Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 70
5सातारा, दि. 18 : जाब विचारल्याच्या कारणावरून सातारमध्ये एकाच्या खुनाचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक शेंडे, रा. नवीन एमआयडीसी यांच्या नवीन गाडीला काही जणांनी डॅश मारला. डॅश का मारला अशी विचारणा त्यांनी केली होती. दरम्यान या घटनेनंतर अशोक शेंडे कंपनीत गेले असता अज्ञात तीन युवकांनी कंपनीत येऊन अशोक शेंडे यांना आणि त्या ठिकाणी कामगार असलेल्या अश्रफ त्याला बेदम मारहाण केली. याबाबतची फिर्याद सागर अशोक शिंदे (वय 19), रा. नवीन एमआयडीसी याने दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात 9 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सातारा शहर पोलिसात दाखल केला आहे.
Saturday, January 19, 2019 AT 08:45 PM (IST)
5सातारा, दि. 16 : अल्पवयीन बालिकेचे अपहरण करणार्‍या सेसराव पांडुरंग हरामी (वय 25), रा. चिंचटोला शिवणी, ता. कुरखेडा याला मंगळवारी वाई येथे अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गोंदिया जिल्ह्यात राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीस सेसराव हरामी याने पळवून नेले होते. याबाबतची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केशोरी पोलीस ठाण्यात नोंदवली होती. हरामी हा वाई परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गोंदिया पोलिसांनी याची माहिती सातारा पोलिसांना दिली. यानुसार स्थागुशाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, कर्मचारी मोहन घोरपडे, विजय कांबळे, रवी वाघमारे, शरद बेबले, प्रमोद सावंत, प्रवीण फडतरे, संजय जाधव, विजय सावंत यांना कारवाईच्या सूचना केल्या. यानुसार या पथकाने वाई येथील गरवारे कंपनी परिसरातून सेसराव हरामी याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असणार्‍या अल्पवयीन बालिकेची सुटका करत त्या दोघांचा ताबा नंतर गोंदिया पोलिसांकडे देण्यात आला.
Thursday, January 17, 2019 AT 09:04 PM (IST)
5सातारा, दि. 15 : सातारा-रहिमतपूर मार्गावर एका रंग कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 9  च्या सुमारास घडली. दरम्यान मृत्यू झालेल्या रंग कामगाराच्या पायाच्या पंजाला, मांडीला जखमा असल्याने नातेवाईकांनी अपघात झाल्याची शंका व्यक्त केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भरत भगवान जाधव, (वय 57), मूळ रा. सुर्ली, ता. कोरेगाव हे मुलगा सौरभ भरत जाधव (वय 22) आणि सुरज भरत जाधव (वय 18) यांच्या समवेत येथील जानाई-मळाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका अपार्टमेंटमधील रूममध्ये भाड्याने राहतात. भरत जाधव हे औद्योगिक वसाहतीमध्ये रंगाची कामे करतात. आज सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे ते जानाई- मळाई थांब्यापासून कोडोली मार्गे औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी घराबाहेर पडले. सकाळी 9 वाजता त्यांचा मृतदेह सातारा-रहिमतपूर मार्गावर कोडोली जवळ एका मोकळ्या जागेत आढळून आला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला.  या घटनेची माहिती मिळताच भरत जाधव यांचा मुलगा सौरभ, बंधू अरविंद भगवान जाधव आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली.
Wednesday, January 16, 2019 AT 09:14 PM (IST)
5सातारा, दि. 10 : आईस्क्रीम पार्लरची एजन्सी देण्याचे आमिष दाखवून सातारा येथील एका युवकाची 1 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वीरभद्र शेळके (वय 32), रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांचे चहाचे छोटे हॉटेल आहे. चहाबरोबर आईस्क्रीम पार्लर चालविण्याचा त्यांचा मानस होता. त्यादृष्टीने त्यांनी वेबसाईटवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. एका वेबसाईटवर अर्जही भरला. तदनंतर संदीप पटेल नावाने त्यांना फोन आला. तुमचा अर्ज स्वीकारला असून व्हॉटसअ‍ॅपवर पाठवलेली कागदपत्रे भरुन पाठवा तसेच पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला पाठवलेल्या बँक अकौंटवर 25 हजार रुपये पाठविण्याची सूचना करण्यात आली. वीरभद्र शेळके यांनी आधी 25 हजार रुपये, नंतर 19 हजार रुपये असे 44 हजार रुपये पाठवले. काही दिवसांनी आईस्क्रीम पार्लरच्या कन्फर्मेशन लेटरसाठी 80 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. शेळके यांनी 80 हजार रुपये संबंधित अकौंटवर भरले.
Friday, January 11, 2019 AT 08:57 PM (IST)
चार महिन्यांपासून प्रदक्षिणा घालण्याची वेळ 5सातारा, दि. 9 : सातारा शहर आणि शाहूपुरीला जोडणार्‍या कोटेश्‍वर पुलाचे काम अत्यंत रटाळपणे सुरू असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना प्रदक्षिणा घालण्याची दुर्दैवी वेळ येवून ठेपली आहे. धिम्या गतीमुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या व्यापार्‍यांवर परिणाम होत असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याने पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सातारा आणि शाहूपुरीला जोडणार्‍या कोटेश्‍वर पुलाची दुरवस्था झाल्याने सातारा पालिकेने नवीन पुलासाठी 1 कोटी 21 लाख 57 हजार रुपयांची तरतूद करून 11 सप्टेंबर 2018 रोजी नवीन पुलाच्या कामास प्रारंभ केला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. शाहूपुरीकडे जाण्यासाठी अनंत इंग्लिश स्कूल मार्ग, दैनिक ऐक्य कॉर्नरपासून ओढ्यातून पुढे, गजानन मंदिर पाठीमागून अशा तीन पर्यायी मार्गांचा अवलंब करत प्रदक्षिणा घालण्याची वेळ नागरिकांसह वाहनचालकांवर येत आहे. वास्तविक काम सुरू करण्यापूर्वी पाण्याच्या लाइन शिफ्ट करणे आवश्यक होते. मात्र, रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर काम बंद ठेवून पाण्याच्या लाइन शिफ्ट करण्याचे काम हाती घेण्यात आले.
Thursday, January 10, 2019 AT 09:10 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: