Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 15
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : इंडियन मुजाहिद्दीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अरिज खान उर्फ जुनैद याला दिल्ली पोलिसांनी बुधवारी अटक केली. 2008 पासून फरार असलेला जुनैद बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांना हवा होता. जुनैद उत्तर प्रदेशातील आझमगढ येथील रहिवासी आहे. 19 सप्टेंबर 2008 रोजी जामियानगर परिसरातील बाटला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. त्याला पकडण्यासाठी 15 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या चकमकीत इंडियन मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते तसेच अतिरेक्यांशी लढताना पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा हे शहीद झाले होते.
Thursday, February 15, 2018 AT 08:46 PM (IST)
5लखनौ (उत्तर प्रदेश), दि. 13 (वृत्तसंस्था) : राम मंदिर बनवण्याची शपथ घेऊन अयोध्येतून रामराज्य रथयात्रा मंगळवारी रवाना झाली. 40 दिवसांनंतर रामराज्य रथयात्रा रामेश्‍वरममध्ये पोहोचणार आहे. तेथेच या यात्रेचा समारोप देखील होणार आहे. रामदास मिशनची ही रथयात्रा असल्याचे म्हटले जात असले तरी या यात्रेमागे भाजप, विश्‍व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद एकवटली आहे. या यात्रेच्या रुपाने कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांमधील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून वातावरण तापवण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. अयोध्येच्या कारसेवकपुरममध्ये साधू-संत, भाजप आणि विहिंपचे नेते जमा झाले होते. तेथे भाषणे झाली, पूजा झाली, अयोध्येत राम मंदिर बनवण्याची शपथ घेण्यात आली, ‘जय श्री राम’च्या घोषणा देण्यात आल्या आणि त्यानंतर रामराज्य रथयात्रा अयोध्येतून रामेश्‍वरमसाठी रवाना झाली. महाशिवरात्रीला सुरू झालेल्या या रथयात्रेचा रामनवमीला समारोप होईल. रामदास मिशनचे महामंत्री शक्ती शांतनंद म्हणाले, आता सगळीकडे सरकार केवळ रामभक्तांचेच बनतील. पाहा दिल्लीत (केंद्रात) मोदी तर यूपीत योगी आहेत. आता वेळ बदलत आहे.
Wednesday, February 14, 2018 AT 08:40 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 7 (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी नवे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट 6 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेटही 5.75 टक्क्यांवर जैसे थे ठेवण्यात आला आहे. सलग तिसर्‍यांदा भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि अर्थसंकल्पात केलेल्या अनेक नव्या घोषणांमुळे आरबीआय व्याजदर कमी करेल, अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात होती, पण अखेर बुधवारी आरबीआयने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला नसल्याचे जाहीर केले.  रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह  बँकेकडून अल्प मुदतीची कर्जे घेते तो दर.  रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणार्‍या कर्जदरात वाढ होणे तर रेपो रेट कमी होणे म्हणजे बँकेला स्वस्तात कर्ज मिळणे. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाच्या कर्जाचे दरही वाढवावे लागतात तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
Thursday, February 08, 2018 AT 08:47 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षाच्या वकिलांना ’न्यायालयाचा मच्छीबाजार करू नका’, अशा कडक शब्दात समज देत न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला. वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक न्या. लोया प्रकरणी सुनावणी सुरू असताना उभय पक्षाच्या वकिलांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. ही चकमक सुरू असताना काही क्षणाला दोन्ही वकिलांचे स्वर काहीसे टिपेला पोहोचले. वकिलांच्या आवाजाची पातळी पाहून न्यायालयाने सुरुवातीला सौम्य शब्दात समज दिली. मात्र, तरीही दोन्ही वकिलांचा स्वर वरच्या पट्टीत राहिलेला पाहून न्यायालय संतापले. या प्रकरणातील याचिकाकर्त्यांचे वकील दुष्यंत दवे तसेच आणखी एक याचिकाकर्त्यांचे वकील पल्लव सिसोदिया हे सुनावणी दरम्यान अनेक वेळा उच्च स्वरात वादसंवाद करताना दिसले. त्यावर न्यायाधीशांनी समज दिली. सुनावणी दरम्यान, झालेल्या चर्चेत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नावाचाही उल्लेख झाला.
Wednesday, February 07, 2018 AT 08:35 PM (IST)
शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक 5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक सोमवारी रात्री झाली. या बैठकीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा, राष्ट्रवादीचे तारिक अन्वर, डी. पी. त्रिपाठी, प्रफुल्ल पटेल आदी नेते सहभागी झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात अनौपचारिक चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. मुंबईत संविधान बचाव रॅली काढण्यात आली, त्यावेळी ही बैठक घेण्याचे ठरले होते. संविधान बचाव रॅलीत शरद पवार, शरद यादव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेत्यांनी भाग घेतला होता. यापुढील बैठक सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी होणार आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
Tuesday, January 30, 2018 AT 08:42 PM (IST)
1 2 3
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: