Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 61
5फलटण, दि.17 : ट्रॅक्टर मागे घेत असताना ट्रॅक्टरखाली सापडून 13 महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाला. विडणी, ता. फलटण येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.   बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास नाना अभंगवस्ती नजीक, फुले वस्ती, विडणी, ता. फलटण येथील नागेश फुले हे आपला ट्रॅक्टर घेऊन घरातून शेताकडे निघाले होते. त्यांचा अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा अवधूत हा घरातून अचानक बाहेर असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील दिशेने रांगत आला. वडिलांना याची कल्पना नसल्याने तो मागील चाकाखाली सापडला. यातच त्याचा अंत झाला. या घटनेची माहिती मुलाचे वडील नागेश फुले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Thursday, January 18, 2018 AT 08:47 PM (IST)
5पाटण, दि. 16 : कोयना धरण परिसर व पाटणसह कराड, चिपळूण तालुक्यात मंगळवार दि. 16 रोजी दुपारी 1 वाजून 5 मिनिटांनी 3.3 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळेकोयना धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 22.4 किलोमीटर अंतरावर वारणा खोर्‍यातील जावळे गावच्या दक्षिणेला 4 किलोमीटर अंतरावर होता. याची खोली भूगर्भात 9 किलो-मीटर अंतरावर होती. हा भूकंप पाटण, कराड, चिपळूण, अलोरे, कोयना विभागात जाणवला.
Wednesday, January 17, 2018 AT 08:43 PM (IST)
5वडूज, दि. 15 : खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या चार नराधमांना गुरुवार, दि. 18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. मलाबादे यांनी दिले. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी, खटाव तालुक्यातील चार नराधमांनी एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर सलग दोन दिवस अत्याचार केल्याची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांनी संशयितांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता गुरुवार, दि. 18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.      खटाव तालुक्यामधील गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दहिवडी, औंध, म्हसवड, पुसेगाव, वडूज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी हजर होते तर राज्य पोलीस बल गट, स्ट्रायकिंग फोर्स, क्यू आर टी आदी फौज फाटा तैनात करण्यात आलेला होता. त्यामुळे गावात तणावपूर्ण शांतता दिसून येत होती.
Tuesday, January 16, 2018 AT 08:44 PM (IST)
5नीरा, दि. 14 : नीरा, ता. पुरंदर गावाजवळ असलेल्या पिंपरे खुर्द येथील विश्रामगृहाजवळ नीरेहून पुण्याकडे जाणारा टँकर आणि जेजुरीकडून नीरेकडे निघालेला ट्रॅक्टर-ट्रॉली यांची रविवारी रात्री 8 च्या सुमारास धडक होऊन झालेल्या भाषण अपघातात चार ऊसतोडणी मजूर ठार झाले. या अपघातात काही जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये 20 ते 25 ऊसतोडणी मजूर असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. राजगड कारखान्याचे ऊसतोडणी मजूर जेजुरी येथील देवदर्शन उरकून नीरेकडे ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून येत होते. पिंपरे खुर्द येथे आल्यानंतर टँकरने ट्रॅक्टर-ट्रॉलीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर-ट्रॉलीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, प्रिया दिलीप गोसावी (वय 18)  या मजूर युवतीचा जेजुरी ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला असून आनंदी लाइफलाइन या रुग्णालयामध्ये दोन मजुरांचा मृत्यू झाल्याचे समजते. हा अपघात कशामुळे झाला याची नक्की माहिती आणि अपघातातील इतर मृत मजूर व जखमींची नावे मिळू शकली नाहीत. काही जखमींना लोणंद येथील सिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये तर काही जखमींना जेजुरीतील आनंदी लाइफलाइन व ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Monday, January 15, 2018 AT 09:08 PM (IST)
5पाचगणी, दि. 12 : येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत  आदिवासी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, येथील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शासनाच्या आदिवासी प्रकल्पांतर्गत आदिवासी मुले शिकण्यासाठी आहेत.    या शाळेतील चौथीमध्ये शिकणारा राकेश रामा भवर (वय 9), (रा. मणिपूर, पो. गंजाड, ता. डहाणू, जि. पालघर) हा विद्यार्थी आजारी होता. त्याला ताप येत असल्याचे शाळा प्रशासनाच्या लक्षात येताच त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले. परंतु तो उपचाराला साथ देत नसल्याचे लक्षात आल्याने राकेशला पुढील उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी राकेश मृत झाल्याचे घोषित केले.  याबाबत शिक्षक केतन विजय हगवणे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तशी खबर दिली. पाचगणीच्या सपोनि. तृप्ती सोनावणे व त्यांचे सहकारी तपास करत आहेत.
Saturday, January 13, 2018 AT 08:59 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: