Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 1
5कोलकाता, दि. 3 (वृत्तसंस्था) : शारदा घोटाळ्याप्रकरणी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमला पोलिसांनीच ताब्यात घेतले आणि काही काळानंतर सोडून दिले. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला असून त्या विरोधात त्या धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. रोझ व्हॅली आणि शारदा चिटफंड प्रकरणी  चौकशीसाठी सीबीआयने रविवारी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. मात्र, या छापेमारीसाठी आलेल्या सीबीआयच्या पाच अधिकार्‍यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे कोलकात्यात घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, पश्‍चिम बंगालचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच कोलकाताचे महापौर फिरहाद हाकिम यांनी पोलीस आयुक्तांच्या निवासस्थानी भेट दिली. दरम्यान त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, मोदी-शहा हे सुडाचे राजकारण करत आहेत. आपल्याला त्रास देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
Monday, February 04, 2019 AT 08:46 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: