Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 7
5नवारस्ता, दि. 20 : स्टिअरिंग-व्हील लॉक होऊन खाजगी प्रवासी वाहतूक जीप नाल्यात गेल्याने झालेल्या अपघातात दिवशी बुद्रुक, ता. पाटण येथील शशिकला दिनकर थोरात (वय 65) यांचा मृत्यू झाला. दिवशी घाटात डावरी फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, एक खाजगी प्रवासी वाहतूक जीप नवारस्ता येथून ढेबेवाडीकडे गुरुवारी सायंकाळी निघाली होती. ही बस दिवशी घाटातून जात असताना डावरी फाट्याजवळ उतारावर जीपचे स्टिअरिंग अचानक लॉक झाले. त्यामुळे जीप रस्त्याच्या पश्‍चिमेला नाल्यात गेली. त्यावेळी शशिकला थोरात या जीपमधून बाहेर फेकल्या गेल्या. रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांना गंभीर अवस्थेत ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कराड येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
Friday, September 21, 2018 AT 08:49 PM (IST)
5कराड, दि.31: रयत शिक्षण संस्थेची जन्मभूमी असणार्‍या काले (ता.कराड) येथील वसतिगृहाला व महात्मा गांधी विद्यालयाला जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभीच 50 लाख रुपये देण्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील यांनी काले ग्रामस्थांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. काले ग्रामस्थ संस्थेच्या कार्यालयात शाळेच्या इमारतीबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी गेले होते. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. 4 ऑक्टोबर 1919 रोजी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले (ता. कराड) येथील ग्रामस्थांना बरोबर घेऊन रयत शिक्षण संस्थेचे छोटसे रोपटे लावले. याच रोपट्याचा आज शिक्षणक्षेत्रात वटवृक्ष झाला आहे. रयत शिक्षण संस्थेने आशिया खंडात नंबर एकची शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक मिळवला. मात्र 99 वर्षांपूर्वी कर्मवीर अण्णांनी लावलेल्या रोपट्याकडे म्हणजे कालेतील वसतिगृह व विद्यालयाकडे  संस्थेचे दुर्लक्ष होऊ लागल्याचे अनेकवेळा बोलले जात होते. वेळोवेळी काले ग्रामस्थांनी एकत्र येऊन, निधी गोळा करून या वसतिगृहाची व विद्यालयाची  डागडुजी केली होती. मात्र जुन्या इमारतीला किती वेळा डागडुजी करायची हा प्रश्‍न कालेकरांना सतत भेडसावत होता.
Saturday, September 01, 2018 AT 08:51 PM (IST)
5खंडाळा, दि. 31 : प्रेमविवाह केल्याच्या रागातून आणि मालमत्तेच्या लोभापायी जवळे, ता. खंडाळा येथील कुटुंबाला जीवे मारण्याचा कट रचून सुपारी दिल्या प्रकरणी खंडाळा पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता झाली. या प्रकरणी वैशाली संतोष पाटील (वय 34, मूळ रा. जवळे, ता. खंडाळा, सध्या रा. ताथवडे, पुणे) यांनी फिर्याद दिली असून सुनीता पाटील, सुभद्रा पाटील, सुजाता पवार, जीविता पवार, मंगेश पवार व प्रवीण पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैशाली पाटील या पती संतोष व दोन मुलांसह पुणे येथे राहतात. मात्र, प्रेमविवाह केल्याच्या आणि मालमत्तेच्या कारणावरुन त्यांना जवळे येथील कुुटुंबीयांकडून वारंवार त्रास दिला जात होता. त्यांचे फेसबुक अकौंटही हॅक करण्यात आले होते. या कालावधीत वैशाली पाटील यांना मोबाईलवर एक ऑडिओ क्लिप पाठवण्यात आली होती. वैशाली पाटील, त्यांचे पती व दोन मुलांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे संशयितांचे संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये असल्याचे ऐकू येत आहे.
Saturday, September 01, 2018 AT 08:50 PM (IST)
-विजय भागवत 5म्हसवड, दि. 27 : यंदाच्या वर्षी पावसाने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात माण-खटावचा अपवाद वगळता इतर तालुक्यात अतिपावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना भेटण्यासाठी जाणार आहे तर याच्या उलट माण तालुक्याची परिस्थिती आहे. ऐन पावसाळ्यात माणगंगा नदी कोरडी पडली आहे. आंधळी धरणातही पाण्याचा ठणठणाट आहे. इतर तलावात उरमोडीच्या पाण्याचा कृत्रिम साठा आहे. परंतु तोही थोड्या दिवसातच संपुष्टात येणार आहे. ओढे-नाले, बोअर, बंधारे, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे.  पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा  प्रश्‍न बिकट होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी वाढू लागली आहे. गौरी-गणपतीच्या काळात पाऊस पडला नाही तर माणवासीयांवर स्थलांतर करण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सातारा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर केला तर माणच्या शेतकर्‍यांवर अन्याय होणार आहे.
Tuesday, August 28, 2018 AT 08:44 PM (IST)
5वाई, दि. 17 ः धोम धरण 95 टक्के भरल्याने सकाळपासून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीला पुराचे स्वरूप आले आहे. धरणातून 10 हजार क्सुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे येथील प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरले असून मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. हे पाणी पाहण्यासाठी लोकांनी पुलावर एकच गर्दी केली होती. नदीला वाढलेल्या पाण्यामुळे जुना पूल वाहतुकीसाठी  बंद करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून पश्‍चिम भागात सुरू असलेल्या पावसामुळे धोम धरण 95 टक्के भरले आहे. धरणातून सकाळी 3234 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तद्नंतर दुपारी 11 वाजता 4761 क्युसेक्स तर सायंकाळपर्यंत 7000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणामध्ये एकूण 13.04 टीएमसी पाणी साठा असून 6270 क्सुसेक्स पाण्याची आवक सुरू असल्याने धरणातून 7000 क्सुसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. येथील प्रसिद्ध महागणपतीच्या मंदिरात पाणी शिरले आहे.
Saturday, August 18, 2018 AT 09:05 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: