Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एक शिकारी जंगलात शिकारीसाठी गेला होता. त्याच्याबरोबर त्याचा कुञाही होता. फिरता फिरता शिकाऱ्याला एक ससा दिसला. त्याला पाहताच शिकाऱ्याने आपला कुत्रा त्याच्या मागावर सोडला. कुत्र्यानेही सशाचा पाठलाग सुरू केला. पण थोड्याच वेळात कुत्रा परत आला. वाकडे तिकडे पळून मध्येच कुठे झुडपात शिरून सशाने कुत्र्याला गुंगारा दिला होता.

Wednesday, May 16, 2012 AT 11:14 PM (IST)

एकदा एक कावळा समुद्रकिनारीचे कालव्याचे दगड चोचीने आपटून त्यातला कालव्याचा गाभा बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची ही धडपड एक डोमकावळा पहात होता. तो त्या कावळ्याजवळ गेला व म्हणाला, "अरे वेड्या असा इथल्या इथे हा दगड आपटून त्यातले कालव बाहेर पडती का? त्यापेक्षा तू दगड चोचीत धरून उंच उड व खाली टाक म्हणजे खडकावर पडून दगड फुटून त्यातले कालव बाहेर पडतील. त्याप्रमाणे कावळ्याने दगड चोचीत घेतला व उडाला. तो दगड खडकावर टाकी.

Wednesday, May 16, 2012 AT 12:26 AM (IST)

एकदा एका पारध्याने एक कोकीळ व एक पारवा पकडला. कोकिळेचे आपल्याला छानपैकी कालवण होईल असा विचार त्याने केला. दोन्ही पक्ष्यांना घेऊन तो घरी आला. त्याने दोन्ही पक्ष्यांना एका पिंजऱ्यात ठेवले, रात्री जेवणासाठी कालवण करायचे म्हणून पारधीणीने पारव्या ऐवजी कोकिळेला पकडले व तिला कापणार तेवढ्यात ती मंजूळ स्वरात गाऊ लागली. पारधीणीला आपली चूक कळली. तिने पारव्याला कापून त्याचे कालवण बनविले, आपल्या मंजूळ स्वराने आपले प्राण वाचले याचा कोकिळेला आनंद झाला.

Tuesday, May 15, 2012 AT 12:15 AM (IST)

एकदा एक अनुभवी आणि वृध्द गुरु आपल्या शिष्याच्या तक्रारींना कंटाळून गेले होते. एके दिवशी सकाळी त्यांनी त्या शिष्याला थोडे मीठ आणायला सांगितले. तो शिष्य मीठ घेऊन परतला तेव्हा गुरुंनी त्या दु:खी तरुणाला त्यातील मूठभर मीठ एका पाणी भरलेल्या पेल्यात टाकून ते पिण्यास सांगितले. "पाणी चवीला कसे लागले?' गुरुंनी विचारले. "कडू' असे म्हणून शिष्याने ते पाणी थुंकले. गुरुंनी मंद हास्य केलं आणि पुन्हा त्या शिष्याला मूठभर मीठ त्या तळ्यात टाकण्यास सांगितले.

Monday, May 14, 2012 AT 01:21 AM (IST)

बंडोपंत हे अतिशय श्रीमंत गृहस्थ. अविनाश हा त्यांचा एकुलता एक उधळ्या व ऐतखाऊ मुलगा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती त्याने चैनीत व ऐषाआरामात राहून वाटेल तशी उधळायला सुरुवात केली. ही गोष्ट बंडोपंतांचे मित्र भाऊराव यांच्या कानी पडताच ते मुद्दाम अविनाशकडे आले. आपल्या वडिलांचे मित्र आपल्याकडे आले म्हणून त्याने त्यांच्यासाठी पंचपक्वानांचा बेत केला. आलेले पाहुणे जेवणासाठी पाटावर बसले.

Friday, May 11, 2012 AT 01:17 AM (IST)

एका कुत्र्याला वाळलेली भाकरी सापडली. ती दूर कुठे तरी आडोशाला जाऊन खावी म्हणून तोंडात भाकरी धरून तो निघाला. वाटेत एक लहानसा ओढा होता. त्यावर येण्या जाण्यासाठी एक झाडाचे खोड टाकले होते. त्यावरून जाताना कुत्र्याला आपले प्रतिबिंब पाण्यात दिसले. कुत्र्याला वाटले पाण्यातही एक कुत्रा आहे आणि त्याच्या तोंडातही भाकरी आहे. कुत्र्याच्या मनात आले, या पाण्यातल्या कुत्र्याजवळची भाकरी प्रथम लांबवावी. मग सावकाशीने स्वत: जवळची भाकरी खावी.

Wednesday, May 09, 2012 AT 11:25 PM (IST)

सामानाने भरलेली एक बैलगाडी रस्त्याने चालली होती. बरीच मजल मारल्यावर गाडीचे एक चाक कुरकुरू लागले. चाकाची ती कुरकुर ऐकून गाडीवाला त्या कुरकुरणाऱ्या चाकास म्हणाला, "तुम्हा दोन्ही चाकांवर सारखेच वजन असूनही तूच का कुरकुर चालवली आहेस?' त्यावर कुरकुर करीतच ते चाक म्हणाले,"तू वंगण घालताना फक्त त्या दुसऱ्या चाकालाच घातलंस! मालकानं घाई केली म्हणून मला वंगण न घालताच तू गाडी जोडलीस.

Wednesday, May 09, 2012 AT 01:34 AM (IST)

सैन्याच्या अग्रभागी रणशिंगे फुंकणारी काही माणसे असतात. त्यातल्या एकाला शत्रूकडील सैनिकांनी पकडून आपल्या सेनापतीकडे नेले. सेनापतीने त्यास कैदेत टाकण्याचा हुकूम दिला. त्यावर त्या शिंग फुंकणाऱ्याने गयावया करीत म्हटले, "महाराज, माझ्यावर दया करा. मी कोणालाही मारलेले नाही, कोणाला दुखापत केलेली नाही. इतकेच काय, मला शस्त्रदेखील चालवता येत नाही! केवळ हे शिंग फुंकण्यापलीकडे मला काहीच येत नाही. हे शिंग वाजवण्याबद्दल मला कैद करणे, हा माझ्यावर अन्याय आहे.

Monday, May 07, 2012 AT 11:54 PM (IST)

एका कोळ्याने आपले जाळे नदीत टाकले आणि माशांना घाबरवून जाळ्यात आणावे म्हणून एका लांब काठीने तो नदीचे पाणी गढूळ करू लागला. शेजारी काही लोक राहात होते. त्यापैकी एक म्हणाला, "अरे, तू जर अशी पाण्यात खळबळ केलीस तर आमचं पिण्याचं पाण गढूळ होईल ना?' तेव्हा कोळी म्हणाला, मित्रा, मला फक्त एवढंच माहीत आहे, की हे पाणी गढूळ केल्याशिवाय मला मासे मिळणार नाहीत, म्हणून मला हे केलंच पाहिजे'.

Monday, May 07, 2012 AT 12:39 AM (IST)

एका झाडाच्या डोलीत एक घुबड राहत होते. ते घुबड झोपले असता तिथे एक टोळ आला, त्या घुबडाभोवती घिरट्या घालून तो गाऊ लागला. घुबडाची झोप मोडली. त्याने टोळाला गाणे बंद करण्याची विनंती केली. पण टोळाने तिकडे दुर्लक्ष केलेे व  आणखी मोठमोठ्याने गाऊ लागला घुबडाची झोप मोडली. हे पाहून घुबड शांतपणे त्याला म्हणाले "हे गानसम्राटा, तुझ्या गायनकलेची किंमत मला कळली नव्हती, माझ्या जवळ एक अमृताची कुपी आहे. त्यातील अमृत मी तुला देतो, म्हणजे तुला अजून गोड गाता येईल.

Sunday, May 06, 2012 AT 03:18 AM (IST)

© Copyrights 2012 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: