Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढवल्या. पक्षाच्या नेत्यांनी लोकप्रिय घोषणा करून सत्ता मिळवली, पण नेमके उलट वागायला सुरुवात केली. आता पक्षांतर्गत संघर्ष विकोपाला गेला असून नेते-कार्यकर्त्यांचे विघटन सुरू आहे. लोकांचा पुरता भ्रमनिरास करणार्‍या या पक्षाचे असे का झाले, याचा विचार करणे आवश्यक आहे अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातून 2012 मध्ये स्थापन झालेल्या आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा वसा घेतलेल्या ‘आप’मुळे देशातील तथाकथित ‘सिव्हिल सोसायटी’चा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ‘आप’ची स्थापना झाली तेव्हा काँग्रेस आणि भाजप या प्रस्थापित पक्षांना हा नवा पक्ष पर्याय देऊ शकेल, असे चित्र उभे राहिले होते. केवळ पक्ष म्हणून हा पर्याय नसून पर्यायी राजकारणाचे एक नवे प्रारूप देण्याचा दावा करत ‘आप’ लोकांसमोर आला होता. आता सारे प्रस्थापित पक्ष आणि त्यांचा भ्रष्टाचार यमुनेत बुडून जाणार, असे स्वप्न देशवासीयांना दाखवण्यात या पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना यश आले होते.
Wednesday, November 22, 2017 AT 09:02 PM (IST)
गेल्या तीन वर्षातील मान्सूनचा आढावा घेतला असता राज्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टीमुळे विविध पिकांचे नुकसान झालेले दिसते., परंतु याबाबत शेतकर्‍यांना सावध करण्याचे प्रयत्न होत नाहीत. शेतीतील खर्च भरमसाट वाढत असताना अशा नैसर्गिक संकटामुळेहातातोंडाशी आलेली पिके जाणे हे गंभीर संकट मानले जात नाही. त्यामुळे केवळ हताश होण्यापलीकडे शेतकर्‍यांच्या हाती काही राहात नाही. या वस्तुस्थितीचा आढावा... शेतकर्‍यांना सातत्याने कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान शेतकर्‍यांसाठी चिंता वाढवणारे ठरते. या वर्षी काही दिवसांच्या ओढीनंतर पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली. त्यामुळे  शेतकरीवर्ग सुखावला. नंतरच्या हंगामातील पिकांच्या दृष्टीने तसेच पाणीपुरवठा योजनांसाठीही हा पाऊस महत्त्वाचा ठरला. मात्र, परतीच्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले. शिवाय हा पाऊस रेंगाळल्याने आणखी किती नुकसान करणार, याची चिंता वाढीस लागली. या पावसाने शेतातील उभ्या पिकांचे, फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे.
Friday, October 27, 2017 AT 09:04 PM (IST)
    एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 प्रवाशांचा बळी गेले, ते रेल्वेच्या बेगुमान, बेशरमाईच्या आणि बेपर्वाईच्या कारभारामुळेच. लोकलच्या प्रवाशांना मूलभूत सुविधा देण्यापेक्षा बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी रुपयांचा खर्च करणार्‍या सरकारलाही प्राधान्य कशाला द्यायचे याचे भान हवे मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी होऊन शुक्रवारी तब्बल 23 लोकांचा बळी गेले. सकाळी गर्दीची वेळ असताना अचानक पावसाची सर आली आणि अत्यंत अरुंद असलेल्या या पुलावरील गर्दी वाढली आणि आणि पूल पडतोय अशी शंका येऊन पळापळ झाली. जीव वाचवण्याच्या भीतीने लोक सैरावैरा धावत सुटले आणि काही क्षणात तेथे तब्बल 23 लोक बळी पडले. मुंबईने अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, मुंबई बुडवणारे प्रलय पाहिले, प्रत्यक्ष अनुभवले आहेत. त्यामुळे मृत्यूचे तांडव त्यांना नवीन नसले तरीही शुक्रवारच्या घटनेने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. कारण हा कुठला नैसर्गिक प्रकोप किंवा दहशतवादी हल्ला नव्हता, तर सकाळ, संध्याकाळ आपण ज्या गर्दीत वावरत असतो त्या गर्दीने घेतलेले हे बळी होते.
Wednesday, October 04, 2017 AT 09:12 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: