Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 1
5पर्थ, दि. 18 (वृत्तसंस्था) : ’आमच्याकडे चार जलदगती गोलंदाज होते. त्यांच्याकडून चांगली कामगिरी करून घेण्याचे आमचे डावपेच होते, म्हणूनच आम्ही फिरकीपटू रवींद्र जडेजाचा संघात समावेश करण्याचा विचार केला नाही, असे सांगत कर्णधार विराट कोहलीने फिरकीपटूच्या कमतरतेमुळेच भारताला दुसरी कसोटी गमवावी लागल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. पर्थ येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताचा 146 धावांनी पराभव झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. कसोटी मालिकेनेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विराट कोहलीने संघातील फिरकीपटूच्या कमतरतेकडे लक्ष वेधतानाच ऑस्ट्रेलियाच्या संघाचेही कौतुक केले. दुसर्‍या कसोटीत आम्ही काही प्रमाणात चांगला खेळ केला तर काही चुका केल्या. पुढच्या कसोटी सामन्यात चुका टाळण्यावर आमचा भर असेल. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. जिंकण्यासाठीचे लक्ष्य आणखी 30 ते 40 धावांनी कमी असते तर चांगले झाले असते, असे सांगतानाच ऑस्ट्रेलियाच्या टीमने चांगली कामगिरी करून मोठी धावसंख्या उभारली तर भारतीय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.
Wednesday, December 19, 2018 AT 09:03 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: