Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 19
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : यवतमाळमध्ये अवनी (टी-1) या वाघिणीच्या हत्येचे पडसाद मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. वाघिणीच्या हत्येनंतर राज्य सरकारवर टीका होत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मुद्द्यावर प्रश्‍न उपस्थित केला असताना वन मंत्री सुधीर मुनगंटीवार बैठकीत गैरहजर होते. ‘अवनी’वरील चर्चा संपल्यानंतर त्यांचे बैठकीत आगमन झाले. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रात टी-1 प्रजातीच्या ‘अवनी’ वाघिणीची गेल्या महिन्यात हत्या करण्यात आली. वाघिणीच्या हत्येवरून केंद्रीय मंत्री मनेका गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे व वन्यजीवप्रेमींनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. मनेका गांधी यांनी तर सुधीर मुनगंटीवार यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी अवनीच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनीचा मुद्दा उपस्थित केला. अवनीच्या हत्येबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.
Wednesday, November 14, 2018 AT 08:47 PM (IST)
5पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) : उंच कड्यावरून सेल्फी काढण्याच्या नादात पुण्याचा तरुण सिंहगडावरून अडीचशे फूट खोल दरीत पडला. तो गंभीर जखमी असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. तुषार प्रकाश दळवी असे या तरुणाचे नाव आहे. मित्रमंडळींसमवेत तो सिंहगडावर आला होता. बारूदखाना पॉइंटवरून तो दरीत कोसळला. सिंहगड वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ, पर्यटकांनी अथक प्रयत्नाने त्याला दरीतून वर काढलेे. तो गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Monday, October 29, 2018 AT 09:10 PM (IST)
5पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) :  तब्बल 79 कोटी रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी पुण्यातील एका व्यापार्‍यास मुंबईतून अटक करण्यात आली आहे. जीएसटी कायद्यांतर्गत करण्यात आलेेली पुण्यातील ही पहिलीच कारवाई आहे. जीएसटीच्या पुणे झोनल युनिटकडून ही कारवाई केली. मोदसिंग पद्मसिंह सोढा असे अटक करण्यात आलेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सोढा याने 10 बनावट कंपन्या स्थापन केल्या असून त्याद्वारे 415 कोटी रुपयांचे केवळ कागदी व्यवहार केले आहेत. या प्रकरणात एकूण 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. वस्तू न पुरवता देण्यात आलेल्या पावत्यांच्या आधारे हा घोळ करण्यात आला आहे. अशा प्रकारचे व्यवहार करून त्याद्वारे काळा पैसा निर्माण करण्यात येत असल्याची शक्यता युनिटने व्यक्त केली आहे. युनिटला मिळालेल्या माहितीनुसार चौकशी केली असता काही व्यक्ती जीएसटी नोंदणी करून त्याद्वारे बनावट बिलांकरवी  खोटे इनपुट टॅक्स क्रेडिट  निर्माण करत असल्याचे स्पष्ट झाले होते.
Monday, October 29, 2018 AT 09:00 PM (IST)
5मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यानंतर आता काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी, असा आग्रह काँग्रेसने केला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली. त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीकडून अहमदनगरच्या जागेची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने 50-50 टक्के जागा वाटपाची मागणी केली. भाजपकडून दिलीप गांधी सध्या अहमदनगरच्या खासदारपदी आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव रावळे यांचा दोन लाख 9 हजार 122 मताधिक्यांनी त्यांनी पराभव केला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपाली सय्यद यांचाही या निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. मुंबईतील आणखी एका जागेची मागणी राष्ट्रवादीने केली. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर मध्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने मागितल्याची माहिती आहे.
Monday, October 22, 2018 AT 08:57 PM (IST)
5मुंबई, दि. 12 (प्रतिनिधी) : आपल्या प्रश्‍नांची सोडवणूक व्हावी यासाठी मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे प्रकार वाढत असताना आज मंत्रालयातल्याच एक कर्मचार्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला. दिलीप सोनवणे असे या कर्मचार्‍याचे नाव असून सक्तीने सेवानिवृत्त केल्यामुळे त्याने हा प्रकार केला. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. दिलीप सोनावणे हे उद्योग विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते. कार्यालयात वेळेवर न येणे, वरिष्ठांची अनुमती न घेता कामावर गैरहजर राहणे, कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वी निघून जाणे आदी कारणांमुळे त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू होती. विभागीय चौकशीत सोनावणे दोषी आढळल्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, बडतर्फ केल्यास त्यांना कोणतेही सरकारी लाभ मिळणार नाही म्हणून त्याऐवजी सक्तीची सेवानिवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई मागे घ्यावी, अशी विनंती करण्यासाठी सोनवणे आज आपल्या कुटुंबीयांसह मंत्रालयात आले होते.
Saturday, October 13, 2018 AT 08:51 PM (IST)
1 2 3 4
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: