Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 14
जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण 5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : भारताची धावपटू हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आज इतिहास रचला. अंतिम फेरीत 51.46 सेकंद वेळ नोंदवून हिमाने विजेतेपदाला गवसणी घातली. जागतिक स्पर्धेत कमी अंतराच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारी 18 वर्षीय हिमा ही पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. फिनलंडमधील टॅम्पीअर येथे आयएएएफच्या 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत 18 वर्षीय हिमाने अंतिम फेरीत 51.46 सेकंदात 400 मीटर शर्यत पूर्ण करत सुवर्णपदक पटकावले. रुमेनियाच्या आंद्रिया मिकलोसने 52.07 वेळेसह रौप्य तर अमेरिकेच्या टेलर मॅन्सन हिने 52.28 सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. या विजेतेपदाने हिमाने इतिहास रचला. कमी अंतराच्या धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवणारी हिमा ही पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीतही हिमाने 52.10 सेकंदात 400 मीटर अंतर कापून पहिल्या स्थानासह अंतिम फेरी गाठली होती. प्राथमिक फेरीतही तिने हे अंतर 52.25 सेकंदात अंतर पूर्ण करून पहिले स्थान राखले होते.
Friday, July 13, 2018 AT 08:29 PM (IST)
5ब्रिस्टल, दि. 8 (वृत्तसंस्था) : सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून धुव्वा उडवला. रोहितने अवघ्या 56 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारांची बरसात करत शतक ठोकले. त्यामुळे इंग्लंडने दिलेले 199 धावांचे आव्हान भारताने 6 चेंडू राखून लीलया पार केले. ंभारताने ट्वेंटी-20 मालिका जिंकून इंग्लंडच्या प्रदीर्घ व खडतर दौर्‍याची झकास सुरुवात केली आहे. आता या दोन देशांमधील एकदिवसीय मालिका गुरुवारपासून सुरू होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. जेसन रॉय व जोस बटलर यांनी 8 षटकांतच 94 धावांची सलामी दिल्याने इंग्लंड सहज सव्वादोनशेची मजल मारणार असे वाटत होते. मात्र, हार्दिक पांड्या (4 बळी) आणि सिद्धार्थ कौल (2 बळी) यांनी इंग्लंडला 198 धावांवर रोखले. त्यानंतर रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या जोरावर विजयी लक्ष्य सहज पार केले. रोहितने 56 चेेंडूत नाबाद 100 धावांची खेळी केली. या खेळीत रोहितने 11 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार खेचले. इंग्लंडचे सर्व गोलंदाज त्याच्यासमोर निष्प्रभ ठरले.
Monday, July 09, 2018 AT 08:44 PM (IST)
5मुंबई, दि. 27 (वृत्तसंस्था) : येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या यंदाच्या मोसमातील आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने वॉटसनच्या नाबाद 117 धावांच्या जोरावर सनराईजर्स हैद्राबादचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत सनराईजर हैद्राबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने घेतलेला हा निर्णय त्याच्या धुरंदर गोलंदाजांनी यशस्वी ठरवत हैद्राबादला 20 षटकात 6 बाद 178 धावांवर रोखले. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंनी 2 गड्यांच्या मोबदल्यात 18.3 षटकात 181 धावा करत यंदाच्या आयपीएल टी-20 चषकावर आपले नाव कोरले. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो वॉटसन. त्याने नाबाद रहात 57 चेंडून 8 षटकार व 11 चौकारांची आतषबाजी  करत 117 धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीच्या जोरावरच हैद्राबादवर चेन्नईला सहज विजय मिळवता आले. चेन्नईचे आयपीएलमधील हे तिसरे विजेतेपद ठरले. यापूर्वी चेन्नईने 2010 व 2011 मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांच्यावर दोन वर्षांची बंदी आली होती. बंदीनंतर यावर्षीच्या हंगामात चेन्नईने पुनरागमन केले.
Monday, May 28, 2018 AT 09:06 PM (IST)
कुस्तीगीर राहुल आवारेला सुवर्ण, सुशीलचाही विक्रम 5गोल्ड कोस्ट, दि. 12 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट  येथे सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आठवा दिवस  भारताच्या कुस्तीगीरांनी गाजवला. महाराष्ट्राच्या राहुल आवारेने पदार्पणातच कुस्तीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. अनुभवी कुस्तीगीर सुशीलकुमारनेही सुवर्णपदक पटकावताना सलग तिसर्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचा पराक्रम केला. भारताच्या कुस्तीगीरांनी आज एकूण चार पदकांची कमाई केली. राहुलने 57 किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टीव्हन ताकाहाशीवर 15-7 अशी मात करत भारताला आजच्या दिवसातील आणि कुस्तीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. शेवटच्या फेरीत ताकाहाशीने लढत देण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने त्याचा डाव उलटवत सुवर्णपदकावर नाव कोरले. राहुलने सुवर्णपदक जिंकल्यानंतर पुण्यात त्याचे प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीत मल्लांनी जल्लोष केला. आपण पाहिलेले स्वप्न राहुलने पूर्ण केल्याबद्दल काका पवार यांनी समाधान व्यक्त केले.
Friday, April 13, 2018 AT 08:40 PM (IST)
5गोल्ड कोस्ट, दि. 10 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेचा सहावा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. 10 मीटर पिस्तूल प्रकारात हुकलेले सुवर्णपदक नेमबाज हिना सिद्धूने 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले. पॅरा-पॉवरलिफ्टर सचिन चौधरीने कांस्यपदक मिळवून भारताच्या पदकसंख्येत एकाची भर घातली. मात्र, या व्यतिरिक्त भारताला एकही पदक मिळवता आले नाही. भारताच्या मुष्टियोद्ध्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आणखी सहा पदके निश्‍चित झाली आहेत. भारताची एकूण पदकसंख्या 20 झाली असून त्यात 11 सुवर्ण, चार रौप्य व पाच कांस्यपदकांचा समावेश आहे. हिना सिद्धूने बेलमाँट शुटिंग सेंटरवर 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने स्पर्धा विक्रम नोंदवताना अंतिम फेरीत 38 गुण मिळवले. हिनाचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक आहे. या आधी तिने 10 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी एकूण 8 पटके मिळवली. भारताला दिवसातील दुसरे पदक पॅराअ‍ॅथलीट सचिन चौधरीने मिळवून दिले. पॅरा-पॉवरलिफ्टर सचिनने एकूण 181 किलो वजन उचलून कांस्यपदक मिळवले.
Wednesday, April 11, 2018 AT 08:51 PM (IST)
1 2 3
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: