Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 63
5सातारा, दि. 11 :  आरटीओ चौकातील सार्वजनिक बांधकाम वसाहतीत शनिवारी दुपारी चोरट्यांनी बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील 10 हजार रुपये लांबवले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुल गणपत तुपे (वय 43) हे  कामानिमित्त शनिवारी घरातून बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि घरातील  10 हजार रुपयांची रोकड लांबवली.
Monday, November 12, 2018 AT 09:18 PM (IST)
5सातारा, दि. 6 : कल्याणी शाळा परिसरातून अल्पवयीन युवकाचे दुचाकीवरुन अपहरण करुन त्याला विसावा नाका येथे नेवून मारहाण केल्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्याची अनिकेत जाधव, संग्राम जाधव, यश जगताप, संग्राम चव्हाण, सिध्दार्थ जगताप, अनिरुध्द पवार (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी नावे आहेत. रणवीर राजेश पवार (वय 16, रा. सदरबझार) या युवकाने तक्रार दिली आहे. दि. 23 ऑक्टोबर सायंकाळी सहाच्या सुमारास मारहाणीची घटना घडली आहे. चप्पल पास करण्याच्या कारणातून संशयितांनी तक्रारदार युवकाचे दुचाकीवरुन अपहरण केले. संशयितांनी केलेल्या मारहाणीत रणवीर पवार याच्या डोळ्याला लागले आहेे.
Wednesday, November 07, 2018 AT 08:42 PM (IST)
5सातारा, दि. 5 :  येथील अंगापूर फाटा ते अंगापूर रोड या दरम्यान बिनधास्तपणे स्फोटक पदार्थ असणार्‍या जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्याची वाहतूक करणार्‍यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. कारवाईत पोलिसांनी ट्रॅक्टरसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी स्फोटक पदार्थ व एक्स्प्लोझिव्ह अ‍ॅक्टनुसार तीन जणांविरोधात  गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेल्यांची अविनाश राजेंद्र जाधव (वय 27), बाजीराव शंकर जाधव (वय 29), मारुती तानाजी जाधव (वय 21, तिघे रा.अंगापूर वंदन, ता.सातारा) अशी नावे आहेत.   या प्रकरणी पोलीस हवालदार गोकुळ बोरसे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक माहिती अशी, दि. 4 रोजी दुपारी दीडच्या सुमारास अंगापूर वंदन येथे स्फोटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी धाव घेवून छापा टाकला. यावेळी पीक क्षेत्रालगत तीन ट्रॅक्टर उभे होते व लागूनच विहीर खोदण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या ठिकाणी जिलेटीनच्या 172 व डिटोनेटरच्या 99 या स्फोटकाच्या कांड्या सापडल्या.
Tuesday, November 06, 2018 AT 08:34 PM (IST)
5सातारा, दि. 5  : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरवत पावसाने शहर व उपनगरात दुसर्‍या दिवशीही दमदार बॅटिंग केली. दिवाळीच्या खरेदीसाठी सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडणार्‍या चाकरमान्यांचा त्यामुळे हिरमोड झाला. कर्नाटक जवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार  हजेरी लावली आहे. पुणे आणि परिसरात तर सकाळपासूनच पावसास सुरुवात झाली. रविवारी सायंकाळी जवळपास तासभर पावसाने बॅटिंग केल्यामुळे सखल भागात पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरूनही पाण्याचे लोट वाहत होते. काल देखील खरेदीसाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची त्यामुळे दैना झाली होती. छोट्या व्यावसायिकांचे त्यामुळे नुकसान झाले होते. मात्र सोमवारीही पावसाने सायंकाळच्या सुमारासच हजेरी लावत सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. उद्या दिवाळीची पहिली आंघोळ या शिवाय केरसुणी (लक्ष्मी) तसेच लक्ष्मी पूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिला घराबाहेर पडल्या होत्या. परंतु आजही या पावसाने त्यांची निराशा केली. आजचा पाऊस कोठे कोठे झाला हे मात्र समजू शकले नाही.
Tuesday, November 06, 2018 AT 08:24 PM (IST)
5सातारा, दि. 4 : सातारा परिसरातील देगाव रोड व मंगळवार पेठ या दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या घटनांमध्ये सुमारे 1 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेे. या दोन्ही घटनांमध्ये बंद घरे चोरट्यांनी लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कुसुम राजेश शर्मा (वय 60, रा. देगाव फाटा, एमआयडीसी) यांनी तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 2 रोजी त्या घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. बंद घर पाहून चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून चोरी केली. चोरट्यांनी घरातून रोख 40 हजार रुपये, मनगटी घड्याळे, सोन्याची माळ व चांदीचे सिक्के असा एकूण 74 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. दुसर्‍या घटनेबाबत शर्मिला ऋषिकेश राजे (वय 40, रा. मंगळवार पेठ) यांनी तक्रार दिली आहे.    त्यामध्ये म्हटले आहे की, सध्या त्या पुणे येथे राहत आहेत. मंगळवार पेठेतील वाड्यातून अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून 9 हजार रुपये किमतीची पितळीची भांडी चोरुन नेली आहेत. या दोन्ही घटना समोर आल्यानंतर शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Monday, November 05, 2018 AT 09:10 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: