Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  प्रमुख वार्ता

5कोल्हापूर, दि. 24 (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या रविवारी येथे झालेल्या पहिल्याच प्रचार सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. देश चालवण्यासाठी 56 पक्ष नव्हे तर 56 इंचांची छाती लागते, असा टोला त्यांनी महाआघाडीला लगावला. 56 पक्ष एकत्र आले आहेत. त्यांची नोंदणी तरी आहे का, असा सवाल त्यांनी केला. 56 पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. भाजप-शिवसेना युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. त्यामुळे ती कधी तुटणार नाही.

Monday, March 25, 2019 AT 11:40 AM (IST)

खा. शरद पवारांचा इशारा 5कराड, दि. 24 : ‘न खाऊंगा, ना खाने दुँगा’ या घोषणेसह सब का साथ, सबका विकास असे आश्‍वासन देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशातील जनतेला फसवले आहे. भ्रष्टाचारावर बोलणार्‍यांचा राफेल गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. हवाई दलाचा पायलट अभिनंदनची सुटका जिनिव्हा कराराप्रमाणे झाली. छप्पन इंचाची छाती असणारे मोदी कुलभूषण जाधवला न सोडवता पुलवामामधील अतिरेक्यांच्या कारवाईनंतर  झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेत आहेत.

Monday, March 25, 2019 AT 11:35 AM (IST)

भाजपची पहिली यादी जाहीर अडवाणींचा पत्ता कट? 5नवी दिल्ली, दि. 21 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अडवाणींचा पत्ता या निवडणुकीत कापल्याचे संकेत मिळत आहेत.

Friday, March 22, 2019 AT 11:02 AM (IST)

5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी जारी केल्यानंतर महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज सादर करण्याची आजपासून सुरुवात झाली. नागपूर येथून एक अपक्ष आणि वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून एक अपक्ष व भारतीय बहुजन आघाडी पक्षाचा एक, अशा तीन उमेदवारांनी पहिल्याच दिवशी अर्ज सादर केले.

Tuesday, March 19, 2019 AT 11:27 AM (IST)

5पणजी, दि. 18 (वृत्तसंस्था) : देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मिरामार बिच येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव उत्पल यांनी चितेला अग्नी दिला. लष्कराच्यावतीने पर्रिकर यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता.

Tuesday, March 19, 2019 AT 11:21 AM (IST)

5वेलिंग्टन, दि. 15 (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या साऊथ आयलँड येथील ख्राइस्टचर्च शहरातील दोन मशिदींमध्ये सोमवारी सकाळी एका गोर्‍या माथेफिरूने केलेल्या बेछूट गोळीबारात 49 जण ठार तर 30 लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत भारतीय वंशाचा एक नागरिक गंभीर जखमी झाला असून 9 नागरिक बेपत्ता आहेत. यापैकी एका मशिदीत बांगलादेशच्या क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू नमाज पढण्यासाठी निघाले होते.

Saturday, March 16, 2019 AT 11:21 AM (IST)

5मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) : हो, नाही करत अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांचा हट्ट पुरवताना त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांची उमेदवारी शुक्रवारी जाहीर केली. राष्ट्रवादीने आणखी पाच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करताना पार्थ पवार यांना मावळमधून तर शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना शिरूरमधून उमेदवारी दिली आहे.

Saturday, March 16, 2019 AT 11:19 AM (IST)

पाच नागरिकांचा मृत्यू तीस जण जखमी 5मुंबई,  दि. 14 (वृत्तसंस्था) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या पादचारी पुलाचा सिमेंटचा भाग गुरुवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास कोसळून येथे पाच जण ठार तर अंदाजे 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये तातडीने दाखल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या उत्तरेकडील भागाला अंजुमन इस्लाम हायस्कूलजवळ बीटी लेनला जोडणारा पादचारी पूल सायंकाळी 7.

Friday, March 15, 2019 AT 11:06 AM (IST)

नगरची उमेदवारी गुलदस्त्यात मावळ, माढ्याचा तिढा कायम 5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसने आज 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे(बारामती), श्री. छ. उदयनराजे भोसले (सातारा), धनंजय महाडिक (कोल्हापूर) यांच्याबरोबर सुनील तटकरे (रायगड) राजेश विटेकर (परभणी), राजेंद्र शिंगणे (बुलढाणा) आदींचा या यादीत समावेश आहे.

Friday, March 15, 2019 AT 11:04 AM (IST)

लोकसभा निवडणुकीच्या कामातून वगळले 5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : दहावी आणि बारावीच्या परीक्षा काळात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी दिल्या जाणार्‍या कामातून वगळण्यात आले आहे. याबाबाबत निवडणूक आयोगाने आज परिपत्रक जारी केले आहे. यामुळे राज्यातील किमान पन्नास हजार शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

Thursday, March 14, 2019 AT 11:31 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: