|
|
|
|
|
|
|
मुंबई वार्तापत्र/अभय मांडवेकर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात दोन्ही कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मर्यादा ओलांडत परस्परांचे कपडे फाडायचा उद्योग सुरु केल्याने, "वस्त्रहरणा'चा हा तमाशा जनतेला फुकटात पहायला मिळतो आहे. या कलगीतुऱ्याने सरकारच्या अब्रूचे धिंडवडे निघत आहेत, याचे भान या नेत्यांना नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणाऱ्या दोन कॉंग्रेसमधल्या कुरघोड्या आता वस्त्रहरणापर्यंत पोचल्या आहे.
Monday, February 06, 2012 AT 02:44 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुका अत्यंत चुरशीने होत असून काही निकाल धक्कादायक लागण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही एका पक्षास स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता "धुसर' असून निवडणूक निकालानंतर  ना. हसन मुश्रीफ व ना. सतेज पाटील हे राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही कॉंग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करणार की विजयी होणाऱ्या इतर पक्षीय व अपक्षांना हाताशी धरुन सवतासुभा स्थापणार, हाच खरा महत्त्वाचा मुद्दा आहे.
Saturday, February 04, 2012 AT 01:20 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  एस. बॅंड प्रकरणात देशातल्या चौघा ज्येष्ठ शास्त्रज्ञांची अवहेलना करणारा आदेश जारी करण्यात आला. त्यातून पंतप्रधान कार्यालयाचा गलथानपणा नव्याने दिसून आला. या प्रकरणात आता सरकारवर या चौघांची माफी मागण्याची आपत्ती आली आहे.
Friday, February 03, 2012 AT 12:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे सत्र झाले. त्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि आघाडीतील जोडीदार पक्ष कॉंग्रेसमधून मातब्बर नेत्यांना फोडून राष्ट्रवादीने आपल्या पक्षात प्रवेश दिला. याचा आता फारसा उपयोग होणार नसला तरी नंतरच्या काळात पक्षाच्या मजबुतीसाठी तो करून घेता येईल, असे अजित पवार यांना वाटते. त्यासाठी पक्षात प्रवेश दिलेल्यांना तेवढा सन्मानही द्यावा लागणार आहे.
Wednesday, February 01, 2012 AT 11:40 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
पंजाब विधानसभेच्या निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले. सर्वधारणपणे या निवडणुकीत हरियाणातील सिरसा येथील डेरा सच्चा बाबा या धर्मपीठाची भूमिका निर्णायक ठरते. 2007 च्या निवडणुकीत या धर्मपीठाने कॉंग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे त्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या. यावेळी मात्र या पीठाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे कॉंग्रेस नेते हवालदिल झाले होते. आता मतपेटीत काय चमत्कार घडतो ते पहायचे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न झाले.
Wednesday, February 01, 2012 AT 12:56 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
नुकत्याच पार पडलेल्या जयपूर येथील साहित्य जत्रेत सलमान रश्दींच्या उपस्थितीच्या निमित्ताने वादंग निर्माण झाले. चर्चेचे हे वादळ साहित्य जत्रेपुरते सिमीत राहिले नाही तर मुस्लीम संघटनांनी रश्दींच्या भारतात येण्यासच  विरोध केला आणि सरकारने ते येणार नाहीत, अशी व्यवस्था करून मुस्लिमांची मने आणि मते राखली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा राग जयपूरमध्ये गाजला खरा पण तो लगेचच विरुनही गेला हे देखील तेवढेच खरे. कलेचा मुक्त अविष्कार साकारतो तो कलाकार.
Monday, January 30, 2012 AT 09:40 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
पाकिस्तानमधील सत्ताधाऱ्यांवर प्रभुत्व ठेवण्याचा तेथील लष्कराचा नेहमीच प्रयत्न राहिला. त्यातून लष्कर आणि सरकारमध्ये अनेक संघर्ष निर्माण झाले. आता मात्र सत्ताधारी लष्कराचा हस्तक्षेप मानायला तयार नाहीत. सामाजिक संघटनाही लष्कराच्या वर्चस्वाला विरोध करत आहेत. त्यातून एखादा उठाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजवर अशा उठावांमध्ये लष्कराचीच सरशी झाल्याचा इतिहास नजरेआड करता येत नाही.
Saturday, January 28, 2012 AT 12:35 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
राज्यातील या वेळच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका विविध कारणांमुळे लक्षात राहणार आहेत. आयाराम-गयारामांची वाढलेली संख्या आणि कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था ही या मागील प्रमुख कारणे म्हणता येतील. या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे दिसून आले. आता पक्षात आलेल्यांना दिलेली आश्वासने पाळणे आणि निष्ठावंतांना सांभाळण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
Thursday, January 26, 2012 AT 01:22 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
  फलज्योतिष्य हे शास्त्र नव्हे असे जाणकार म्हणतात. कारण त्या शास्त्राला पूरक ठरणारे आधार कोठेच मिळत नाहीत. आपल्या देशात मात्र अजूनही या गोष्टीला महत्त्व दिले जाते. पुण्याच्या धायरी भागातील पालकर यांनी कुंडलीतील ग्रहदशेवर विश्वास ठेवून पत्नीचा आणि मुलांचा खून केला आणि स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेच आता मृत्यूशी झुंज देत आहेत. कधी थांबणार हे दुर्दैवी बळी? अलिकडेच पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली.
Wednesday, January 25, 2012 AT 11:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
देशाने कृषी क्षेत्रात भरीव प्रगती केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येते. विशेषत: 1965 मधील हरितक्रांतीनंतर अन्नधान्य तसेच भाजीपाला आणि फुलांच्या उत्पादनातील वाढीची कल्पना येणारी काही आकडेवारी जाहीर केली जाते. मग अशी उत्तम स्थिती असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत, असा प्रश्न पडतो. त्याचे साधे उत्तर म्हणजे सरकारने या क्षेत्राचे उभे केलेले चित्र प्रत्यक्षात फसवे आहे. डॉ. एम. एस.
Tuesday, January 24, 2012 AT 04:40 PM (IST)
|
|
|
|
|
|
|