Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 252
5भुईंज, दि.17 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवार, दि. 16 रोजी सायंकाळी 7.15 च्या दरम्यान सॅन्ट्रो कारने रस्ता ओलांडणार्‍या पादचारी महिलेस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. सातारा येथे उपचारासाठी नेत असतानाच त्यांचे निधन झाले. याबाबत अधिक भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताराहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या सॅन्ट्रो कारने (क्र. एम. एच. 12 एएफ 5182)  रविवारी सायंकाळी 7.15 च्या दरम्यान रस्ता ओलांडणार्‍या गऊ रामचंद्र पवार (वय 52), रा.महिगाव, ता. जावली यांना जोरदार धडक दिल्याने त्या गंभीररीत्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सातारा येथे नेताना उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. या अपघाताची नोंद भुईंज पोलिसात झाली असून सपोनि. बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबर तपास करीत आहेत.
Tuesday, September 18, 2018 AT 11:40 PM (IST)
कराड डीवायएसपींच्या पथकाची कारवाई 5कराड, दि. 17 : कराडमध्ये पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या इंद्रजित माणिक सोनवणे (वय 19, रा. वाघज, ता. बारामती) याला कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. याबाबत माहिती अशी, इंद्रजित सोनवणे हा कराड येथे विनापरवाना पिस्तूल विकायला आला होता. याबाबत माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सापळा रचून सोमवारी दुपारी अडीच वाजता शनिवार पेठेतील चंदूकाका सराफ दुकानासमोर, खोडजाईदेवी मंदिरानजीक, कॅफे विहार येथे त्यास पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये खिशात अमेरिकन बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे सापडली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शेलार, सहाय्यक फौजदार राजेंद्र राऊत, हवालदार बी. आर. जगदाळे, अरुण दुबळे, पोलीस नाईक संतोष चव्हाण, जमादार, प्रवीण पवार, संदीप पवार, रामदास कांबळे, इमरान पटेल, सागर बर्गे, विजय माने, सौरभ कांबळे,    रमेश बरकडे, चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण यांनी ही कारवाई केली.
Tuesday, September 18, 2018 AT 11:29 PM (IST)
पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 5औंध, दि. 17 : पुसेसावळी, ता. खटाव येथील पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विष्णूपंत देव (वय 55) यांना सोमवारी सायंकाळी सहा वाजता चौकीत 15 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. देव हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना ही अवदसा आठवल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुसेसावळी दूरक्षेत्राच्या हद्दीतील तक्रारदाराची म्हैस चोरीस गेल्या प्रकरणी औंध पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील चोरीस गेलेली म्हैस परत मिळवून दिल्याबद्दल 15 हजार रुपयांची मागणी उपनिरीक्षक देव यांनी तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयात याबाबत अर्ज दिला होता. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी  सकाळपासून पुसेसावळीत सापळा रचला.
Tuesday, September 18, 2018 AT 11:28 PM (IST)
5कराड, दि.14 : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी सुभाष अशोक माने (रा.आंबेगाव, ता.कडेगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुभाष माने हा खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून काम करतो. मुंबई ते कोल्हापूर ट्रॅव्हल्स घेवून येत असताना त्याची सदर महिलेशी ओळख झाली. त्याने तिचा मोबाईल नंबर घेवून तिला फोन केला. मला तू खूप आवडतेस, आपण लग्न करू, असे तो म्हणाला. यानंतर त्याने सदर महिलेस ट्रॅव्हल्स-मधून कराडला आणले व येथील  बसस्थानकानजीक असणार्‍या लॉजवर नेवून तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवले. यानंतर कोल्हापूर व अन्य ठिकाणी नेवून पुन्हा अत्याचार केले. महिलेने लग्नाची गळ घातली असता लग्नास त्याने विरोध केल्याने महिलेने मानखुर्द मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा गुन्हा तपासासाठी कराड शहर पोलिसाकडे वर्ग करण्यात आला आहे.
Saturday, September 15, 2018 AT 08:38 PM (IST)
5कराड, दि.14 : विवाहितेच्या खूना प्रकरणी वेगाने तपास करत कराड पोलिसांनी तिच्या नवर्‍याला अटक केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्यामुळेच तिचा  काटा काढल्याची कबुली त्याने पोलिसां-समोर दिली. मोनिका रघू नायक असे मृत विवाहितेचे तर रघू नायक असे पतीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मोनिका ही पती रघूसह कराड बसस्थानकासमोरील इमारतीच्या एका खोलीत रहात होती. मोनिकाचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर येताच पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्निल लोखंडे यांनी तपासाची चक्रे फिरवली. विवाहितेचा खून तिच्या पतीनेच केल्याचा संशय बळावल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार राजेंद्र पुजारी, सचिन साळुंखे, सचिन गुरव यांचे पथक कर्नाटकात रवाना झाले. बेल्लूर तालुक्यातील तट्टेली गावात तीन ठिकाणी छापा टाकून संशयिताचा शोध घेतला. मात्र तो पसार झाला. त्यानंतर नातेवाइकांच्याकडील चौकशीनुसार पोलिसांनी हसन, बेंगलोर, अल्लूर, कृष्णपुरी या भागात शोध घेतला.
Saturday, September 15, 2018 AT 08:24 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: