Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबईसह राज्यातल्या 27 महानगरपालिकांच्या हजारो नगरसेवकांच्या मासिक मानधनात तब्बल अडीचपटीने वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने, जनसेवेत गर्क असलेले नगरसेवक खूश होतील. गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. 2008 मध्ये मुंबई महापालिकेच्या आणि 2010 मध्ये अन्य महापालिकांच्या नगरसेवकांच्या मानधनात वाढ झाली. पण, गेल्या सात वर्षात मात्र हे नगरसेवक मानधनाच्या वाढीपासून वंचित राहिले होते.

Monday, July 17, 2017 AT 11:32 AM (IST)

अमरनाथच्या पवित्र गुहेतल्या श्री शंकराचे दर्शन घेऊन अनंतनागहून जम्मूकडे जाणार्‍या यात्रेकरूंच्या बसवर सोमवारी रात्री नरपशू दहशतवाद्यांनी हल्ला चढवून 7 भाविकांचे केलेले हत्याकांड, म्हणजे माणूसकीचाही मुडदा पाडणारे भयानक कृत्य होय. गेली काही वर्षे अमरनाथच्या यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचे भीषण सावट असले, तरीही लष्कर, सीमा सुरक्षादल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे ही यात्रा शांततेत पार पडत होती.

Thursday, July 13, 2017 AT 11:38 AM (IST)

महाराष्ट्रातल्या सर्व म्हणजे 28 हजार 332 ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवडणूक यापुढे थेट जनतेद्वारे करायचा निर्णय राज्य सरकारने राजकीय हितलाभासाठी घेतला असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम गावांच्या विकासावर होणार आहेत. 1958 पूर्वी तेव्हा अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य कायद्यानुसार सरपंचांची निवड थेट जनतेतूनच मतदानाद्वारे होत असे.

Wednesday, July 05, 2017 AT 11:28 AM (IST)

शेतकर्‍यांच्या संपामुळे राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केल्यावर, बारा दिवस उलटल्यावरही या कर्जमाफीच्या आणि तातडीने दहा हजार रुपये कर्ज द्यायच्या नियम आणि अटींचा घोळ  संपला नसल्याने, शेतकर्‍यांची ससेहोलपट मात्र सुरूच आहे. शेतकरी समन्वय समिती आणि सरकारने नेमलेल्या उच्चाधिकार मंत्रिगटात झालेल्या पहिल्या चर्चेच्या वेळी धनदांडग्या आणि श्रीमंत शेतकर्‍यांना ही कर्जमाफी मिळणार नाही, ही सरकारची भूमिका समन्वय समितीने मान्य केली होती.

Friday, June 23, 2017 AT 11:55 AM (IST)

महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना दुधाचा खरेदी दर वाढवून मिळावा, ही संपकरी शेतकर्‍यांची मागणी सरकारने मान्य केल्याने, लाखो शेतकर्‍यांना दुधाला प्रतिलीटर तीन रुपये अधिक मिळणार आहेत. गेली अनेक वर्षे सहकारी आणि खाजगी दूध संस्थांकडून ग्राहकांना विकल्या जाणार्‍या दुधाच्या दरात आणि खरेदीच्या दरात प्रचंड तफावत असल्याने, दुधाची मलई नेमकी कोण खाते यावर वारंवार वादळी चर्चा होते.

Thursday, June 22, 2017 AT 11:28 AM (IST)

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारची कोंडी करायचा विरोधकांचा डाव  या पदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून, भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी अत्यंत धूर्तपणे उधळला आहे.

Wednesday, June 21, 2017 AT 11:44 AM (IST)

सरकारी नोकरीत एकदा चिकटल्यावर निवृत्तीपर्यंत कसलीही काळजी नाही. निवृत्तीनंतर चांगली पेन्शन मिळत असल्याने, सरकारी नोकरी उत्तम, असा समज जुन्या पिढीत होता आणि ते वास्तवही होते. सरकारी नोकरीत कायम झाल्यावर बदली वगळता बहुतांश कर्मचार्‍यांना दरवर्षीची वेतनवाढ आणि महागाई वाढ अद्यापही मिळते आहे. सध्याच्या प्रशासनाच्या नियमानुसार नोकरीला लागल्यावर, पंधरा आणि त्यानंतर पंचवीस वर्षांनी असे दोन वेळा सरकारी कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाते.

Tuesday, June 20, 2017 AT 11:18 AM (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला पक्ष विधानसभेच्या मध्यावधी (मुदतपूर्व) निवडणुकीसाठी सज्ज आहे आणि तशा निवडणुका झाल्यास भारतीय जनता पक्षालाच पूर्ण बहुमत मिळेल, असे वक्तव्य केल्याने, आता नवा कलगीतुरा सुरू झाला आहे. तीन वर्षांपूर्वी भाजपशी युती करून सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी, फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर, सरकारच्या निर्णयावर सातत्याने आक्रमक टीका करत, कलगीतुराचा फड सातत्याने रंगवला.

Saturday, June 17, 2017 AT 11:38 AM (IST)

ग्रेट ब्रिटनची राजधानी लंडनमधल्या भर मध्यवस्तीतली चोवीस मजली उत्तुंग इमारत अग्नीच्या तांडवात पूर्णपणे भस्मसात झाल्याची घटना, जगालाही हादरा देणारी ठरली आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये इमारतींच्या बांधकामांच्या नियमांची अत्यंत कडक अंमलबजावणी केली जाते. उंच इमारतींच्या सुरक्षिततेसाठी आणि संकटकाळात लोकांचे जीवित सुरक्षित रहावे, यासाठीही अशा इमारतीत संकटकालीन मार्ग, अग्निशामक यंत्रणाही असते.

Friday, June 16, 2017 AT 11:24 AM (IST)

महात्मा गांधीजी हे चतुर बनिया होते, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी केल्याने, पुरोगामी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. छत्तीसगड राज्यातल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना शाह यांनी म. गांधीजी हे चतुर बनिया होते, त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करायचा सल्ला दिल्याचा उल्लेख केला.

Wednesday, June 14, 2017 AT 11:37 AM (IST)

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: