|
|
|
|
|
|
|
राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात झालेल्या शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा, या स्पर्धा सुरु व्हायच्या आधीच झाला होता. संयोजन समिती, संयोजन समितीचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांच्यासह अनेकांवर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तरीही निर्लज्जपणे कलमाडी आपण निष्कलंक असल्याचा डांगोरा पिटत होते. स्पर्धेतही त्यांनी मिरवून घेतले. सीबीआयच्या चौकशीत कलमाडी आणि टोळीने केलेल्या भ्रष्टाचाराचे सज्जड पुरावे सापडले.
Monday, February 06, 2012 AT 02:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
न्या. अशोक गांगुली स्वातंत्र्यानंतरच्या काळात घडलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या प्रकरणी ऐतिहासिक निर्णय देणारे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक गांगुली निवृत्त झाले आहेत. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी, बेकायदेशीरपणे झालेल्या परवान्यांचे हे वाटप पूर्णपणे रद्द केल्याचा निर्णय देऊन, भ्रष्ट मंत्र्याला संरक्षण देणाऱ्या केंद्र सरकारच्या अब्रूच्या चिंध्या चिंध्या केल्या.
Saturday, February 04, 2012 AT 01:18 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वंदना सूर्यवंशी अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात जगात आघाडीवर असलेल्या अमेरिकेतल्या "नासा' संस्थेच्या अंतराळ प्रशिक्षण कार्यक्रमात वंदना सूर्यवंशी यांची निवड झाल्याचे अवघ्या चारच दिवसांपूर्वी जाहीर झाले आणि या शिक्षिकेचा एका दिवसात जगभर नावलौकिक झाला. पुण्याच्या विद्या व्हॅली या शाळेत गेली वीस वर्षे त्या जीवशास्त्र आणि भूगोल, सामान्य विज्ञान हे विषय शिकवतात.
Friday, February 03, 2012 AT 12:44 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
मणिपूर मुख्यमंत्री एबोली सिंग यांच्या नेतृत्वाखालच्या सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीला तृणमूल कॉंग्रेसने कडवे आव्हान दिल्याने, मणिपूरच्या विधानसभा निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली आहे. 2007 मधल्या निवडणुकीत कॉंग्रेसने साठ पैकी तीस जागा जिंकून अन्य घटक पक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली. त्या निवडणुकीत मणिपूर पीपल्स पार्टीला फारसे यश मिळालेले नव्हते.
Wednesday, February 01, 2012 AT 11:39 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आंध्रप्रदेश आंध्र प्रदेशचे गृह सचिव बी. पी. आचार्य यांना, गृह निर्माण आणि भूखंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केल्याने, या राज्यातल्या प्रशासनातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले आणि अटक करून न्यायाधिशांच्या आदेशानुसार कोठडीत ठेवले आहे. 2005 ते 2010 या काळात आचार्य आंध्र प्रदेश इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर कार्पोरेशनचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक होते.
Wednesday, February 01, 2012 AT 12:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात सर्वच्या सर्व आठच्या आठ कसोटी सामने हरलेल्या भारतीय क्रिकेट संघाने देशाच्या अब्रूचे अक्षरश: धिंडवडे काढले.
Monday, January 30, 2012 AT 09:39 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
डॉ. अभय बंग प्रचंड पैसा मिळवायच्या ध्येयानेच गेल्या काही वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. लक्षावधी रुपयांची वार्षिक फी भरुन एमबीबीएस आणि त्यानंतर एमएस, एमडी झालेले बहुतांश डॉक्टर स्वत:चे रूग्णालय सुरू करतात आणि प्रचंड पैसा कमावतातही! सरकारी नियमानुसार दोन वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा करायचीही त्यांची तयारी नसते.
Saturday, January 28, 2012 AT 12:34 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
मध्यप्रदेश राज्याच्या वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालायसाठी कडक तरतुदींचा समावेश असलेल्या मध्यप्रदेश विशेष न्यायालय विधेेयकाच्या मंजुरीत केंद्र सरकारने घातलेल्या कोलदांड्यामुळे नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या वर्षभरात मध्यप्रदेशातल्या लाचखोर शिपायापासून ते आयएएस अधिकाऱ्यापर्यंत लोकायुक्तांनी छाप्यांचे सत्र सुरू केले.
Thursday, January 26, 2012 AT 01:21 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सशस्त्र नक्षलवाद्यांच्या टोळ्यांचा बिमोड करायसाठी झारखंड पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे, थंडावलेल्या नक्षलवादी टोळ्यांनी अलिकडेच गढवा विभागात तेरा पोलिसांना ठार करून, राज्य सरकारला आव्हान दिले आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या गढवा विभागातील भंडरिया गावाजवळ सुरुंगाचा स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी, पोलिसांवर तुफानी गोळीबार केला.
Wednesday, January 25, 2012 AT 11:55 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
बापजाद्यांनी मिळवून ठेवलेल्या पैशाच्या श्रीमंतीचा माज चढलेले काही युवक, भरधाव वेगाने मोटारी चालवतात. लक्षावधी रुपये किंमतीच्या मोटारी भरधाव चालवताना त्यांना पायी जाणाऱ्यांची, गरीबांची काही पर्वा राहिलेली नाही. मुंबई, पुणे, ठाणे, या महानगरात तर अशी श्रीमंतांची माजुर्डी मुले, दारु पिऊनही सर्रास मोटारी चालवतात. त्या नशेत त्यांचे मोटारींवर नियंत्रण राहत नाही. अपघात होतात. काही निरपराध्यांचे बळीही जातात.
Tuesday, January 24, 2012 AT 04:41 PM (IST)
|
|
|
|
|
|
|