Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 800
रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या अपेक्षांची पूर्तता करेल 5सातारा, दि. 18 : केंद्र शासनाने फायनान्स विभागाचे माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक व राष्ट्रीय कृषी व गामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्यामार्फत ‘आर्थिक समावेशीकरण’ ही योजना कार्यान्वित केली आहे. या प्रयत्नांचाच एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गुणवत्तापूर्वक विकसित केलेली मोबाईल बँकिंग -ढच् व्हॅन आहे. या बँकेने एक प्रकारची फिरती शाखा निर्माण केली असून यामध्ये ग्राहकांना -ढच् मधून तत्काळ पैसे काढता येणार आहे तसेच नवीन खाती उघडून घेतली जाणार आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नाबार्डच्या सर्व योजनांचा लाभ पूर्ण क्षमतेने वेळोवेळी घेतला असून याचा लाभ ग्रामीण जनतेला व गरजूंना दिला आहे. नाबार्डच्या सर्व निकषांची व अपेक्षांची पूर्तता या बँकेने केली असल्याने सातारा जिल्हा बँक ही राज्यात व देशात अग्रगण्य अशी बँक ठरली आहे.
Monday, August 19, 2019 AT 08:48 PM (IST)
मसूर येथील थरारक घटना, सौ. सुवर्णा पवार यांच्या धाडसाचे कौतुक 5मसूर, दि. 18 : मातेने कवेत घेतलेला चिमुकला जीव अचानक ओढ्याच्या जोरदार  प्रवाहात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावणारी माता आणि तिला मानवी साखळी करुन या दोघांनाही जीवदान देणारे नागरिक अशी थरारक घटना नुकतीच मसूर येथे घडली. या घटनेने जगातील कोणत्याही संकटाचा मुकाबला करण्याची ताकद मातृ हृदयात कायम असते हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. बाळाला वाचवण्यासाठी प्रवाहात स्वत:ला झोकून देणारी माता सौ. सुवर्णा पवार आणि तिला वाचवणारे नागरिक यांचे कौतुक होत आहे. या थरारक घटनेबाबत अधिक माहिती अशी, मसूर गावच्या मध्यभागी बाजार पेठेपासून काही अंतरावर ओढा आहे. अतिवृष्टीमुळे ओढ्यास पाणी भरपूर प्रमाणात आहे. ओढ्याच्या पलीकडे जटाशंकर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात जाण्यासाठी पूल आहे. सध्या पुराचे पाणी कमी झाल्याने मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांनी सुरुवात केली आहे. येथील सौ. सुवर्णा पवार या कुटुंबीयांसमवेत मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. परत येत असताना कडेवर असलेला त्यांचा मुलगा राजवर्धन पाणी पाहत असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडला.
Monday, August 19, 2019 AT 08:47 PM (IST)
5बेळगाव, दि. 18 (वृत्तसंस्था) : काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आल्याने त्याचा बदला घेण्यासाठी अतिरेकी कर्नाटकात दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असल्याने सावध राहण्याचा इशारा केंद्रीय गुप्तचर खात्याने दिला. त्यामुळे बंगळुरू, हुबळी, धारवाड, म्हैसूर, मंगलोर, बागलकोट आणि बेळगाव या शहरांमध्ये पोलिसांनी घोषित केलेला हायअलर्ट दुसर्‍या दिवशीही कायम ठेवला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर या सर्व शहरांमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून संवेदनशील आणि अति संवेदनशील भागात विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. साध्या वेशातील पोलीस देखील शहरातील अनेक भागात तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानकांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, बाजारपेठ, विमानतळ, व्यापारी पेठा आदी ठिकाणी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी केले आहे. जनतेने गर्दीच्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे आणि गेल्यास विशेष खबरदारी घ्यावी.
Monday, August 19, 2019 AT 08:45 PM (IST)
स 8 जणांचा मृत्यू स 5 राष्ट्रीय महामार्ग बंद 5हिमाचल प्रदेश, दि. 18 (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ पाठोपाठ आता हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी झाल्याची देखील माहिती आहे. राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आतापर्यंत या पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण वाहून गेले आहेत. राज्यभरातील अनेक ठिकाणचे मार्ग व पूल वाहून गेले असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. पाच राष्ट्रीय महामार्गांसह 300 पेक्षा अधिक रस्ते बंद करण्यात आले आहेत.          येथील बंदला येथे भिंत अंगावर कोसळल्याने आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. तर शिमला येथे भूस्खलनामुळे चार जण दबले गेले आहेत. कुल्लू येथे एक जण वाहून गेला आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवा देखील ठप्प आहे. राज्यभरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Monday, August 19, 2019 AT 08:44 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन तलाकवरून विरोधकांवर टीकस्त्र सोडले. राजकीय फायद्यासाठी आणि मतपेटीच्या राजकारणासाठी काँग्रेसने तीन तलाक रद्द करण्यास विरोध केला. तीन तलाक प्रथा बंद केल्याने मुस्लीम महिलांना त्यांचा हक्कच मिळाला, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, मोदींनी तुष्टीकरणाचे राजकारण संपवले. 16 इस्लामिक देशांनी 1922 ते 1963 पर्यंत वेगवेगळ्या वेळी या कुप्रथेवर बंदी आणली व ती हटवली. मात्र, काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या कुप्रथेस आपल्या देशातून हटवण्यासाठी 56 वर्षे लागली. तीन तलाक रद्द करणे जर इस्लाम विरोधी असेल तर मग इस्लामी राष्ट्रांनी हा निर्णय का घेतला? या निर्णयाचा फायदा केवळ मुस्लीम महिलांनाच होणार आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून केवळ मुस्लीम तुष्टीकरणाचे राजकारण करण्यात आले. या व्होट बँक पॉलिटिक्सला संपवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, की इस्लाम व कुराणनुसार तिहेरी तलाक वैध नाही. त्यामुळे तिहेरी तलाकला बंदी घालण्यात आली. त्यानंतर कायदा संमत करून मोदी सरकारने या वाईट कुप्रथेचा कायमस्वरूपी शेवट केला.
Monday, August 19, 2019 AT 08:42 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: