Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 81
5कण्हेर, दि. 22 ः कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिन्यापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणात 84.30 टक्के पाणीसाठा झाल्याने रविवारी सकाळी धरणाचे चारही दरवाजे 1 मीटरने उचलून प्रतिसेकंद 3000 क्युसेक्स पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जोर अद्यापही कायम असून कण्हेर धरणात येणार्‍या पाण्याची आवक 3361 क्युसेक्स आहे.      यामुळे धरणातून पाणी सोडले आहे. सकाळी 10 वाजता सायरन वाजवून धरणातून पाणी सोडल्याने वेण्णा नदी दुधडी भरून वाहत आहे. मेढा-महाबळेश्‍वर या भागात होणार्‍या पावसामुळे धरणात दर प्रतिसेकंद 3361 क्युसेक्स पाणी येत आहे. दर तासात धरण पात्रात येणार्‍या पाण्याचे प्रमाण व पडणार्‍या पावसाचा अंदाज घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. आवश्यकतेनुसार जादा किंवा कमी पाणी सोडण्यात येईल. पोलीस व महसूल विभागास सावधानतेबाबत पूर्वसूचना देण्यात आली आहे. यंदा जलाशय परिसरात गेल्या 1 महिन्यापासून 562 मी.मी. इतका पाऊस पडला आहे. सध्या धरणात 243.35 द.ल.घ.मी.
Monday, July 23, 2018 AT 08:38 PM (IST)
5उंडाळे, दि.20: कराड दक्षिणचे गतिमान नेतृत्व, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य  उदयसिंह विलासराव पाटील-उंडाळकर (दादा) यांचा वाढदिवस शनिवार, दि.21 रोजी साधेपणाने साजरा होत आहे. उंडाळे येथे उदयदादा युवा प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उदयसिंह पाटील वाढदिवसादिवशी बाहेरगावी असल्यामुळे ते शुभेच्छा स्वीकारण्यास उपलब्ध नसणार असल्याची माहिती संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
Saturday, July 21, 2018 AT 08:34 PM (IST)
5कराड, दि. 19 : येळगाव, ता. कराड परिसरात सोमवारपासून बुधवारी रात्रीपर्यंत दोन वेळा बिबट्यांचे दर्शन झाले असून परिसरात दोन बिबट्यांच्या वावराची शक्यता आहे. बिबट्याने एका कुत्र्याचा रात्री फडशा पाडला. येळगाव फाट्यावरील वस्तीतील शामराव शेवाळे यांचे कुत्रे सोमवारी (दि. 16) रात्री जोरात भुंकत होते. त्याचा आवाज अचानक बंद झाल्याने शेवाळे बाहेर आले. बॅटरीच्या उजेडात बिबट्याने कुत्र्यावर झडप घातल्याचे त्यांना दिसले. त्यांनी आराडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली. त्यानंतर मंगळवारी रात्री चिंचेच्या झाडाजवळ बोअरिंगशेजारी मंगेश शेवाळे यास दोन बिबट्यांचे दर्शन झाले. बुधवारी रात्रीही शामराव शेवाळे यांचा मुलगा विशाल यास वस्तीच्या परिसरात दोन बिबटे दिसले. त्याने गावातील मित्रांना मोबाईलवर संपर्क साधून माहिती दिली. रविराज शेवाळे, संदीप येळवे व सात-आठ जण गाडीतून फाट्यावर आले. मात्र, त्यांना बिबटे दिसले नाहीत. अर्ध्या-पाऊण तासाने सर्व जण गावात परत निघाले असता एका बाभळीच्या झाडाखाली दोन बिबटे दिसले.                  एक बिबट्या बसला होता तर दुसरा उभा होता.
Friday, July 20, 2018 AT 08:29 PM (IST)
5वाई, दि. 18 : किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडून भुईंज व खंडाळा येथील 2017-18 च्या हंगामातील एफआरपी दराप्रमाणे ऊस पुरवठादारांना देय बाकी असलेली भुईंज येथील उसाची किंमत 71 कोटी 28 लाख 79 हजार तसेच खंडाळा येथील 27 कोटी 46 लाख 81 हजार रक्कम व त्यावर विहित दराने होणार्‍या व्याजाच्या वसुलीसाठी प्रांताधिकारी सौ. अस्मिता मोरे यांनी सोमवारी (दि. 16) नोटीस बजावली. सदर रक्कम पंधरा दिवसांच्या आत शेतकर्‍यांना अदा न केल्यास देय रकमेच्या वसुलीसाठी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला आहे. किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याने शेतकर्‍यांना या गळीत हंगामातील ऊस बिलाची रक्कम न दिल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांच्या शिष्टमंडळाने आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांची भेट घेतली होती. यानंतर साखर आयुक्तांनी कारवाई करून शेतकर्‍यांना पैसे अदा करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले.
Thursday, July 19, 2018 AT 08:39 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यात प्रवेश सातारा जिल्ह्याच्यावतीने भावपूर्ण निरोप 5फलटण, दि. 17 : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळ्याने आज (मंगळवार) सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या आणि ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अलंकापुरीहून 150 कि.मी. अंतर पार करून आलेल्या लाखो वैष्णवांची मांदियाळी अखंड हरिनाम घेत झपझप पावले उचलत असून उद्या, दि. 18 रोजी पुरंदावडेनजीक सोहळ्यातील पहिले गोल रिंगण होणार आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याच्यावतीने माउलींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन खाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी  भगवान पवार, अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख विजय पवार, प्रांताधिकारी संतोष जाधव, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रेरणा कट्टे, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
Wednesday, July 18, 2018 AT 08:25 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: