Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 1
आज सोलापूर बंद 5पुणे, दि. 29 (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी रविवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुण्यात  मोर्चा काढण्यात आल्यामुळे पुण्यात चक्का जाम झाला होता. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील काही भागात व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवल्याने शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, शेतकर्‍यांना हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी जोरदार घोषणाबाजी करत पुण्यात सकाळी 11 च्या सुमारास मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली. डेक्कन जिमखान्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला महिला आंदोलकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जिजाऊ वंदनेने मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर या मार्गावरील वाहतूक तसेच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच मोर्चावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Monday, July 30, 2018 AT 08:49 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: