|
|
|
|
|
|
|
मेलबर्न, दि. 3 (वृत्तसंस्था) : इंग्लंड दौऱ्यापासून परदेशात सतत मार खात असलेल्या टीम इंडियाने अखेर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्याच विजयाची चव चाखली. मेलबर्न क्रिकेट मैदानावर शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने कांगारुंवर 8 गड्यांनी सहज विजय मिळवला. अचूक गोलंदाजी व चपळ क्षेत्ररक्षणाला गौतम गंभीरचे अर्धशतक आणि सेहवाग, धोनी, कोहली यांच्या फटकेबाजीची साथ मिळाली.
Saturday, February 04, 2012 AT 02:27 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सामन्याची वेळ : दुपारी 2.05 सिडनी, दि. 2 (वृत्तसंस्था) : प्रदीर्घ काळ पराभवांची मालिका सुरू असल्याने घायाळ झालेल्या भारतीय क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलिया दौरा भयस्वप्न ठरला आहे. आता कसोटी मालिकेपाठोपाठ ट्वेंटी-20 मध्ये व्हाईटवॉश टाळण्यासाठी भारतीय संघाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. सिडनीच्या देखण्या एएनझेड स्टेडियमवर पराभव पत्करल्यानंतर उद्या मेलबर्न मैदानावर कांगारुंविरुध्द दुसरा ट्वेंटी-20 सामना होणार आहे.
Friday, February 03, 2012 AT 01:51 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सिडनी, दि. 1 (वृत्तसंस्था) : फॉरमॅटमधील बदल आणि संघात युवा खेळाडूंचा भरणा करुनही भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी मागील पानावरुन पुढे सुरू राहिली. कसोटी मालिकेत दारुण पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाच्या "यंग ब्रिगेड'नेही पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात कांगारुंपुढे सपशेल लोटांगण घातले. मॅथ्यू वेडचे झंझावती अर्धशतक आणि डेव्हिड हसीच्या घणाघाती फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 31 धावांनी विजय मिळवला.
Thursday, February 02, 2012 AT 02:07 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 31 : कराड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नुकत्याच झालेल्या आंतरडिप्लोमा सी-झोन क्रीडा स्पर्धेत सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी वेटलिफ्टिंग व कुस्तीमध्ये नेत्रदीपक यश मिळवले. वेटलिफ्टिंग स्पर्धेत 85 किलोवरील वजनी गटात प्रीतमकुमार दिलीप चव्हाण याने प्रथम तर 60 किलो वजनी गटात धनाजी शंकर वगैरे याने तृतीय क्रमांक पटकावला.
Wednesday, February 01, 2012 AT 01:44 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सिडनी, दि. 31 (वृत्तसंस्था) : इंग्लंडपाठोपाठ ऑस्ट्रेलियातही नामुष्कीजनक पराभवाचा धनी ठरलेला आणि कसोटी क्रिकेटमध्ये प्रभावहिन आणि सुमार प्रदर्शनामुळे टीकेचे लक्ष्य बनलेल्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मंगळवारी आपल्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याचे संकेत देताना, बीसीसीआयकडे जर माझ्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध असेल तर मी आपले हे पद सोडण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवार, दि.
Wednesday, February 01, 2012 AT 01:40 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सिडनी, दि. 31 (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात जोरदार पुनरागमनाच्या इराद्याने उतरण्याची शक्यता आहे. टीम इंडियासाठी आतापर्यंतचा पूर्ण दौरा एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे ठरला आहे. पण, एका विजयासह पुन्हा यशस्वितेच्या मार्गावर परतण्याच्या निर्धारानेच धोनी ब्रिगेडला उतरावे लागेल.
Wednesday, February 01, 2012 AT 01:41 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 31 : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नुकत्याच झालेल्या माहेश्वरी समाजाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये सातारच्या सोनिया राठीने विजेतेपद तर रोशनी डागाने उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम व बुध्दिबळ या क्रीडा प्रकारांचा समावेश होता. त्यामध्ये देशभरातील 300 ते 400 खेळाडू सहभागी झाले होते.
Wednesday, February 01, 2012 AT 01:42 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 31 : कार्वे, ता. कराड येथील किक बॉक्सिंगपटू अल्तमश इलाही आतार व कराटेपटू अजय धनाजी थोरात यांना श्रीलंकेत होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप मोझर यांनी नुकतीच प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत दिली. अल्तमश हा कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये इयत्ता 11 वीत शिकत आहे. त्याच्या वडिलांचे कार्वे गावात इलेक्ट्रिकल साहित्याचे छोटे दुकान आहे. तो किक बॉक्सिंग या प्रकारात 70 किलो वजनी गटात खेळतो.
Wednesday, February 01, 2012 AT 01:43 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
म्हसवड, दि. 31 : माणदेशी खेळाडूंनी स्वत:ला कमी लेखू नये अथवा गरीब समजू नये. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धांवर वर्चस्व गाजवणारा इथिओपिया हा देशही गरीबच आहे. या देशाच्या खेळाडूंप्रमाणे जिद्द व चिकाटी निर्माण केल्यास यश निश्चित मिळेल, असा विश्वास मिनी मॅरेथॉनचे मुख्य प्रवर्तक रमेश तावडे यांनी व्यक्त केला. येथील माणदेशी फौंडेशनच्या माणदेशी क्रीडा चॅम्पियन्सच्यावतीने नुकत्याच झालेल्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. आ.
Wednesday, February 01, 2012 AT 01:48 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कराड, दि. 31 :  येथील  डॉ. द. शि. एरम मूकबधीर विद्यालयातील खेळाडूंनी सातारा येथे सैनिक स्कूल  मैदानावर झालेल्या शासकीय जिल्हास्तरीय अपंग स्पर्धेत उत्तुंग यश मिळवले. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अपंग विभाग व समता शिक्षण प्रसारक मंडळातर्फे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
Wednesday, February 01, 2012 AT 01:46 AM (IST)
|
|
|
|
|
|
|