Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 25
5सातारा, दि. 18 : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाशेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या एकाची 49 हजार 500 ची रोकड घेवून अज्ञाताने पलायन केले आहे. या घटनेने बँकेसह परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत महेंद्र रामकृष्ण निकम (वय 34, रा.मि.अपशिंगे) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महेंद्र निकम हे सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजता एचडीएफसी बँकेत 1 लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी गेले होेते. बँकेत गेल्यानंतर दोन स्लिप घेवून त्यांनी त्या भरल्या. कॅश काउंटरवर आल्यानंतर हातातील पैशांचे दोन बंडल त्यांनी काउंटरवर ठेवले. यावेळी एका स्लिपमध्ये खाते क्रमांक टाकायचे राहिले असल्याचे निकम यांच्या लक्षात आले. तक्रारदार महेंद्र निकम हे दुसर्‍या स्लिपमध्ये खाते क्रमांक टाकत असताना अज्ञात चोरटा पाठीमागून आला व त्याने दोन रोखीच्या बंडलपैकी एक बंडल उचलले व तेथून पलायन केले. अज्ञाताने दोन रोखीच्या बंडलपैकी एक बंडल उचल्याचे पाहिल्यानंतर तक्रारदार महेंद्र निकम यांनी आरडाओरडा करत त्या संशयिताचा पाठलाग केला.  मात्र तोपर्यंत संशयिताने घटनास्थळावरून पळ काढला.
Tuesday, June 19, 2018 AT 08:53 PM (IST)
नगराध्यक्षांना जिल्हाधिकार्‍यांचा झटका नगरविकास आघाडीची मागणी मान्य 5सातारा, दि. 17 : सातारा नगरपालिकेच्या इतिहासात प्रशासनाने हस्तक्षेप करुन विशेष सभा बोलावल्याचा इतिहास नाही. पालिकेच्या इतिहसात पहिल्यांदाच जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरुन प्रांताधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी विशेष सभा बोलावली आहे. विशेष सभा बोलावण्याची नगरविकास आघाडीची मागणी मान्य करुन जिल्हाधिकार्‍यांनी नगराध्यक्षांना जोरदार झटका दिला आहे. नगराध्यक्ष पदावर असतानाही प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या सभेची नोंद वेगळ्या प्रकारे इतिहासात होणार आहे. ही सभा दि. 21 जून रोजी पालिकेच्या सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. नगरविकास आघाडीचे विषय डावलले जातात. विषय पत्रिकेवर विषयच घेतले जात नाहीत अशाप्रकारची तक्रार नविआचे पक्षप्रतोद अमोल मोहिते आणि नगरविकास आघाडीने जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. ही तक्रार करताना नविआचे अध्यक्ष आ.श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून नविआच्या मागणीचा कायदेशीर विचार करा, अशी विनंती केली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेवून आ.
Monday, June 18, 2018 AT 08:59 PM (IST)
5सातारा, दि. 17 : सिध्देश्‍वर कुरोली, ता. खटाव येथील परिसरात तोल जावून दुचाकीवरुन पडल्याने एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   याबाबत अधिक माहिती अशी, रंजना विजय बाकले (वय 50) आणि गणेश बाकले (दोघे रा. शिवाजीनगर, शेंद्रे, ता. सातारा) हे दोघे दुचाकीवरुन (एम. एच. 11-ए. झेड. 4835) सिध्देश्‍वर कुरोलीहून म्हसवडकडे निघाल्या होत्या. रंजना बाकले गाडीवर पाठीमागे बसल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
Monday, June 18, 2018 AT 08:56 PM (IST)
दैनिक ‘ऐक्य’च्या वृत्ताचा परिणाम जिल्हा परिषदेच्या सभेत पुरवणी अंदाजपत्रक मंजूर 5सातारा, दि. 15 :  जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत 2018-19 साठीच्या 45 कोटी 88 लाखांच्या पुरवणी अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर होते. सभेत समाजकल्याण अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्याबद्दल असलेल्या तक्रारींची दखल घेवून अध्यक्षांनी संबंधित दोन्ही अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले. दरम्यान, दैनिक ऐक्यने जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियमच्या अवाजवी भाड्याबाबत वृत्त प्रसिध्द करुन आवाज उठवला होता. या वृत्ताची दखल घेत 50 हजार रुपयांवरुन भाडे 30 हजार रुपये करण्याचा ठराव सभेत मंजूर केला. ऐक्यच्या वृत्तामुळे तब्बल 20 हजार रुपयांनी भाडे कमी झाले असून त्याचे अनेक सदस्यांनी स्वागत केले. शिक्षण व अर्थसभापती राजेश पवार यांनी मूळ अंदाजपत्रकासह पुरवणी अंदाजपत्रक मांडले. यावर्षी मूळ अंदाजपत्रकात 45 कोटी 88 लाख 34 हजारांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ अंदाजपत्रकासह 75 कोटी 86 लाख 44 हजारांवर अंदाजपत्रक पोहोचले.
Saturday, June 16, 2018 AT 09:21 PM (IST)
5सातारा, दि. 13 :  शासकीय विश्रामगृहामध्ये  मुख्याध्यापकाला मारहाण करून एक प्रकरण मिटवण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात  विकास शिवाजी राठोड (वय 25, रा.पंताचा गोटा) या चौथ्या संशयित आरोपीला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, यापूर्वी तिघा भाजप-शिवसेनेच्या तीन कार्यकर्त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ते तिघेही सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात (जेल) आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 16 मे रोजी दुपारी बारा वाजता या प्रकरणातील तक्रारदार मुख्याध्यापक अमोल कोळेकर यांना    भाजपचे सुनील काळेकर, संदीप मेळाट व शिवसेनेचे पदाधिकारी हरिदास जगदाळे व एका अनोळखीने शासकीय विश्रामगृहातील  9 नंबरच्या खोलीमध्ये एक प्रकरण मिटवण्यासाठी मारहाण करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. भाजप-सेना पदाधिकार्‍यांनी मुख्याध्यापकाला मारहाण केल्याने खळबळ उडाली होती. शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर दि.31 रोजी सुनील काळेकर, संदीप मेळाट, हरिदास जगदाळे यांना अटक केली.
Thursday, June 14, 2018 AT 08:33 PM (IST)
1 2 3 4 5
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: