Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  राष्ट्रीय वार्ता

5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : एमबीबीएस आणि दंतवैद्यक वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी सक्तीच्या असलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी (नीट) देशात 23 नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अहमदनगर या चार ठिकाणी नवी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

Saturday, March 25, 2017 AT 11:17 AM (IST)

आता वॉरंटचा निर्णय लंडनचे न्यायालय घेणार 5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : भारतीय स्टेट बँकेसह समूहातील 19 बँकांची अब्जावधी रुपयांची कर्जे बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेले भारतीय उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतात आणण्याचा मार्ग लवकरच मोकळा होण्याची शक्यता आहे. मल्ल्यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने केलेली विनंती ब्रिटिश सरकारने मान्य केली आहे.

Saturday, March 25, 2017 AT 11:16 AM (IST)

देशातील सर्व विमान कंपन्या एकवटल्या 5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला चप्पलने मारहाण करणारे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांना आता कोणत्याही भारतीय विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. खा.

Saturday, March 25, 2017 AT 11:15 AM (IST)

राज्य सरकारांनी निर्णय घ्यावा : अरुण जेटली 5 नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : देशातील दुष्काळग्रस्त राज्यांमधील शेतकर्‍यांना सार्वत्रिक कर्जमाफी देण्यास केंद्र सरकारने आज स्पष्ट नकार दिला आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी घेण्याचा निर्णय संबंधित राज्यांनी घ्यावा. त्यासाठी राज्य सरकारांनी आपापले स्रोत व संसाधने वापरावीत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

Friday, March 24, 2017 AT 11:21 AM (IST)

भाजप नेत्यांविरुद्ध सीबीआयच्या अपिलावर निर्णय होणार? 5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमाभारती यांच्यावरील आरोप वगळण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने केलेल्या अपिलावर आज होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आता यावरील सुनावणी उद्या (गुरुवार) होणार आहे.

Thursday, March 23, 2017 AT 11:10 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: