Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 200
मुख्याधिकारी, आरोग्य सभापतींच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित 5सातारा, दि. 12 : सोनगाव कचरा डेपोतील कचर्‍याच्या प्रदूषणाने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सलग दुसर्‍या दिवशीही सातारा शहरातून कचरा गोळा करून आलेल्या गाड्या रोखून धरल्या. ग्रामस्थ कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर  मुख्याधिकारी शंकर गोरे, आरोग्य समितीचे सभापती यशोधन नारकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ग्रामस्थांना कचरा डेपोतून येणारा धूर बंद करण्याचा शब्द त्यांनी दिला. त्यामुळे सकाळपासून थांबवून ठेवलेल्या गाड्या ग्रामस्थांनी दुपारी सोडल्या.   सोनगाव कचरा डेपोत साठवल्या जात असलेल्या कचर्‍याचा जकातवाडी, सोनगाव आणि इतर गावांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. त्यातच कचरा पेटल्याने होत असलेल्या धुराने तर ग्रामस्थांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.    धुरामुळे ग्रामस्थांना जोरदार खोकला येवू लागला. त्यांचे डोके दुखू लागले. आपल्या समस्यांकडे कोणीही लक्ष देणार नाही हे लक्षात घेवून रविवारी  त्यांनी आंदोलन केले. आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
Tuesday, November 13, 2018 AT 09:13 PM (IST)
5सातारा, दि. 11 :  आरटीओ चौकातील सार्वजनिक बांधकाम वसाहतीत शनिवारी दुपारी चोरट्यांनी बंद दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरातील 10 हजार रुपये लांबवले. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुल गणपत तुपे (वय 43) हे  कामानिमित्त शनिवारी घरातून बाहेर गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. चोरट्याने त्यांच्या घराच्या बंद दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि घरातील  10 हजार रुपयांची रोकड लांबवली.
Monday, November 12, 2018 AT 09:18 PM (IST)
5सातारा, दि. 11 : सातारा शहरा-पासून जवळच असणार्‍या सोनगावच्या हद्दीतील सातारा नगरपालिकेच्या कचरा डेपोला शनिवारी आग लागल्याने संपूर्ण कचरा डेपो परिसराबरोबरच संपूर्ण सोनगाव व जकातवाडी परिसरात धुराचे लोट पसरले. धुराने हैराण झालेल्या परिसरातील नागरिकांनी चक्क घंटागाड्याच रोखून धरल्या. दोन्ही गावातील ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे कचर्‍याचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सातारा पालिका प्रशासनास सोमवारपर्यंत योग्य निर्णय घेण्यासाठी मुदत दिली आहे. कचरा ढिगारे पेटविण्याचे बंद केले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.  गेल्या अनेक वर्षांपासून सातारा शहरातील व उपनगरातील कचरा सोनगाव, जकातवाडी गावाच्या हद्दीत टाकला जात आहे. या कचर्‍यामुळे मोठी दुर्गंधी निर्माण होते. या गावातील नागरिकांनी हा कचरा डेपो अन्यत्र हलविण्यात यावा या मागणीसाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. मात्र, आतापर्यंत येथील नागरिकांना पालिका पदाधिकार्‍यांकडून आश्‍वासनाशिवाय काही दिले गेले नाही. कचरा डेपोत टाकण्यात येणारा कचरा पेटविला जात आहे. त्यामुळे धुराचे लोट निर्माण होत आहेत.
Monday, November 12, 2018 AT 09:14 PM (IST)
5सातारा, दि. 6 : कल्याणी शाळा परिसरातून अल्पवयीन युवकाचे दुचाकीवरुन अपहरण करुन त्याला विसावा नाका येथे नेवून मारहाण केल्या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्याची अनिकेत जाधव, संग्राम जाधव, यश जगताप, संग्राम चव्हाण, सिध्दार्थ जगताप, अनिरुध्द पवार (सर्व रा. सातारा शहर परिसर) अशी नावे आहेत. रणवीर राजेश पवार (वय 16, रा. सदरबझार) या युवकाने तक्रार दिली आहे. दि. 23 ऑक्टोबर सायंकाळी सहाच्या सुमारास मारहाणीची घटना घडली आहे. चप्पल पास करण्याच्या कारणातून संशयितांनी तक्रारदार युवकाचे दुचाकीवरुन अपहरण केले. संशयितांनी केलेल्या मारहाणीत रणवीर पवार याच्या डोळ्याला लागले आहेे.
Wednesday, November 07, 2018 AT 08:42 PM (IST)
ऐन दिवाळीत पाणी टंचाई 5सातारा, दि. 6 : ऐन दिवाळीत शाहूनगरवासीयांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागली. शहापूर पाणी योजनेत बिघाड झाल्याने शहराच्या काही भागात पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शहापूर योजनेमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठा होऊ शकला नाही, असे कारण पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
Wednesday, November 07, 2018 AT 08:31 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: