|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : शाहूपुरीतील जनता सुज्ञ आहे. शाहूपुरीचा विकास करण्यासाठी व हुकूमशाही प्रवृत्तींना घरी बसवण्यासाठी शाहूपुरीतील जनता सज्ज झाली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार सतीश सूर्यवंशी यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शाहूपुरीच्या माजी सरपंच सौ. अनुराधा लिमये यांनी व्यक्त केला. शाहूपुरी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सतीश सूर्यवंशी यांच्या शाहूपुरीतील प्रचार यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Sunday, February 05, 2012 AT 02:04 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत दाखल झालेल्या निवडणूक याचिकांवरुन शनिवारी नागठाणे गटातील अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी कुणीही अर्ज माघारी घेतला नाही. त्यामुळे तेथील अर्ज माघारी घेण्याची मुदत दि. 6 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे तर याच गटातील उमेदवारांनी दि. 7 रोजी मतदान घ्यावे, अशा मागणीची केलेली याचिका राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव डॉ. अ. द. कोल्हे यांनी फेटाळतानाच, येथील मतदान दि.
Sunday, February 05, 2012 AT 02:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा दि. 7 रोजी दुपारी 4.30 वाजता सुमित्राराजे उद्यान येथे घेण्यात आली आहे. सभेत कराड अर्बन बॅंकेच्या ट्रस्टी विभागाचे अधिकारी योगेश वेलणकर यांचे ज्येष्ठांच्या इच्छा पत्राच्या कायदेशीर बाजू यावर उद्बोधक माहितीपर व्याख्यान होणार आहे. सभेस बॅंकेचे ज्येष्ठ संचालक सी. व्ही. दोशी व सदरबझार शाखेचे व्यवस्थापक सचिन कोडगुले उपस्थित राहणार आहेत.
Sunday, February 05, 2012 AT 01:43 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ऍन्ड रिसर्च येथे दि. 9 रोजी सकाळी 10 वाजता डिजीट 2012 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन प्रोग्रामिंग, ऑनलाईन गेमिंग व आय. टी. प्रोजेक्ट प्रेझेंटेशन अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.    
Sunday, February 05, 2012 AT 01:42 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : गोळीबार मैदान येथील विश्वकर्मा सहकारी गृहनिर्माण संस्था येथे दि. 5 रोजी विश्वकर्मा जयंती सोहळा साजरा केला जाणार आहे. यावेळी विश्वकर्मा मंदिराच्या चौकटीचे पूजनही केले जाणार आहे. सोहळ्यानिमित्त पहाटे 5 वाजता प्राणप्रतिष्ठापनेने कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. सकाळी 8 वाजता सत्यनारायण पूजा, 9 ते 9.45 विश्वकर्मा महिला बचत गटातर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम, सकाळी 10 ते 11.
Sunday, February 05, 2012 AT 01:41 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : प्रतापगंज पेठ येथील सह्याद्री करिअर ऍकॅडमीतर्फे दि. 5 रोजी सायंकाळी 5 वाजता पीएसआय, एसटीआय व असिस्टंट या पदाच्या पूर्व आणि मुख्य तसेच राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षांबाबत मोफत कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्ह्यातून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
Sunday, February 05, 2012 AT 01:38 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : कोडोली गट व गण आणि गोडोली गणात राष्ट्रवादीचे मनोमीलनाचे उमेदवार रवी साळुंखे, आनंदराव कणसे व सौ.वनिता कण्हेरकर यांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेत संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला  आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने कोडोली गटांतर्गत येणाऱ्या गणामध्ये मनोमीलनाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा झंझावात निर्माण झाला आहे. कोडोली गट व गणात खा. उदयनराजे भोसले, आ.
Sunday, February 05, 2012 AT 01:35 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
संतोष जाधवांना ताकद देण्याचे ना. सतेज पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन सातारा, दि. 4 : संतोष जाधव हे तरुण व तडफदार युवा नेते आहेत. त्यांनी समाजकारणासह राजकारणातील अनेक पावसाळे पाहिले असल्याने त्यांना खऱ्या अर्थाने विकासाची जाण आहे. संतोष जाधव यांच्या विजयामुळे केवळ देगाव गटाचाच कायापालट होणार नसून राज्यात देगाव गट विकासाचे रोल मॉडेल ठरणार आहे.
Sunday, February 05, 2012 AT 01:34 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 10 जून रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा व 2012 मध्ये होणाऱ्या पीएसआय, एसटीआय, एएसएसटी पूर्व परीक्षेसाठी येथील विद्यानिकेतन करिअर ऍकॅडमीतर्फे दि. 6 पासून सकाळी 8 ते 10 व सायंकाळी 6 ते 8 या वेळेत मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
Sunday, February 05, 2012 AT 01:33 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 4 : शाहूपुरी पंचायत समिती गणातील प्रश्न सोडवण्यासाठी जनतेला वेळ देणारा उमेदवार हवा आहे. तुमच्याकडे जनतेला देण्यासाठी वेळ आहे. ज्याच्याकडे जनतेसाठी वेळ आहे, तोच जनतेचे प्रश्न सोडवू शकेल.  त्यामुळे शाहूपुरी विभागाचा नियोजनबध्द विकास करण्यासाठी तुम्ही निवडणूक लढवलीच पाहिजे, अशा जनतेने केलेल्या आग्रहामुळेच मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे, असे प्रतिपादन शाहूपुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य व अपक्ष उमेदवार दिलीप कडव यांनी केले.
Sunday, February 05, 2012 AT 01:19 AM (IST)
|
|
|
|
|
|
|