Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 28
सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला 5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : ‘राफेल’ खरेदी करारातील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तब्बल चार तासांच्या सुनावणीत सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राफेल लढाऊ विमानांच्या किमतीचा तपशील याचिकाकर्त्यांना देण्यात येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दसाँ या फ्रेंच कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्याच्या करारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी. या प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) नोंदवावा, अशी मागणी करणार्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा समावेश आहे.
Thursday, November 15, 2018 AT 08:46 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार देतानाच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या 48 फेरविचार याचिकांवर पुढील वर्षी 22 जानेवारीला सुनावणी घेण्यास मान्यता दिली. ही सुनावणी खुल्या न्यायालयात होणार आहे. शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकांची सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने आपल्या चेंबरमध्ये तपासणी केली. अशा प्रकारच्या सुनावणीत वकिलांना उपस्थित राहू दिले जात नाही. खंडपीठाचे सर्व न्यायाधीश पुनर्विचार याचिकांची तपासणी करतात. पुनर्विचार याचिकांवर सुनावणी घेण्यास मान्यता देतानाच शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबतच्या आधीच्या निर्णयाला मात्र न्यायालयाने स्थगिती दिली नाही. सर्व फेरविचार याचिकांवर आणि अन्य अर्जांवर 22 जानेवारी 2019 रोजी खुल्या न्यायालयात सुनावणी होईल.
Wednesday, November 14, 2018 AT 08:34 PM (IST)
5उत्तरप्रदेश, दि. 6 (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अजून एका जागेचे नाव बदलले आहे. योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामांतर अयोध्या असे केले आहे.  अयोध्येमध्ये दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्रमास दक्षिण कोरियाच्या प्रथम नागरिक किम जुंग सूक या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी अजून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार असून त्याला राजा दशरथ यांचे नाव देण्यात येणार आहे. तसेच एक विमानतळ उभारण्यात येणार आहे. त्याला प्रभू श्री रामाचे नाव देणार आहे.
Wednesday, November 07, 2018 AT 08:43 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 4 (वृत्तसंस्था) : गेल्या दोन वर्षांत 13 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवड्यातील ‘टी-1’ या पाच वर्षांच्या वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. मात्र, या वाघिणीच्या मृत्यूवरुन आरोपांची मालिका सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रचंड संताप व्यक्त करत वाघिणीची ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. एकापाठोपाठ एक असे सलग ट्विट करत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन खात्याला फैलावर घेतले आहे. वाघिणीचे मृत्यू प्रकरण आपण गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना म्हटले आहे. वाघिणीवर गोळी झाडणार्‍या नवाब शराफतअली खान याच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. वाघिणीची हत्या हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले. असे करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. आतापर्यंत त्यांनी तीन वाघ, शेकडो बिबटे आणि वन्य जीवांची हत्या केली आहे.
Monday, November 05, 2018 AT 09:22 PM (IST)
एअरसेल-मॅक्सिस प्रकरण 5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : एअरसेल-मॅक्सिस करारात झालेल्या पैशांच्या अफरातफरी (मनी लाँड्रिंग) प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीन अर्जास अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज विशेष न्यायालयात विरोध केला. या प्रकरणाच्या तपासात चिदंबरम यांची चौकशी करण्यासाठी त्यांच्या कोठडीची मागणी ‘ईडी’ने केली. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी पी. चिदंबरम यांनी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज ‘ईडी’ने आपले म्हणणे नोंदवले. ‘ईडी’ने चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास स्पष्ट शब्दांत विरोध केला. चिदंबरम हे चौकशीत सहकार्य करत  नसल्याने त्यांना कोठडीत घेऊन चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना कोठडी द्यावी, अशी मागणी ‘ईडी’ने केली. यावर विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या न्यायालयात उद्या (गुरुवार) सुनावणी होणार आहे. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती यांना 1 नोव्हेंबरपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश न्यायालयाने 8 ऑक्टोबरला दिला होता. पी. चिदंबरम यांनी अटक टाळण्यासाठी 30 मे रोजी न्यायालयात धाव घेतली होती.
Thursday, November 01, 2018 AT 09:17 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: