Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 41
  5औंध, दि. 14 : येथील मूळपीठ डोंगराच्या पश्‍चिमेकडील शेरीच्या बाजूला लागलेला वणवा युवकांच्या जागृकतेमुळे आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा आगीची झळ डोंगरावरील शेकडो झाडांना बसली असती. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारी साडे बारा ते एकच्या सुमारास मूळपीठ डोंगराच्या पश्‍चिमेकडील बाजूला असणार्‍या शेरी येथील परिसरात वाळके गवत पेटले. आगीचा हा वणवा अचानकपणे वार्‍यामुळे डोंगराच्या दिशेने पसरू लागला होता. परंतु येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान व शिवसंकल्प प्रतिष्ठानचे स्वयंसेवक तसेच गावातील युवा कार्यकर्ते, ग्रामस्थांनी तत्परतेने हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर वणवा आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे डोंगरावरील शेकडो झाडे तसेच आसपासच्या शेतातील पिके ही वाचविण्यात युवकांना यश आले.
Thursday, November 15, 2018 AT 08:50 PM (IST)
5फलटण, दि. 13 : जलयुक्त  शिवारद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी अडविण्यात आले. मोठे जलसाठे निर्माण झाले. मात्र भूजल पातळी वाढली नसल्याने आता त्यासाठी विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे. आपण विधिमंडळाद्वारे हा विषय शासनासमोर ठेवून जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविण्याला व त्याद्वारे भूजल पातळी वाढविण्याला प्राधान्य देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सातारा यांच्याद्वारे जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने जलधर निर्धारण कार्यक्रमांतर्गत मांडवखडक, ता. फलटण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर होते.
Wednesday, November 14, 2018 AT 08:49 PM (IST)
5कराड, दि. 13 : पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन पानी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर छापा मारून जुगार खेळणार्‍या 15 जणांसह रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली मिळून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वारूंजी, ता. कराड येथे घडली.       
Wednesday, November 14, 2018 AT 08:42 PM (IST)
जखमींमध्ये एकाच पेठेतील चार युवक, पहाटेच्या सुमारास अपघात 5कण्हेर, दि.12 : करंजे तर्फ सातारा येथील महासैनिक भवन कार्यालयाजवळ सोमवारी पहाटे 2 च्या सुमारास भरधाव कार (क्र. एम. एच. 11 बीएच  2175) भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. अथर्व संजय भुंजे (वय 21) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. या अपघातात सातार्‍यातील एकाच पेठेतील अन्य 4 युवक गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी पहाटे 2 च्या सुमारास अथर्व संजय भुंजे या युवकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती टीसीपीसी या शासकीय कार्यालयाची भिंत व गेटवर जोरात आदळली.  गाडीचा वेग जास्त असल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. या अपघातातील जखमी पाचही युवक यादोगोपाळ पेठेतील आहेत. या अपघातात सध्या पुणे येथील पीव्हीजी कॉलेजमध्ये शिकत असलेला व आई-वडिलांचा एकुलता एक असलेला मुलगा अथर्व गुंजे जागीच ठार झाला. एक गंभीर व तिघे किरकोळ जखमी आहेत. जखमींची नावे पुढीलप्रमाणे-शुभम मोहन खाडे, तेजस प्रकाश चिपळूणकर (19), ओम दीपक चिपळूणकर (15) व निखिल प्रकाश लोहार (22) अशी  आहेत.
Tuesday, November 13, 2018 AT 09:07 PM (IST)
5भुईंज, दि. 11 : पुणे-बंगलूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर रविवारी वाहतुकीची कोंडी झाली होती. हंगामामुळे तसेच दिवाळीच्या सुट्टीवरून परतीच्या प्रवासाला लागलेल्या पर्यटकांमुळे टोलनाक्यापासून ते गौरीशंकर कॉलेजपर्यंत सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगा महामार्गाबरोबरच सर्व्हिस रस्त्यावर देखील लागल्यामुळे सर्वच मार्ग पुरते जाम झाले होते. दिवाळी सुट्टी संपल्याने व रविवार असल्याने मुंबई-पुणे येथील चाकरमानी परतीच्या मार्गावर लागले असल्याने आज महमार्गावरील आनेवाडी टोल नाक्यापासून साताराकडे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. येथील सर्व्हिस रोडवरदेखील वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या परिसरात असलेल्या आनेवाडी, रायगाव, मर्ढे आदी गावांमधील नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि. बाळासाहेब भरणे व पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. टोल व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनाचा मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
Monday, November 12, 2018 AT 09:17 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: