Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्यपान  >>  विभागीय वार्ता

  फलटण, दि. 5 : श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेबानंतर तालुक्याच्या विकासाची दृष्टी असलेले खंबीर नेतृत्व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या रुपाने तालुक्याला लाभल्याने गेल्या 20 वर्षात तालुक्याचा विकास मार्गी लागला आहे. विरोधकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आपल्यावर टीका करण्याशिवाय काम शिल्लक राहिले नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

Monday, February 06, 2012 AT 03:35 AM (IST)

  कराड, दि. 5 : पंचायत समितीच्या विंग गणातील वांग खोरे विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार बबनराव आप्पा उर्फ वसंतराव बाबुराव शिंदे यांनी केलेल्या कामाच्या आधारे आणि निष्कलंक, स्वच्छ, नि:स्वार्थी प्रतिमेमुळे आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असा विश्वास असला तरी  त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव व वाड्यावस्त्यांवर "होम टू होम' जाऊन मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Monday, February 06, 2012 AT 03:36 AM (IST)

वाई, दि. 5 ः कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून तालुक्याचा विकासही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्याला आणखी गती येऊन तालुका सुजलाम्‌ सुफलाम्‌ होण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांनी केले.  राष्ट्रवादीच्या बावधन गटातील उमेदवार सौ. अरुणादेवी पिसाळ, गणातील उमेदवार सौ. अश्विनी मांढरे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.

Monday, February 06, 2012 AT 03:40 AM (IST)

कोरेगाव, दि. 5 : कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी दिलेली साथ, उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून कोरेगाव गटामध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मार्गी लावली आहेत. जरंडेश्वर साखर कामगार संघाच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून 650 कामगारांच्या जीवनात पुन्हा आनंद निर्माण केला आहे. कारखान्याचे कामगार, निष्ठावान कॉंग्रेस कार्यकर्ते, शेतकरी बांधव व युवा वर्गाच्या पाठबळावर कोरेगाव गटात कॉंग्रेसमय वातावरण तयार झाले आहे.

Monday, February 06, 2012 AT 03:33 AM (IST)

कराड, दि. 5 : दुग्ध व्यवसायात जनावर व्यवस्थापन महत्वाचे असल्याने कोयना दूध संघाने त्यादृष्टीने सामूहिक जंत निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला असून दूध उत्पादकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन संपतराव इंगवले यांनी केले. खोडशी येथे जनावरांचा सामूहिक जंत निर्मूलन कार्यक्रमाचा प्रारंभ, गोकुळ येथे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या पशुधन पर्यवेक्षकांना प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Monday, February 06, 2012 AT 03:32 AM (IST)

बारामती, दि. 5 ः  बारामती  तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हुकूमशाहीला व अरेरावीला जनता आता कंटाळली आहे. विकासाचा डंका पिटला जातो, परंतु विकास नक्की कोणाचा झाला जनतेचा की नेत्याचा हेही येथील मतदार ओळखून आहे.

Monday, February 06, 2012 AT 03:31 AM (IST)

फलटण, दि. 4 : कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि एकमेकांपासून दूर राहून सुरू असलेल्या संघर्षातून प्रत्येक निवडणुकीत होत असलेली मतविभागणी आणि कॉंग्रेसमधील एका गटाला बरोबर घेवून राष्ट्रवादीने गेली 20 वर्षे तालुक्यात सत्ता मिळवली. तथापि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत फलटणमध्ये कॉंग्रेस एकसंध झाल्याने कॉंग्रेसचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास स्वराज उद्योगु समूहाचे प्रमुख व युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला.

Sunday, February 05, 2012 AT 02:16 AM (IST)

वाई, दि. 4 : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील गाढवेवाढीचे युवा सरपंच रवी भिलारे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. रवी भिलारे व त्यांचे कुटुंबीय यांनी नेहमी कॉंग्रेसची पाठराखण केली.

Sunday, February 05, 2012 AT 02:10 AM (IST)

सौ. शुभांगी बर्गे व धनंजय बर्गे यांचा निर्धार कोरेगाव गटात विकासकामांद्वारे परिवर्तन घडविणार     राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोरेगाव गटात युवा नेतृत्व धनंजय रामकृष्ण बर्गे यांच्या पत्नी सौ. शुभांगी बर्गे यांना, कोरेगाव गणात युवा संघटक व ग्राम-पंचायतीचे माजी सदस्य मनोज रवींद्र येवले यांना तर ल्हासुर्णे गणात कोरेगावचे उपसरपंच जयवंत राजाराम पवार यांना उमेदवारी दिली आहे.

Sunday, February 05, 2012 AT 02:07 AM (IST)

तरडगाव, दि. 4 : आपण कोणाविरुध्द नव्हे तर विकासापासून वंचित राहणाऱ्या तालुक्याचा सर्वांगीण विकास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेसच्या माध्यमातून करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सत्तेचे साधन कॉंग्रेसच्या हातामध्ये देण्याची आवश्यकता जनतेला पटवून देण्यासाठी या निवडणुकीत सक्रिय सहभागी झाल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी केले. कॉंग्रेसच्या तरडगाव गटातील उमेदवार सौ.

Sunday, February 05, 2012 AT 02:03 AM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: