Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 1
  विदर्भ-मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीच्या तडाख्यात तीन लाख हेक्टर क्षेत्रातील गहू, ज्वारी, संत्री, आंबा, हरभरा, कापूस, अशी पिके जमीनदोस्त झाली. शेतकर्‍यांचे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान झाले. लिंबाएवढ्या आकाराच्या मोठ्या गारांचा वर्षाव झाल्यामुळे, पोपट, चिमण्या, कावळे, बगळे, असे हजारो पक्षीही गारपिटीने मृत्युमुखी पडले. शेतकर्‍यांनी पाळलेल्या हजारो कोंबड्या गारपिटीच्या मार्‍याने दगावल्या. काही जनावरांचेही मृत्यू झाले. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर करून दिलासा दिला. गारपिटीने मेलेल्या कोंबड्या आणि जनावरांचे पंचनामे झाल्यावर, या आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांनाही नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्‍वासन सरकारने दिले. गारपिटीने मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्या आणि जनावरांचे पंचनामे करायचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी पशुसंवर्धन खाते आणि तलाठ्यांना दिले आहेत. पण पशुसंवर्धन खात्याच्या अधिकार्‍यांनी आणि काही तलाठ्यांनी गारपिटीने मेलेल्या कोंबड्या शवविच्छेदनासाठी सरकारी जनावरांच्या दवाखान्यात घेऊन याव्यात, असे फर्मान शेतकर्‍यांना काढल्याने, शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Wednesday, February 21, 2018 AT 08:46 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: