|
|
|
|
|
|
|
कराची, दि. 12 (वृत्तसंस्था) : पाकच्या राष्ट्रीय निवड समितीने एप्रिल-मे दरम्यान कॅरेबियन बेटांवर होणाऱ्या ट्वेंटी -20 विश्वचषक स्पर्धेसाठी अंतिम 15 जणांचा चमू शुक्रवारी जाहीर केला. मात्र या संघाच्या कर्णधारपदी कोणाचीही नेमणूक पीसीबीने जाहीर केली नाही. चौकशी समितीच्या शिफारशीनुसार उमेदवारीचा काळ भोगत असलेल्या शाहीद आफ्रिदी, कामरान अकमल व उमर अकमल या त्रिकुटाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
Saturday, March 13, 2010 AT 02:48 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई, दि. 12 (वृत्तसंस्था) : एक वर्षाच्या खंडानंतर पुन्हा मायभूमीत परतलेल्या आयपीएलच्या तिसऱ्या आवृत्तीचा उद्घाटन सोहळा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर धमाकेदार कार्यक्रमाने शुक्रवारी रात्री अभूतपूर्व उत्साहात झाला. थक्क करणारा लाईट अँड साऊंड शो, आंतरराष्ट्रीय बॅंडचे बेधुंद करणारे संगीत व बॉलीवूड स्टार दीपिका पदुकोनसह 40 कलाकारांची थिरकलेली पावले हे या रंगारंग सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.
Saturday, March 13, 2010 AT 02:47 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वाई, दि. 12 ः पाटणमध्ये कॉंग्रेसचे नेते सेनेच्या कार्यकर्त्यांना ताकत देण्याची भाषा करतात. त्यांनी धर्मनिरपेक्षकांना केलेली मदत आम्ही समजू शकतो. विचारांना तिलांजली दिल्यानेच नको त्या प्रवृत्ती फोफावत आहेत. तुम्ही जातीयवाद्यांना ताकत देण्याची भाषा करीत असाल तर आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. छातीची ढाल करून आमच्या कार्यकर्त्यांचे रक्षण करू, असा खरमरीत इशारा  गृहमंत्री ना. आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
Saturday, March 13, 2010 AT 02:40 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वाई (यशवंतराव चव्हाणनगर), दि. 12 : उर्वरित महाराष्ट्रावर कोणताही अन्याय होवू देणार नाही. उर्वरित महाराष्ट्राला निधी देवून तेथील कामे गतीने होण्यासंदर्भात राज्य पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. ती समिती योग्य तो निर्णय घेईल. कोणत्याही परिस्थितीत उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय होणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती.
Saturday, March 13, 2010 AT 02:37 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कराड, दि. 12 : इंग्रजीचे चार शब्द नीट वाचता येत नसलेल्या महाकवींनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यावर अनेक दर्जाहीन पुस्तके लिहिली असल्याचे सांगत महाराष्ट्रातील प्रत्येक नेता मतांसाठी स्व. चव्हाण साहेबांच्या नावाचा उपयोग करीत आहे. पण त्यांच्यामध्ये असणाऱ्या गुणांपैकी एकही गुण सध्याच्या  राजकारण्यांमध्ये नसून सत्तेसाठी राजकारण्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचे बाजारीकरण केले असल्याचे परखड मत  ज्येष्ठ साहित्यिक डॉ.
Saturday, March 13, 2010 AT 02:36 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
कराड, दि. 12 : पाठरवाडी, डेळेवाडी, गमेवाडी परिसरात धुमाकूळ  घालत असलेल्या बिबट्याने आपला मोर्चा आंबवडे, ता. कराड परिसरात वळवला आहे. गुरुवारी रात्री त्याने आंबवडेतील भिकाजी कृष्णा शेवाळे यांच्या दोन शेळ्यांचा फडशा पाडला. यामुळे कोळे, विंग परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत महिन्यापासून गमेवाडी, डेळेवाडी व पाठरवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दोन ग्रामस्थांसह एका युवकावर याच परिसरात हल्ला केला.
Saturday, March 13, 2010 AT 02:35 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा, दि. 12 : दूषित पाण्यामुळे प्रतापसिंहनगर येथे गेल्या तीन दिवसांपासून गॅस्ट्रोची साथ सुरु असून गुरुवारी रात्री 11 वाजता या साथीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना सौ.हिराबाई नामदेव कांबळे (वय 56) या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शुक्रवारी रुग्णालयाच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Saturday, March 13, 2010 AT 02:32 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वाई येथे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता शिबिराकडे दोन्ही भावांची पाठ, असे वृत्त राज्य पातळीवरील काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने शिबिर परिसरात मोठी चर्चा सुरु होती. त्यातच आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व्यासपीठावर उशिरा आगमन झाले. त्यामुळे ना. हसन मुश्रीफ यांनी अधिवेशनाकडे "दोघा भावांची पाठ' अशी हेर्डिंग्ज काढू नका, असे जाहीरपणे सांगितले. अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन कॅ.
Saturday, March 13, 2010 AT 02:26 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
वाई (यशवंतराव चव्हाणनगर), दि. 12 : कॉंग्रेसचे नेते किती दिवस कुबड्याघ्यायच्या असे सांगत स्वतंत्र निवडणुका लढवण्याची भाषा सातत्याने वापरत असतात. मात्र आमचीही स्वतंत्र लढायची तयारी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. कार्यकर्त्यांनीही आजपासूनच पुढच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्या लागतील अशा प्रकारे तयारी करावी, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांनी केली.
Saturday, March 13, 2010 AT 02:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
पावसापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्ष रहावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले आहे. किमान तापमान, सकाळी आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी यामध्ये असंतुलन झाल्यास हवामानात बदल जाणवतो. तापमानात अचानक वाढ झाल्यामुळेमार्च महिन्यात यावर्षी पाऊस पडू लागला आहे.
Saturday, March 13, 2010 AT 02:22 AM (IST)
|
|
|
|
|
|
|