|
|
|
|
|
|
|
उन्हे बज्म में बेखबर देखते है। त्यांचे लक्ष बाह्य जगातून दूर होते, त्यांचा आत्मा एकवटला जातो, त्यांचे ध्यान अंतर्मुख होते. बाह्य जगाकडे त्यांचे काहीही लक्ष नसते. म्हणून बऱ्याचवेळा आम्हाला असे दिसते, की कित्येत बंधु-भगिनी जेव्हा ते परमसंत कृपालसिंहजी महाराज किंवा दयाल पुरुष संत दर्शनसिंहजी महाराज यांचे समोर येत असत, तर तेव्हा त्यांना कसले भान रहात नसे, की चप्पल घातली आहे किंवा नाही, अनवाणी पळत जात असत. ऊन पडलेले आहे. मंडप घातलेला आहे.
Monday, February 06, 2012 AT 02:39 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आम्ही प्रभूंना बाह्य रुपाने पहातो आणि आपल्या बुध्दीच्या जोरावर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आमच्या हे लक्षात येत नाही, की आध्यात्माचा मार्ग बुध्दीने समजण्याजोगा नाही. या जगात आम्ही सर्वकाही बुध्दीच्या स्तरावर करत असतो. म्हणून महापुरूषांना सुध्दा आम्ही बुध्दीच्या स्तरावर समजण्याचा प्रयत्न करतो. बाह्य रूपाकडे आम्ही त्यांच्याकडे जेव्हा पहातो तेव्हा काही ना काही ठसा आमच्यावर पडण्यास प्रारंभ होतो. परंतु या शेरमध्ये त्याबाबत बोलले जात नाही.
Sunday, February 05, 2012 AT 12:57 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
जेव्हा आमच्या सद्गुरुची दृष्टी आमच्यावर पडते तेव्हा आमच्या आत्म्याचे सौंदर्य आणखी वाढते. ते अधिक तेजस्वी होते आणि पवित्र होते आणि जस जसा आत्मा पवित्र होतो, तो प्रभूप्राप्तीच्या मार्गावर वेगाने धावण्यास सुरुवात करतो. आम्हाला काय करायचे असते. आपल्या आत्म्याला देहभासाच्या वर आणायचे आहे आणि एके ठिकाणी महाराजजीने सांगितले आहे. मिलेगा, रुह को परवाज दे के देख जरा। करीब है, उसे आवाज दे के देख जरा।। परमात्मा आम्हाला अवश्य भेटेन.
Saturday, February 04, 2012 AT 01:22 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आम्हाला ठाऊक आहे, की आम्हाला आपले ध्येय गाठावयाचे आहे. आम्हाला माहित आहे, की आम्हाला प्रभूप्राप्ती करून घ्यायची आहे. आम्हाला माहित आहे, की आम्ही आत्मा आहोत, शरीर नाही परंतु तरीही आम्ही काय करतो? जगातील आवाज ऐकत रहातो. घरातील हे काम करायचे आहे, बाजाराचे हे काम करायचे, ऑफिसचे हे काम करायचे आहे, दूरध्वनीचे बील भरायचे आहे, लाईट बील भरायचे आहे. या कामातच आम्ही गुंतलेले असतो. आम्ही त्यामुळे सत्यापासून खालच्या स्तरावर येतो.
Friday, February 03, 2012 AT 12:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
परमात्म्याला शोधण्यासाठी  निघालो होतो. परंतु आम्हाला ते समजत नाही. कारण, की तो मार्ग अंतरी जाण्याचा मार्ग आहे. आमची पावले कधी इकडे वळतात तर कधी तिकडे वळतात. आम्ही खरे काय ते ओळखू शकत नाही. वारंवार महापुरुष आम्हाला हेच समजावून सांगतात, की आम्ही सत्याची कास धरली पाहिजे. सत्य आमच्या अंतरीच आहे.
Thursday, February 02, 2012 AT 01:20 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आम्ही पाषाणाच्या दरवाजाकडे लक्ष देऊन चालतो. जे प्रभूच्या पूजनासाठी इमारती बनविलेल्या असतात त्या कशा बनतात? जेव्हा महापुरुष या जगात येतात जसे महात्मा बुध्द आले, गुरु नानक देवजी महाराज आले, ईसा मसीह आले, मोहम्मदजी आले, भगवान महावीरजी आले आणि कित्येक महापुरुष आले. ते जेव्हा या जगात येतात ते सर्वांना प्रभूकडे ध्यान ठेवण्यास सांगतात ते काही नवीन मत चालविण्यासाठी आलेले नसतात.
Wednesday, February 01, 2012 AT 01:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सद्गुरुच्या भौतिक स्वरूपात एवढे सौंदर्य आहे, अंतरी सदगुरूच्या प्रकाशमय स्वरूप इतके देखणे आहे, सत्यलोकांतही सदगुरूचे इतके देखणेपण आहे की त्यांच्याकडे सूर्य चंद्रही पहातात, त्यांच्याकडे इतर मंडळांचे सूर्य चंद्र तेही पहातात, कारण सदगुरूंची चमक ही त्यांच्याहून कितीतरी जास्त आहे.
Monday, January 30, 2012 AT 09:41 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आपण जेव्हा आपल्या अंतरी सदगुरूंचे दिव्य स्वरूप पहातो तेव्हा ते अगदी आपल्यासमोर बसलेले असतात. बाहेर काय असते की एवढे लोक असतात, कोणी इथे बसलेले आहे, कोणी तेथे बसलेला आहे, कोणी लांबून पहात आहे. परंतु अंतरी मात्र ते अगदी आमच्या समोरासमोर असतात. आमच्या अंगसंग आहे.
Saturday, January 28, 2012 AT 09:05 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
आम्ही आध्यात्मिक मार्ग जाणून घेतला पाहिजे. तो आम्ही कसा आत्मसात करू शकतो? जेव्हा आम्ही योग्य बनतो. तेव्हा त्यांच्याकडून ते आमच्याकडे येत आहे ते आम्हाला मिळेल. आपण त्यांच्यासमोर बसल्यानंतर आपण याबद्दल विचार करू लागलो, त्याच्याबद्दल विचार करू लागलो. याच्याबद्दल बोलत राहिलो.
Saturday, January 28, 2012 AT 12:36 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
ज्यामध्ये दयाभाव आहे, ज्यामध्ये प्रेम आहे, तेच सुंदर असते. जेव्हा सदगुरुंच्या सौंदर्याविषयी बोलले जाते तेव्हा ते बाह्यरूपाविषयी बोलले जात नाही. परंतु जी मदत आम्हाला त्यांच्याकडून मिळते त्याविषयी बोलले जाते. कोणती मदत मिळते? जी खरी मदत आहे ज्याद्वारे आम्ही स्वत:ला ओळखतो. आम्ही तर बाहेरचीच मदत मागत असतो. आम्ही म्हणत असतो. मी आजारी आहे. माझी आई आजारी आहे. आमचा अपघात झाला. आमची उद्या परीक्षा अहे. माझी परीक्षा झालेली आहे.
Thursday, January 26, 2012 AT 01:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|