Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 2
5जम्मू, दि. 4 (वृत्तसंस्था) : मोहम्मद अली जिना यांच्यामुळे भारताची फाळणी झाली नाही. पंडित नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे देशाची फाळणी झाली, असा खळबळजनक आरोप जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केलेे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे खळबळजनक वक्तव्य केले आहे. भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती व्हावी ही मोहम्मद अली जिना यांची भूमिका नव्हती. मुस्लीम, शीख आणि इतर अल्पसंख्याकांना विशेषाधिकार  दिला पाहिजे यासाठी एक समिती स्थापण्यात आली होती. मोहम्मद अली जिना यांनी विशेषाधिकार समितीच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांनी हा विशेषाधिकार दिला नाही. त्यामुळे नाईलाजाने फाळणी करावी लागली, असेही अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, जम्मू यांच्यातर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातही फारूख अब्दुल्ला यांनी हेच वक्तव्य केले. मोहम्मद अली जिना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आग्रही नव्हते.
Monday, March 05, 2018 AT 08:59 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवून शांतता स्थापित करण्यासाठी लष्कराच्या मोहिमा सुरू राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर राजकीय पुढाकारही आवश्यक आहे. सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवण्याची आवश्यकता आहे, असे मत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सशस्त्र दलांच्या सध्याच्या कामगिरीवर बोलताना लष्करप्रमुख रावत म्हणाले, सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराने कारवाई करताना जुन्या डावपेचांवर अवलंबून राहून उपयोग नाही. त्यासाठी नवी रणनीती आणि युद्धनीती विकसीत करण्याची गरज आहे. वर्षभरापूर्वी असलेल्या परिस्थितीत आता थोडा फरक पडला आहे. सीमेवरील घुसखोरी रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवणे गरजेचे आहे. दहशतवाद संपवण्यासाठी लष्कराने आक्रमक व्हायला हवे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यासाठी लष्कराच्या आक्रमक कारवाया सुरुच राहतील. त्याच वेळी तेथील परिस्थिती काबूत आणण्यासाठी राजकीय व इतर तोडगे काढण्याचीही गरज आहे. लष्कर आणि राजकीय नेतृत्वाने हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता आहे.
Monday, January 15, 2018 AT 09:13 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: