Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 84
राज्यातील दहा मतदारसंघांत 63 टक्के मतदान िं कोणतीही लाट नसताना 2014 पेक्षा अधिक मतदान िं दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद 5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात 11 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून 96 मतदारसंघांमध्ये गुरुवारी सरासरी 66 टक्के मतदान झाले. पश्‍चिम बंगालमधील किरकोळ हिंसक घटना, छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी घडवलेला आयईडी स्फोट वगळता मतदान शांततेत झाले, अशी माहिती केंद्रीय वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी दिली. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांमध्येही शांततेत पण 63 टक्के इतके विक्रमी मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. 2014 साली या दहा मतदारसंघांत 57.22 टक्के मतदान झाले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आदी दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद झाले आहे.
Friday, April 19, 2019 AT 08:23 PM (IST)
राज ठाकरे यांचा रोखठोक सवाल मोदी, शहांच्या विरोधात बोलणारच 5सातारा, दि. 17 : महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षांत 14 हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया या जाहिरातींवर साडेचार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. देशातील बलात्कार थांबले नाहीत. अनेकांचे रोजगार काढून घेतले. नवीन युवक रोजगाराच्या शोधात आहेत, देशात अशी परिस्थिती असताना निवडणुकीच्या तोंडावर जवानांच्या नावाने मते मागण्यात येत आहेत. गेल्या 5 वर्षात जी स्वप्ने दाखवली, योजना आणल्या याबाबत नरेंद्र मोदी चकार शब्द काढत नाहीत. बाबांनो बेसावध राहू नका. नरेंद्र मोदी, अमित शहा देश संपविल्याशिवाय राहणार नाहीत. ते यापुढे राजकीय पटलावर दिसता कामा नये, याची तुम्ही काळजी घ्या, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठीच पुलवामा हल्ला घडवून आणला का असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सातारा येथील गांधी मैदानावर बुधवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
Thursday, April 18, 2019 AT 08:35 PM (IST)
देशभरात 97 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान 5मुंबई, दि. 16 (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता झाली. आता 13 राज्यांमधील 97 मतदारसंघांमध्ये गुरुवार, 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून त्यात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाड्यासह दहा मतदारसंघांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, डॉ. प्रीतम मुंडे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. देशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान होत असून महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला देशातील 18 राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान झाले होते. त्यात विदर्भातील सात मतदारसंघांचा समावेश होता. आता दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यांमधील 97 मतदारसंघांमध्ये 18 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांचा समावेश आहे.
Wednesday, April 17, 2019 AT 08:48 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या जवळपास मान्सून बरसेल. तो देशभर सर्वदूर, समप्रमाणात होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. हा अंदाज शेतकरी वर्गासाठी दिलासादायक आहे. विशेष म्हणजे यंदा मान्सून सरासरीपेक्षा खूपच कमी असेल, असा अंदाज खासगी संस्थांनी वर्तवल्याने चिंतेचे वातावरण होते परंतु भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाने चिंतेचे ढग दूर होण्यास मदत होणार आहे. यंदा नैऋत्य मौसमी पाऊस समाधानकारक आणि सामान्य होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. जून-ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामात पावसाची सरासरी दीर्घकालीन सरासरीच्या 96 टक्के राहील, असे हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे. दीर्घकालीन सरासरीच्या 96 ते 104 टक्के पाऊस सामान्य समजला जातो तर 90 ते 96 टक्के पाऊस सरासरीपेक्षा कमी समजला जातो. यंदा 96 टक्के म्हणजेच सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल, असे हवामाना विभागाचे म्हणणे आहे. भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश आणि भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन यांनी पावसाचा अंदाजचे भाकीत वर्तवले.
Tuesday, April 16, 2019 AT 08:38 PM (IST)
संजय दुधाणे 5मुंबई, दि. 14 : सध्या देशात निवडणूक आणि आयपीएलचे वारे वाहत असले तरी जगभरातील क्रिकेट शौकिनांना विश्‍वकरंडक स्पर्धेची उत्कंठा लागली आहे. क्रीडा विश्‍वातील भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै दरम्यान इंग्लंड व वेल्समध्ये रंगणार आहे. भारतीय संघाची घोषणा सोमवार, दि. 15 एप्रिल रोजी होत आहे. विराट कोहली, एम. एस. धोनी, रोहित शर्मा आणि अंतिम 15 संघात कोणाची वर्णी लागणार याकडे सार्‍या क्रिकेटविश्‍वाचे लक्ष वेधले आहे. क्रिकेट पंढरीत होणार्‍या क्रिकेट कुंभमेळ्यासाठी सर्वप्रथम न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. आता सोमवारी भारताचे शिलेदार सज्ज होतील. विश्‍वकरंडकाच्या मोहिमेसाठी टीम इंडियाचे नेतृत्व प्रथमच विराट कोहलीच्या हाती येईल. गत स्पर्धेतील महेंद्रसिंग धोनीसह आयपीएल गाजवित असलेला रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शमी हे अनुभवी पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणात झुंजताना दिसतील. वानखेडे स्टेडियमवर 2011 मध्ये षटकार झळकावित महेंद्रसिंग धोनीने दुसर्‍यांदा विश्‍वकरंडकावर भारताचे नाव कोरले होते. पुन्हा धोनीचे नेतृत्व असफल ठरले.
Monday, April 15, 2019 AT 08:53 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: