Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 56
मराठा क्रांती मोर्चाची ठिय्या आंदोलनात मागणी 5सातारा, दि. 20 : नागपूर येथे विधानसभा अधिवेशन सुरू आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सध्याचे सरकार चालढकल करत असून सरकारकडून नुसती पोकळ आश्‍वासने दिली जात आहेत. त्यामुळे राज्यातील 142 मराठा आमदारांनी बघ्याची भूमिका न घेता मराठा आरक्षण मंजूर करून घ्यावे.  जर ते होत नसेल तर आमदारकीचे राजीनामे द्यावेत. आम्ही बघू कसे आरक्षण मिळत नाही, असा इशारा सातारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर यांनी  दिला तसेच यावेळी त्यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याच्या घरासमोरच हिजड्यांना नाचवणार असल्याचे जाहीर केले. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चास पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा यांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Saturday, July 21, 2018 AT 08:39 PM (IST)
5सातारा, दि. 19 :  घरात खेळत असताना  उवा मारण्याची पावडर खाल्ल्याने अंदोरी, ता. खंडाळा येथील शानू अविनाश सपकाळ (वय 4 वर्षे) आणि आरती अविनाश सपकाळ (वय अडीच वर्षे) या दोघी अत्यवस्थ झाल्या  असून त्यांना उपचारासाठी गुरुवारी दुपारी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्दैवाने मात्र यातील आरतीचा मृत्यू झाला असून शानूची प्रकृती स्थिर आहे. मुलीचा मृत्यू झाल्याचे सपकाळ कुटुंबीयांना समजताच त्यांनी आक्रोश केला. याबाबत प्राथमिक माहिती अशी, अंदोरी  येथे आरती व शानू या बहिणी गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास घरात खेळत होत्या. खेळत असताना चुकून दोघींना उवा मारण्यासाठी वापरण्यात येणारी विषारी पावडरची पुडी सापडली. पुडी घेवून त्यातील असणारी पावडर दोघींनी खाल्ली. पावडर खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना उलट्यांचा त्रास होवू लागला. खेळणार्‍या दोघी अचानक उलट्या करु लागल्याने कुटुंबीय घाबरुन गेले. पालकांनी मुलींकडे चौकशी केली असता शानूने खेळताना सापडलेल्या पुडीमधील पावडर खाल्ल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. तत्काळ या दोघींना लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Friday, July 20, 2018 AT 08:36 PM (IST)
5सातारा, दि. 17 :  संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस फुगे विक्रेत्यांपासून वेगवेगळ्या वेशभूषेत वावरले. अगदी वारकरी पोशाखामध्येही ते राहिले. या कालावधीत त्यांनी तब्बल 90 चेनस्नॅचर, पिकपॉकीटर, खुनाच्या प्रयत्न करणारे, दरोडा, जबरी चोरीतील संशयित पकडले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानेश्‍वर माउलींची आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे पालखी दरवर्षी जात असते. या पालखी सोहळ्यामध्ये परदेशी पाहुण्यांपासून विविध राज्यातील लाखो भाविक सहभागी होतात.  अशा या भक्तीभावाने निघणार्‍या वारीमध्ये चोरट्यांचीही नजर असते. वारीदरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या त्या जिल्ह्यातील पोलीस खबरदारी घेत असतात.  यंदा सातार्‍यात पालखी चार दिवस मुक्कामाला असल्याने सातारा जिल्हा पोलीस दलावर बंदोबस्ताचा ताण होता.
Wednesday, July 18, 2018 AT 08:35 PM (IST)
5सातारा, दि. 11 :  सातारा जिल्हा पोलीस दलातील स्वप्निल किशोर जाधव (वय 32, रा.चिमणपुरा पेठ) यांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाधव यांना कावीळ झाली असल्याचे समोर आले आहे.  या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस हवालदार स्वप्निल जाधव हे सध्या पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना कावीळ झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्दैवाने  त्यांचा त्यात मृत्यू झाला.
Thursday, July 12, 2018 AT 08:43 PM (IST)
5सातारा, दि. 10 : संभाजीनगर येथील घरात मंगळवारी दुपारी प्रतीक्षा पांडुरंग तोडकर (वय 22, रा. संभाजीनगर, सातारा) हिने  गळफास घेवून आत्महत्या केली. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. ही घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती पोलीस रात्री उशिरापर्यंत घेत होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत प्राथमिक माहिती अशी, संभाजीनगरातील शिवराज पेट्रोलपंपा-मागे प्रतीक्षा तोडकर ही युवती कुटुंंबीयांसमवेत राहण्यास होती. प्रतीक्षा सातारा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला होती. मात्र मंगळवारी कंपनीला सुट्टी असल्याने ती घरीच होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घरातील एका खोलीत गेली. खोलीतून बराच वेळ काहीही हालचाल न जाणवल्याने आईने दरवाजा ठोठावला. मात्र कोणताही प्रतिसाद आतून मिळाला नाही. त्यानंतर प्रतीक्षाच्या भावाने बाहेरुन जात खिडकीतून पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे आढळले.  परिसरात नागरिकांची गर्दी झाल्यानंतर गळफास काढून तिला उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिला मृत घोषित करण्यात आले.
Wednesday, July 11, 2018 AT 08:38 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: