Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 1
5मुंबई, दि. 28 (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकून टीम इंडियाने काहीशी प्रतिष्ठा राखल्यानंतर आता एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्‍या ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून डावखुरा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने या संघात पुनरागमन केले आहे. ट्वेंटी-20 साठी 16 सदस्यांच्या या संघाचे नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडे राहणार असून 18 ते 24 फेब्रुवारी दरम्यान ट्वेंटी-20 मालिका खेळवली जाणार आहे. निवड समितीने टी-20 मालिकेसाठी सुरेश रैनाला पुन्हा संघात स्थान दिले असून रैना या संधीचे सोने करणार का, याची उत्सुकता आता चाहत्यांना लागली आहे. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या रैनाने इंग्लंडविरुद्ध गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये शेवटचा टी-20 सामन खेळला होता. जवळपास वर्षभरानंतर त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत रैनाने उत्तर प्रदेश संघाचा कर्णधार म्हणून शेवटच्या काही सामन्यांमध्ये मैदान गाजवले.
Monday, January 29, 2018 AT 09:03 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: