Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 17
5रांची, दि. 8 (वृत्तसंस्था) : भारताचा माजीकर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रांचीत झालेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात ऑस्टेलियाने भारतावर 32 धावांनी विजय मिळवला. 314 धावांच्या कडव्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 281 धावात आटोपला. कर्णधार विराट कोहलीने 123 धावांची दमदार खेळी केली. मात्र, इतर फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे भारताचा पराभव झाला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतरही भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी राखली आहे. दरम्यान, एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करणार्‍या उस्मान ख्वाजाला सामनावीर घोषित करण्यात आले. 314 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या भारताला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन एक धाव करून बाद झाला. ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 14 धावांवर पायचित झाला. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावत चांगली सुरुवात केली पण तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यानंतर अंबाती रायुडूचा दोन धावांवर त्रिफळा उडाला. कमिन्सने त्याचा अडथळा दूर केला.
Saturday, March 09, 2019 AT 08:55 PM (IST)
5नागपूर, दि. 5 (वृत्तसंस्था) : अत्यंत अटीतटीच्या व शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणार्‍या आजच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला केवळ 242 धावाच करता आल्या. मार्कस स्टॉयनीसचे अर्धशतक (52) आणि पीटर हँड्सकॉम्बची 48 धावांची खेळी मात्र ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. कोहलीचे दमदार शतक आणि बुमराह-विजय शंकरच्या भेदक मार्‍याच्या जोरावर भारताने सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा हा पाचशेवा विजय ठरला आहे. 251 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. चांगली सुरुवात करूनही मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार फिंच अपयशी ठरला. त्याने 53 चेंडूत 37 धावा केल्या. मोठा फटका खेळताना तो पायचीत झाला. कुलदीपने फिंचच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंचनंतर लगेचच सलामीवीर उस्मान ख्वाजा तंबूत परतला. त्याला केदार जाधवने बाद केले. ख्वाजाने 37 चेंडूत 38 धावा फटकावल्या.
Wednesday, March 06, 2019 AT 09:06 PM (IST)
5मुंबई, दि. 15 (वृत्तसंस्था) : माजी कसोटीपटू एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील बीसीसीआयच्या निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या दोन टी-20 सामन्यांची मालिका आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बूमराह आणि के. एल. राहुल या तिघांची संघात वापसी झाली आहे. विशेष म्हणजे दिनेश कार्तिकला एकदिवसीय संघातून वगळण्यात आलं आहे. टी-20 संघात पंजाबचा लेगी मयांक मार्कंडेला संधी देण्यात आली आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी घोषित केलेल्या संघात कर्णधार विराट कोहली, जसप्रीत बूमराह आणि लोकेश राहुल यांची वापसी झाली आहे तर दिनेश कार्तिकला एकदिवसीय संघातून वगळण्यात आले आहे. मात्र, टी-20 संघातील त्याचे स्थान कायम आहे. विशेष म्हणजे युवा खेळाडू मयांक मार्कंडेला टी-20 मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. कुलदीप यादवला टी-20 मध्ये स्थान देण्यात आले नाही. जलदगती गोलंदाज उमेश यादवला टी-20 संघात स्थान मिळाले आहे. टी-20 मध्ये डावखुरा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे.
Saturday, February 16, 2019 AT 09:04 PM (IST)
साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहितेला 5मुंबई, दि. 14 : राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी 2017-18 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार मल्लखांब क्षेत्रात प्रशिक्षण देणारे उदय विश्‍वनाथ देशपांडे यांना घोषित झाला आहे तर शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार सातार्‍याच्या प्रियंका मंगेश मोहिते (गिर्यारोहण) हिला घोषित झाला आहे. या पुरस्कारांमध्ये सातार्‍याचा डंका जोरात वाजला असून प्रियांका मोहितेसह कालिदास लक्ष्मण हिरवे (अ‍ॅथलेटिक्स), राजेंद्र प्रल्हाद शेळके (रोईंग) आणि प्रवीण रमेश जाधव (आर्चरी) यांनाही शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Friday, February 15, 2019 AT 08:50 PM (IST)
5कराड, दि. 11 : वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये  हजारमाची, ता. कराड येथील वेदांतिका पवार हिने रौप्यपदक प्राप्त केले. वेदांतिका पवार ही मुरगूड, ता. कोल्हापूर येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती आखाडा येथे कुस्तीचा सराव करत आहे. तिला कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे, सुखदेव यरुडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल वेदांतिकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
Tuesday, February 12, 2019 AT 08:55 PM (IST)
1 2 3 4
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: