Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 53
5महाबळेश्‍वर, दि. 23 : महाबळेश्‍वरचा उन्हाळी हंगाम सुरू झाला आहे. महाबळेश्‍वर व पाचगणीकरांची तहान भागविणार्‍या प्रसिद्ध वेण्णा तलावातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती सुरू आहे. दररोज  हजारो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु या समस्येकडे संबंधित खाते गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे सध्या या तलावाची गळती थांबविण्याचे सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचे जाणवते. महाबळेश्‍वर व पाचगणी  या दोन्ही पर्यटनस्थळांना याच वेण्णा तलावातील पाणीसाठ्यातून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो. या तलावाच्या सांडव्याच्या पायातून सध्या मोठ्या प्रमाणावर गळती सुरू  आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ही गळती अशीच कायम राहिल्यास सध्या सुरू असलेल्या उन्हाळी हंगामाच्या ऐन गर्दीच्या वेळी दोन्ही पर्यटनस्थळांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. संबंधित खात्यामार्फत गळती थांबविण्याचे केले जाणारे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.
Tuesday, April 24, 2018 AT 09:01 PM (IST)
5देशमुखनगर, दि. 18 : अपशिंगे-वर्णे रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकी क्रमांक ए. एच.-12 ए. डब्ल्यू 4202 गाडीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दुचाकी चालक संतोष मारुती साळुंखे, वय- 40, रा. गणेशवाडी, ता. सातारा हे जागीच ठार झाले. बामणवाडी गावच्या यात्रेसाठी ते निघाले असताना अपशिंगे-वर्णे रोडवरती वर्णे गावच्या हद्दीत समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या़चा जागीच मृत्यू झाला. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात शिवाजी साळुंखे यांनी निर्याद दिली असून तपास सपोनि. संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली खान करत आहेत.
Thursday, April 19, 2018 AT 08:51 PM (IST)
मणदुरे येथे एकाचा बळी 5पाटण, दि. 17 : पाटणसह मोरगिरी, ढेबेवाडी, कोयना, तारळे, नवारस्ता, मल्हार पेठ, चाफळ परिसराला मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपून काढले तर वादळी वार्‍यामुळे मणदुरे येथे अंगावर घर पडून दीपक पांडुरंग जाधव (वय- 50) हे जागीच ठार झाले. पाटण व अडूळ येथील दोन घरांवरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले आहे. सोमवारच्या तुलनेत आजच्या पावसात वार्‍याचा जोर कमी होता, मात्र पावसापूर्वी काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला आणि त्यानंतर पावसाला सुरवात झाली. दरम्यान कोयना धरण परिसरातही दुपारी चारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तब्बल पाऊण तास धरण परिसराला पावसाने झोडपले. नवारस्ता परिसरात गत आठवड्यात कोसळलेल्या पावसाची सुरवातही गारांनी झाली तर गेल्या सलग दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या या वळिवाची सुरवातही गारांनीच होत आहे. त्यामुळे आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला, की या परिसरातील बालगोपाळांसह नागरिक गारांच्या प्रतीक्षेत असलेचे दिसत आहे. जोरदार पडणार्‍या पावसामुळे  पाटणसह परिसरातील विद्युत पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता.
Wednesday, April 18, 2018 AT 08:46 PM (IST)
5कराड, दि. 16 : ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाल्याची घटना कराडमध्ये सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. नसीमा बालम मुलाणी (वय 55, बुधवार पेठ, दडगे हॉस्पिटल मागे, कराड ) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. विजय दिवस चौकातील सिग्नल सुटल्यानंतर हा अपघात झाला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी दिलेल्या व घटनास्थळावरून  मिळालेल्या माहितीनुसार, सौ. नसीमा मुलाणी या पतीसमवेत दुचाकीवरून मार्केट यार्डकडे निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी विजय दिवस चौकात आली असता स्टेशन रस्त्याकडून एक ट्रक आला. स्टेडियमकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला त्या ट्रकचा धक्का लागून दुचाकी थेट ट्रकखाली आली. त्यात नसीमा बालन मागील चाकाखाली सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यांचे पती बचावले आहेत. अपघातानंतर तेथे गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
Tuesday, April 17, 2018 AT 08:57 PM (IST)
5वाई, दि. 13 ः दत्तनगर (वाई) येथील रवीराज दिलीप शिंदे यांच्या बंद फ्लॅटचे कुलूप भर दुपारी फोडून 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत शिंदे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, दत्तनगर येथील कॅनॉल शेजारील महेंद्र चौधरी यांच्या बिल्डिंगमध्ये रवीराज शिंदे आपल्या कुटुंबीयांसमवेत रहात असून दुपारी 1 च्या सुमारास ते गंगापुरी येथे कुटुंबीयांसमवेत कार्यक्रमासाठी गेले होते. दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान अज्ञाताने फ्लॅटचे कुलूप तोडून 50 हजार रुपये रोख व 8 तोळे सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे 2 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत वाई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब एडगे तपास करत आहेत.
Saturday, April 14, 2018 AT 08:34 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: