Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 9
5कराड, दि. 24 : कराड-पाटण रोडवर विजयनगर गावच्या हद्दीत दुचाकीची व अन्य एका वाहनाची धडक होवून दुचाकीवरील एक जण पडला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने ठार झाला. ही घटना मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. प्रभाकर ज्ञानू कांबळे (वय 53, रा. सुपने, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी, कराड ते पाटण जाणार्‍या रस्त्यावर विजयनगर येथे पाटणकडे निघालेल्या दुचाकीची व अन्य एका वाहनाची धडक झाली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेले प्रभाकर कांबळे हे खाली पडले. त्याचवेळी पाटणकडून कराडकडे येणार्‍या ट्रकखाली ( एम. एच. 08 डब्लू 8606) खाली ते सापडले आणि ट्रकचे चाक त्यांच्या अंगावरून गेले. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ते मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.   अपघातानंतर दोन्ही वाहनाच्या चालकाने अपघातस्थळावरून वाहनांसह पोबारा केला. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अपघाताचा पंचनामा केला. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली असून हवालदार प्रशांत जाधव तपास करत आहेत.
Wednesday, April 25, 2018 AT 08:26 PM (IST)
5कोरेगाव, दि. 13 : बोधेवाडी, ता. कोरेगाव येथील सार्वजनिक विहिरीवर लोखंडी जाळी बसविण्यासाठी वेल्डिंगचे काम करणार्‍या अभयसिंह मधुकर अवघडे (वय 25, रा. आसरे, ता. कोरेगाव) याचा फळीवरून पाय घसरून विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी रणजितसिंह अवघडे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार शंकर गायकवाड तपास करत आहेत.
Saturday, April 14, 2018 AT 08:38 PM (IST)
पाचगणीतील घटना मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी 5पाचगणी, दि. 15 ः पाचगणी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने दोन मुलांवर जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. विराज विजय सपकाळ (वय 9) व यश विजय खुडे (वय 4, दोघे रा. भीमनगर, पाचगणी) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेने पाचगणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, नगरपालिका शाळा क्र. 2 समोर गुरुवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास विराज व यश हे खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दोघांनी घाबरून आरडाओरड केल्याने समोर असलेल्या पालिका कर्मचार्‍यांनी रस्त्यावर धाव घेतली. तोपर्यंत कुत्र्याने यश खुडेला तोंडावर, पाठीवर चावे घेऊन गंभीर जखमी केले होते. विराज सपकाळ याच्या मांडीला व पाठीला चावा घेऊन जखमी केले. या घटनेची माहिती भीमनगर परिसरातील नागरिकांना समजताच संतप्त जमावाने पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला ठार मारले. जखमी मुलांना उपचारासाठी पाचगणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले.
Friday, March 16, 2018 AT 09:30 PM (IST)
औंधमधील युवक व ग्रामस्थांनी जपली माणुसकी 5औंध, दि. 6 : गेल्या महिन्यात दि. 12 जानेवारी रोजी औंधचे कुस्ती मैदान संपवून कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलाकडे निघालेल्या पाच पैलवानांवर भीषण अपघातात काळाने घाला घातल्याने अवघा महाराष्ट्र हादरला होता. या पैलवानांच्या कुटुंबीयांना सावरण्यासाठी सहकार्य करणे, हे आद्यकर्तव्य समजून औंध येथील युवक व ग्रामस्थांनी 15 दिवसांत सुमारे एक लाख 25 हजार रुपयांचा निधी गोळा करून त्यातील एक लाख रुपये चार पैलवानांच्या कुटुंबीयांना आणि उर्वरित 25 हजार रुपये औंध गावचे कोतवाल मनोज भोकरे यांच्या निराधार कुटुंबीयांना देण्यात आले. यातून ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. दि. 12 जानेवारीची रात्र कुंडल येथील क्रांती क्रीडा संकुलातील पाच पैलवांनासाठी काळरात्र ठरली होती. औंध येथील कुस्ती मैदान संपवून काही मित्रमंडळींकडे जेवण केल्यावर हे पैलवान कुंडलकडे परत निघाले होते.
Wednesday, February 07, 2018 AT 08:40 PM (IST)
5पाटण, दि. 2 : स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचा शुभारंभ ग्रंथदिंडीने उत्साहात करण्यात आला. पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांच्या हस्ते या दिंडीची सुरूवात करण्यात आली. स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादप्रमाणे यावर्षीही साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी विविध मान्यवर साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालये, बालवाड्यांचे चित्ररथ, विद्यार्थी, साहित्य प्रेमी यांच्यासह या ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तहसीलदार रामहरी भोसले, पाटणच्या नगराध्यक्षा सौ. सुषमा महाजन, पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्या हस्ते याचा नगरपंचायत कार्यालय प्रांगणात शुभारंभ झाला. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर संयोजक समितीचे सदस्य पत्रकार ए. व्ही. देशपांडे, गणेशचंद्र पिसाळ, करणसिंह पाटणकर, दादासाहेब कदम, राजेंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. फुलराणी बालक मंदिर, कै.
Saturday, February 03, 2018 AT 08:51 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: