Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 3
महाराष्ट्रातल्या 80 लाख शेतकर्‍यांची पीक कर्जे 15 ऑक्टोबरपूर्वी माफ होतील, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात मात्र मृगजळच ठरल्याचे कटू वास्तव समोर आले आहे. राज्यातल्या शेतकरी संघटना, शेतकरी आणि विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी मे-जून महिन्यात केलेल्या राज्यव्यापी उग्र आंदोलनाच्या दबावामुळेच सरकारला पीक कर्जाच्या माफीचा निर्णय घ्यावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली सरकारने गेले सहा महिने कर्जमाफीचे ढोल वाजवत आपले सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठी वचनबद्ध असल्याचा प्रचारही केला. प्रत्यक्षात या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली, तेव्हा मात्र आधारपत्रिका, सातबारा उतारा, बँकेची खाती अशी माहिती जमवताना आणि ऑनलाइन फॉर्म भरताना  शेतकर्‍यांची अक्षरश: दमछाक झाली. ग्रामीण-दुर्गम भागातल्या हजारो शेतकर्‍यांना हे कर्जमाफीचे फॉर्म भरायसाठी तालुक्याच्या गावांना हेलपाटे मारावे लागले. सरकारची सेवाकेंद्रे अपुरी पडली. एकाही अपात्र शेतकर्‍याला आणि धनदांडग्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू नये, यासाठी सरकारने अटींची जंत्रीच दिलेली होती.
Wednesday, November 22, 2017 AT 09:01 PM (IST)
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या, तरीही गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर का झाल्या नाहीत असा जाहीर सवाल करत केंद्रीय निवडणूक आयोगावर सुरू झालेली आरोप- प्रत्यारोपांची सरबत्ती करीत सुरू झालेेले राजकारण अखेर या राज्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने संपले. गेली 23 वर्षे भारतीय जनता पक्षाचा अभेद्य किल्ला असलेल्या या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. 2014 मधल्या लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच केला होता. पक्षाने त्यांचेच नाव पंतप्रधानपदासाठी जाहीरही केले होते आणि त्यांनी देशव्यापी प्रचाराच्या तडाख्यात सत्ताधारी काँग्रेसला पराभूत करून पक्षाला सत्ता मिळवून दिली. त्या निवडणुकात मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात राज्याच्या झालेल्या चौफेर प्रगतीचा गाजावाजा देशभर झाला होता.
Friday, October 27, 2017 AT 09:02 PM (IST)
अमेरिका म्हणजे जगातला सर्वात सुखी-समृद्ध-श्रीमंत देश अशा समजुतीत या देशाचे गोडवे गाणार्‍यांना, अमेरिकेचे विकृत स्वरूप-अंतरंग लास वेगास शहरात एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार करून 58 निरपराध्यांचे मुडदे क्रूरपणे पाडल्याच्या, चारशे जणांना जखमी केल्याच्या घटनेने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. जगातली आर्थिक आणि लष्करी महासत्ता अशी बिरुदावली मिरवणार्‍या अमेरिकेच्या सामाजिक स्वास्थ्याचे खरे रूप लास वेगास मधल्या घटनेने, जगाला समाजावे, अशी अपेक्षा आहे. कॅसिनो आणि जुगारासाठी जगप्रसिद्ध असलेल्या लास वेगासमधल्या मंडाले बे कॅसिनोच्या जवळच तीन दिवसांच्या संगीत सोहळ्याचा कार्यक्रम होता. रविवारी शेवटच्या दिवशी तिथल्या स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजण्याच्या दरम्यान मंडाले बे च्या 32 व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून स्टिफन पॅडॉक या विकृत हल्लेखोराने, 13 एकर क्षेत्रातल्या खुल्ल्या मैदानात संगीताचा आनंद लुटणार्‍या हजारो रसिकांवर 15 मिनिटे अंदाधुंद गोळीबार सुरू ठेवल्याने, किड्या मुंग्यांसारखी माणसे मारली गेली.
Wednesday, October 04, 2017 AT 09:08 PM (IST)
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: