाजांच्या नियोजनबद्ध मार्‍याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्सवर 26 धावांनी विजय मिळवून आयपीएलच्या गुणतक्त्यात चौथे स्थान मिळवले. दिनेश कार्तिकच्या फटकेबाज अर्धशतकानंतरही गुजरात लायन्सला पंजाबने विजयासाठी दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले.

Monday, April 24, 2017 AT 11:49 AM (IST)

5मुंबई, दि. 20 (वृत्तसंस्था) : हाशिम आमलाची नाबाद शतकी खेळी आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेने 18 चेंडूत ठोकलेल्या 40 धावांच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने विजयासाठी ठेवलेले 199 धावांचे आव्हान लीलया पेलत मुंबई इंडियन्सने आठ गडी आणि तब्बल 27 चेंडू राखून विजय मिळवला. मुंबईकडून सलामीवीर जोस बटलरने 37 चेंडूतच 77 धावांची तर यंदाच्या आयपीएलमध्ये भलत्याच फॉर्मात असलेल्या नितीश राणाने 34 चेंडूतच नाबाद 64 धावा ठोकून मुंबईला विजय मिळवून दिला.

Friday, April 21, 2017 AT 11:34 AM (IST)

5हैद्राबाद, दि. 19 (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने आयपीएलमध्ये पुनरागमन करताना केलेली 89 धावांची तडाखेबंद खेळी आणि त्याला शिखर धवनने 70 धावा करून साथ दिल्यामुळे सनरायझर्स हैद्राबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 15 धावांनी विजय मिळवला. हैद्राबादने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला 5 बाद 176 धावांपर्यंतच मजल मारता आली.

Thursday, April 20, 2017 AT 11:30 AM (IST)

सनरायझर्सचा किंग्ज इलेव्हनवर सनसनाटी विजय 5हैद्राबाद, दि. 17 (वृत्तसंस्थ) : मनन व्होराच्या 50 चेंडूतील 95 धावांच्या खेळीनंतरही भुवनेश्‍वरकुमारच्या स्विंग गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्स हैद्राबादने किंग्ज इलेव्हनवर रंगतदार लढतीत पाच धावांनी विजय मिळवला. सनरायझर्सने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भुवनेश्‍वरच्या स्विंगपुढे किंग्ज इलेव्हन पंजाबची फलंदाजी ढेपाळली.

Tuesday, April 18, 2017 AT 11:12 AM (IST)

मनीष पांडे, युसूफ पठाण यांची फटकेबाजी 5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : मनीष पांडेच्या नाबाद 69 आणि युसूफ पठाणच्या 59 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर त्यांच्या ‘घरच्या’ मैदानावर 6 गडी राखून मात केली. अखेरपर्यंत थरारक ठरलेल्या या सामन्यात कोलकाताने अवघा एक चेंडू राखून विजय मिळवत आयपीएल गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतली.

Tuesday, April 18, 2017 AT 11:09 AM (IST)

रायझिंग पुणे सुपरजायंटस्वर दिमाखदार विजय 5राजकोट, दि. 14 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियन गोलंदाज अँड्र्यू टायची ‘हॅट्ट्रिक’ आणि ड्वेन स्मिथ, ब्रेंडन मॅक्युलम, कर्णधार सुरेश रैना व अ‍ॅरोन फिंच यांच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरात लायन्सने आपल्या ‘घरच्या’ मैदानात रायझिंग पुणे सुपरजायंटस्वर 7 गडी आणि दोन षटके राखून दिमाखदार विजय मिळवला. या विजयामुळे लायन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात आपले गुणांचे खाते उघडले.

Saturday, April 15, 2017 AT 11:34 AM (IST)

पोलार्डच्या तडाख्याने बद्रीची ‘हॅट्ट्रिक’ निष्फळ 5बंगलोर, दि. 14 (वृत्तसंस्था) : विंडीजचा लेगस्पिनर सॅम्युएल बद्रीने यंदाच्या आयपीएलमधील पहिली ‘हॅट्ट्रिक’ घेऊनही विंडीजच्याच कीरॉन पोलार्डच्या तडाखेबाज खेळीमुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरवर त्यांच्या ‘घरच्या’ मैदानावर 4 गडी आणि सात चेंडू राखून मात केली.

Saturday, April 15, 2017 AT 11:33 AM (IST)

5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : उमेश यादवची भेदक गोलंदाजी आणि गौतम गंभीर व सुनील नरीन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर आठ गडी आणि 21 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. उमेश यादवने चार बळी घेत किंग्ज इलेव्हनची फलंदाजी खिळखिळी केली.

Friday, April 14, 2017 AT 11:14 AM (IST)

5मुंबई, दि. 12 (वृत्तसंस्था) : ‘घरच्या‘ मैदानावर सलग दुसरा विजय मिळवून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या मोसमात शानदार कामगिरी केली. हैद्राबाद सनरायझर्सने विजयासाठी दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने चार गडी आणि आठ चेंडू राखून पार केले. कोलकाता नाईट रायडर्सवरील विजयाचा शिल्पकार ठरलेल्या नितीश राणाने याही सामन्यात मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. कृणाल पांड्याने जोरदार फटकेबाजी करून या विजयात सिंहाचा वाटा उचलला.

Thursday, April 13, 2017 AT 11:30 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: