Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 2
गेल्या दहा वर्षात भारतात झालेल्या दूरसंचार क्रांतीने सारे जग ‘मोबाईल’द्वारे मुठीत आले. जगाच्या कानाकोपर्‍याशी क्षणार्धात संपर्क साधणे मोबाईलमुळे शक्य झाले. अलीकडच्या पाच वर्षात मोबाईलवरील ‘लघुसंदेश’ (एसएमएस)ची संकल्पनाही स्मार्टफोनच्या नव्या साधनामुळे मागे पडली. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या तंत्राचा आणि विविध अ‍ॅप्सच्या समावेशाने स्मार्टफोनद्वारे व्हिडिओ संभाषणासह, छायाचित्रे, ध्वनि-चित्रफिती क्षणार्धात पाठवायची सोय उपलब्ध झाली. छायाचित्रेही टिपता यायला लागली. सारे जग आणि मित्र, नातेवाईक, सग्यासोयर्‍यांचा परिवारही या नव्या तंत्राद्वारे संपर्काच्या साखळीत जोडला गेला. पण, या नव्या तंत्रज्ञानाचा-सुविधांचा वापर करणारे लाखो युवक आणि युवती या साधनाच्या आहारी आणि नंतर अति आहारी गेल्यामुळे, युवापिढीत आता फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप या सामाजिक माध्यमाच्या वेडाबरोबरच मनोरुग्णांची संख्याही झपाट्याने वाढते आहे. रात्रंदिवस व्हॉटस्अ‍ॅपच्या अति वेडात, लाखो युवकांना त्याचे व्यसनच लागले. जेवताना, खाताना, प्रवास करताना सातत्याने स्मार्टफोनवर बोलायचे किंवा पहाणे म्हणजेच अशांचे दैनंदिन जीवन झाले आहे.
Thursday, August 09, 2018 AT 08:41 PM (IST)
राजस्थानमध्ये होणार्‍या 13 हजार पोलीस पदांच्या भरतीसाठी अर्ज भरलेल्या 15 लाख उमेदवारांच्या लेखी परीक्षेसाठी शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस संपूर्ण राज्यालाच वेठीला धरायचा सरकारचा निर्णय आतापर्यंतच्या जगातल्या परीक्षा प्रक्रियेच्या परंपरेत नवा इतिहास घडवणारा ठरला. यापूर्वी हीच परीक्षा सरकारने तीन वेळा जाहीर केली होती. पण, प्रत्येक वेळी प्रश्‍नपत्रिका फुटल्याच्या घटना उघड झाल्याने, ही परीक्षा  रद्द करून लांबणीवर टाकायची नामुष्की सरकारवर आली. या परीक्षेत कोणत्याही प्रकारे आणि कोणत्याही साधनाने परीक्षार्थीला कॉपी करता येवू नये, यासाठी सरकारने अत्यंत कडक आणि अभूतपूर्व बंदोबस्तासह नियमावली अंमलात आणली आणि त्याचा त्रास मात्र राज्यातल्या कोट्यवधी बँका, व्यावसायिकांसह जनतेला बसला. परीक्षेच्या काळात सलग दोन दिवस दररोज दहा तास सरकारने राज्यातली संपूर्ण इंटरनेट सेवा सक्तीने बंद केल्यामुळे, बँका, रेल्वे, टॅक्सी, विमानसेवा यासह कोट्यवधी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.
Tuesday, July 17, 2018 AT 08:40 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: