|
|
|
|
|
|
|
आठ वर्षांपूर्वी उपग्रह मनोरंजन वाहिन्यांवर प्रक्षेपित झालेल्या "रसना' या शीतपेयाच्या जाहिरातीत "आय लव्ह यू रसना' असे बालसुलभ आनंदाने सांगणारी तरुणी सचदेव ही प्रेक्षकांच्या स्मरणातून गेलेली नाही. अभिनेत्री करिश्मा कपूर बरोबर तिने या जाहिरातीत काम केले होते. पण तिचाच अभिनय लोकांच्या लक्षात राहिला. "रसना गर्ल', असाच तिचा लौकिक झाला. त्या प्रेक्षकांच्या आवडत्या  "रसना गर्ल'च्या जीवनाचा अंत मात्र अत्यंत दुर्दैवी आणि अचानक झाला.
Wednesday, May 16, 2012 AT 11:10 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
जगभरातल्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये हमखास मिळणारा पदार्थ म्हणजे "सॅंडविच'! दोन ब्रेडमध्ये टोमॅटो, काकडी, लोणी, चीज आणि अन्य पदार्थ घालून तयार होणाऱ्या पदार्थाला सॅंडविच हे सार्वत्रिक नाव मिळाले आहे. या सॅंडविचचा जन्म इंग्लंडमध्ये 250 वर्षांपूर्वी झाला आणि या पदार्थाच्या नावाचा, हा पदार्थ तयार करायसाठी वापरल्या जाणाऱ्या अन्य पदार्थांचा काहीही संबंध नाही.
Wednesday, May 16, 2012 AT 12:23 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
विदर्भातल्या कापूस उत्पादक कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यायसाठी चार वर्षांपूर्वी साडेतीन हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक सहाय्य केले होते. या निधीतून गरीब आणि आत्महत्त्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दुभती जनावरे, शेती अवजारे, शेतीसाठी पाणी पुरवठ्याच्या योजना पूर्ण कराव्यात, अशी योजना होती.
Tuesday, May 15, 2012 AT 12:09 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कसोटी, एकदिवसीय सामने खेळताना लक्षावधी रुपयांचे मानधन  मिळवलेल्या माजी क्रिकेटपटूंना कोट्यवधी रुपयांच्या पेन्शनचा तोबरा द्यायला, भारतीय  क्रिकेट नियामक मंडळ उतावळे झाले आहे. 2003-04 च्या पूर्वी निवृत्त झालेल्या थोड्या थोडक्या नव्हे, 160 माजी क्रिकेटपटूंवर तब्बल 70 कोटी रुपयांच्या रकमेची खैरात करणारी ही योजना आहे.
Monday, May 14, 2012 AT 01:27 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सदाअत हसन मंटोच्या जन्मशताब्दीनिमित्त भारत आणि पाकिस्तानमध्ये, त्याच्या साहित्य कृतीवर चर्चासत्रे झाली. मंटोचं निधन होवून तब्बल 55 वर्षे झाल्यावरही उर्दू साहित्य क्षेत्रावर त्याची असलेली खोल मुद्रा, त्यानं दिलेल्या योगदानाचा, साहित्यिक, वाचक आणि समीक्षकांना विसर पडलेला नाही. मंटोचे वडील बॅरिस्टर होते. नंतर ते सत्र न्यायाधिशही होते. घरचं वातावरण सुसंस्कृत होतं.
Saturday, May 12, 2012 AT 12:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
दलित आणि दीनदुबळ्यांच्या आपणच एकमेव तारणहार आहोत, अशी प्रतिमा दलित समाजात निर्माण करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावतींचे राजकीय-व्यक्तिगत संपत्तीचे मायाजाल थक्क करून सोडणारे आहे. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी त्यांच्या नेतृत्वाची जडणघडण केली. त्यांच्या त्या अत्यंत विश्वासू सहकारी असल्यामुळेच त्यांनी पक्षाची सुत्रेही मायावतींच्याकडेच दिली.
Friday, May 11, 2012 AT 01:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आणखी काही वर्षांनी मुंबईसह राज्यातल्या, देशातल्या शहरात प्रवासासाठी लोकांना पुन्हा टांग्यांचाच आधार घ्यावा लागेल, असं भाकित ज्योतिषाचं नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. मुजुमदार आणि न्यायमूर्ती रमेश धानुका यांच्या खंडपीठानं केलं आहे. मुंबईतल्या रिक्षावाल्यांच्याकडून प्रवाशांची प्रचंड-मनमानी लूट होते. या रिक्षावाल्यांवर सरकार, परिवहन खात्याचं, पोलिसांचं कसलंही नियंत्रण नसल्याची प्रवाशांची सार्वत्रिक तक्रार आहे.
Wednesday, May 09, 2012 AT 11:21 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
माधुरी दीक्षित. हिंदी चित्रपटसृष्टीतली लोकप्रिय नायिका. आपल्या नृत्यानं आणि अभिनयानं कोट्यवधी प्रेक्षकांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेली तथाकथित सेलिब्रिटी! गेली काही वर्षे आपला नवरा डॉ. श्रीराम नेने बरोबर तिनं अमेरिकेत संसारही थाटला. दोन मुलं झाल्यावर ती पुन्हा अलिकडचं मुंबईत परतली आणि तिचे जुने "धक धक' नखरे सुरु झाले. अफाट लौकिक मिळवलेली ही सुंदरी काही मराठी मातीच्या ओढीनं मुंबईत परतलेली नाही.
Wednesday, May 09, 2012 AT 01:31 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कॉलरा, हिवताप, खोकला, मलेरिया, डेंग्यू हे साथीचे रोग! बहिरेपणा, पोटदुखी, डोके दुखी, गुडघे दुखी, मधुमेह, अतिरक्तदाब हे काही साथीचे रोग नव्हेत. पण यवतमाळ जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातल्या 600 शिक्षकांना बहिरेपणाचा साथीचा रोग झाल्यानं, प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रोग अचानक आणि फक्त शिक्षकांनाच कसा जडला याचं कोडं पडलं आहे.
Monday, May 07, 2012 AT 11:49 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आपल्याला दिव्य शक्ती मिळाल्याचा दावा करीत, आपल्याला पैसे देणाऱ्या भक्तांच्या कोटकल्याणाचा दावा करणाऱ्या निर्मलबाबाच्या ढोंगबाजीचे प्रकरण गाजत असतानाच, आता प्रार्थनेचा घाऊक बाजार मांडून हजारो कोटी रुपये मिळवणाऱ्या पॉल दिनकरन उर्फ पॉलबाबाच्या अध्यात्मिक दुकानदारीचा पंचनामा सुरु झाला आहे.
Monday, May 07, 2012 AT 12:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|