Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा पराभव करायसाठी काँग्रेस पक्षाने धूर्तपणे पाटीदारांच्या संघटनेशी निवडणूक युती केली असली, तरी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताच या संघटनेत फूट पडली आहे. गेल्या आठवडाभर पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल आणि काँग्रेसच्या नेत्यांशी मतदार संघाच्या वाटपावरून चर्चा सुरू होती. रविवारी रात्री उभय नेत्यांत साडेचार तास चर्चा झाल्यावर काँग्रेसने 72 उमेदवारांच्या जाहीर केलेल्या  पहिल्या यादीत 22 पाटीदार नेत्यांना उमेदवारी देण्यात आली. पण, काँग्रेसने आपला विश्‍वासघात केल्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर बहिष्कार घालायची धमकी पाटीदार आरक्षण समितीच्या नेत्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. ललित वसोवा आणि अमित पटेल या आंदोलन समितीच्या नेत्यांची नावे काँग्रेसने आपल्याला विश्‍वासात न घेता जाहीर केल्याचे आणि सर्व मागण्या मान्य झाल्या नसल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनीही जाहीरपणे केला. काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होताच पक्षाच्या सुरत येथील कार्यालयात घुसून पाटीदार आंदोलन समितीच्या नेत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. घोषणाबाजी केली.
Wednesday, November 22, 2017 AT 09:03 PM (IST)
ठुमरी, दादरा, कजरी, चैती अशा शास्त्रीय रागांवर हुकमत असलेल्या आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या सोनिया बनारस घराण्याचा वारसा निष्ठेने पुढे नेणार्‍या गिरिजादेवी यांच्या निधनाने या घराण्याची अंतिम दीपशिखा अनंतात विलीन झाली आहे. ‘ठुमरीची राणी’ असा लौकिक असलेल्या गिरिजा देवींनी उपशास्त्रीय संगीतातही प्रभुत्व मिळवले होते. पूरबअंग गायिका असलेल्या गिरिजा देवींनी चौमुखी गायनाचा आदर्श निर्माण केला होता. ख्याल, ख्याल टप्पा, ध्रुपद धमाल, चैती होली या रागांची खुलावट त्या आपल्या दमसासीने करून मैफल रंगवून टाकत. रसिकांना चिंब चिंब भिजवून टाकत. बनारस घराण्याच्या सरजू प्रसाद मिश्र आणि चंद मिश्र या गायकांच्याकडे त्यांनी या घराण्याची गायकी आत्मसात करायसाठी प्रचंड तपश्‍चर्या केली. त्यांच्या या कठोर सरावानेच त्यांच्यावर प्रसन्न झालेल्या दोन्ही गुरूंनी आपल्या घराण्यातल्या अनवट, दुर्लभ चिजाही त्यांना शिकवल्या. गुल, मैन, नकश, रुबायी, धरू, कौल, कलवाना या चिजा आत्मसात केलेल्या गिरिजा देवी या एकमेव गायिका होत्या. आपल्या घराण्याची शुद्ध रागांची परंपरा जपतानाच त्यांनी शास्त्रीय संगीताला विविध प्रयोगांनी वेगळी दिशा दिली.
Friday, October 27, 2017 AT 09:05 PM (IST)
माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अकाली दलाचे नेते सुच्चा सिंह लंगाह यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने, राज्यभर खळबळ उडाली आहे. पक्षाच्या गुरुदासपूर जिल्ह्याचे अध्यक्ष असलेल्या सुच्चा सिंह यांच्यावर एका महिलेने 2009 पासून सातत्याने धमक्या देत बलात्कार केल्याची फिर्याद गुरुदासपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांच्याकडे 29 सप्टेंबरला दिली होती. या फिर्यादीसोबत त्या पीडित महिलेने पुराव्यासाठी व्हिडिओ क्लिपही दिली होती. ही क्लिप वृत्तवाहिन्यांवरून प्रक्षेपित झाल्याने, या प्रकरणात सुच्चा सिंह चांगलेच अडकले. पोलीस आपल्याला अटक करतील, या भीतीने त्यांनी दोन दिवसांपूर्वी चंदीगडच्या जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करण्यासाठी वकिलामार्फत याचिका दाखल केली होती. पण, न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्याचा अधिकार या न्यायालयाच्या कार्यकक्षेच्या बाहेर असल्याचे सांगून त्यांनी गुरुदासपूरच्या न्यायालयात शरणागती पत्करावी असा, आदेश दिला. 2009 मध्ये या महिलेच्या पोलीस पतीचे निधन झाल्यावर अनुकंपा तत्त्वावर तिला पोलीस खात्यात गुन्हेगारी शाखेत नोकरी देण्यात आली.
Wednesday, October 04, 2017 AT 09:13 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: