Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गेला महिनाभर उत्तर भारतात थंडीच्या लाटेनं घातलेल्या थैमानानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं. शेकडो लोकांचे गारठून बळी गेले. काश्मीर-हिमाचल प्रदेशच्या काही भागाचा बाह्य जगाशी आठ दिवस संपर्कही तुटला होता. दरवर्षीपेक्षा यावर्षी हिवाळा अधिकच लांबल्याचा निष्कर्ष भारतीय हवामान खात्याच्या तज्ञांनी काढला.

Monday, February 06, 2012 AT 02:47 AM (IST)

विजेच्या वाढत्या वापराने, विजेची मागणीही सातत्याने वाढत राहिल्याने, जलविद्युत, औष्णिक आणि अणुभट्ट्यांद्वारे देशात निर्माण होणारी वीजही अपुरी पडते आहे. जलविद्युत निर्मितीला मर्यादा असल्यामुळे, हवी तेवढी वीज याद्वारे मिळू शकत नाही. अणु वीजनिर्मिती वाढली तरीही, ती सुध्दा पुरेशी ठरणार नाही, असे भाकित ऊर्जा तज्ञांनी केले आहे. औष्णिक वीज निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी कोळशाचे साठे आणखी काही वर्षांनी संपतील. वीज निर्मितीचे आणखी एक साधन बंद पडेल.

Saturday, February 04, 2012 AT 01:17 AM (IST)

केंद्रीय नियोजन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या कबुलीनुसार देशातल्या 120 कोटी लोकसंख्येतले 43 टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जगतात. त्यांचे उत्पन्न रोज सरासरी 35 रुपयांच्या पेक्षाही कमी आहे. देशातल्या बेरोजगारांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. सुशिक्षित बेरोजगारांनाही नोकऱ्या मिळत नाहीत. ही आकडेवारी लक्षात घेतल्यास, अंदाजे 30 कोटीच्यावर लोकांचे दररोजचे आणि वार्षिक उत्पन्न फारसे नाही. कुटुंबातल्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो.

Friday, February 03, 2012 AT 12:43 AM (IST)

अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारी यांनी निर्माण केलेल्या "झपाटलेला' या चित्रपटाचे संगीतकार अनिल मोहिले, हे झपाटलेले संगीतकार होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत पन्नास वर्षे ते टिकून तर राहिलेच, पण शास्त्रीय संगीतापासून ते नव्या प्रवाहातल्या संगीताच्या बाजाचेही संगीत नियोजन करायचे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते. वडिलांच्या तालमीत बालपणीच त्यांनी संगीताचे धडे घेतले. 1960 मध्ये यशवंत देव यांच्यामुळे ते मुंबई आकाशवाणीत दाखल झाले.

Wednesday, February 01, 2012 AT 11:38 PM (IST)

"या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार... नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार' असा आशावाद माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना असल्यानेच, ते साऱ्या देशभर शालेय, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतात. प्रत्यक्ष आणि इंटरनेटद्वारे त्यांचा बालक आणि युवकांशी संवाद सुरू आहे. या देशाचे भवितव्य उद्याचे हे नागरिकच घडवतील, देश जगात सर्वश्रेष्ठ पदाला पोहोचवतील, असा त्यांचा दुर्दम्य आशावाद आहे.

Wednesday, February 01, 2012 AT 12:53 AM (IST)

काही वर्षांपूर्वी आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केलेल्या "स्वदेश' या चित्रपटाचा नायक मोहन भार्गव, अमेरिकेतली शास्त्रज्ञाची नोकरी सोडून भारतात परत आल्याची कथा होती. भार्गवला मायभूमीची ओढ लागते. तो परत येतो आणि आपल्या गावच्या-विकासाच्या ध्येयानं झपाटतो. गावचा विकास कसा घडवतो, याचं चित्रण त्या चित्रपटात आहे. पण ती कथा काल्पनिक होती. आता मात्र बाळासाहेब दराडे यांनी आपल्या गावासाठी सुरू केलेल्या विकास कार्यांने ती सत्यकथा ठरली आहे.

Monday, January 30, 2012 AT 09:38 PM (IST)

प्रेजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने विविध क्षेत्रातल्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने गौरवल्या जाणाऱ्या गुणी कलाकार, लेखक, तंत्रज्ञ, संगीतकार, खेळाडू, गायकांची यादी जाहीर केली. त्यात तथाकथित "क्रिकेटचा भगवान' सचिन तेंडुलकरला "भारतरत्न' दिल्या जायच्या संभाव्य घोषणेचा समावेश झाला नाही. म्हणून लाखो क्रिकेट रसिकांनी हळहळ व्यक्त केली असेल.

Saturday, January 28, 2012 AT 12:33 AM (IST)

सरकार आणि प्रशासनातला भ्रष्टाचार प्रचंड वाढल्याची कबुली खुद्द पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी यापूर्वी अनेकदा दिली. भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन केल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही आणि त्यासाठीच आपलं सरकार भ्रष्टाचाराला पायबंद घालायसाठी वचनबध्द असल्याच्या घोषणाही त्यांनी अनेकदा केल्या. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांनी राजकारण आणि समाजकारण पूर्णपणे बदललं. भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला. गुंड, मवाली, गुन्हेगार राजरोसपणे सत्तेच्या राजकारणात घुसले.

Thursday, January 26, 2012 AT 01:20 AM (IST)

33 वर्षांपूर्वी देशभर गाजलेल्या "अमर, अकबर, अँथोनी', या हिंदी चित्रपटातले, "माय नेम ईज अँथोनी गोन्सालविस', हे गाणं लोकप्रिय झालं होतं. त्या गाण्याचा नायक काल्पनिक नव्हता.  आपल्या कर्तृत्वानं हिंदी चित्रपटसृष्टीत संगीताला नवं वळण, नवा बाज देणारा तो श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संगीत नियोजक होता. त्याचं नाव अँथोनी गोन्सालविस होतं. चित्रपटसृष्टीतलं अजात शत्रू व्यक्तिमत्व असा त्याचा लौकिक होता.

Wednesday, January 25, 2012 AT 11:55 AM (IST)

पाश्चात्य चंगळवादी संस्कृतीचे गुणगान करणाऱ्या, आपल्या मुलाबाळांवर तसेच संस्कार करणाऱ्या, भारतातल्या उच्चभ्रू पालकांच्या डोळ्यात नॉर्वेतल्या जंगली कायद्याच्या अंमलबजावणीने झणझणीत अंजन लागेल! गेल्या काही वर्षात देशातली एकत्र कुुटुंब पध्दती कालमानानुसार, बदलत्या प्रवाहानुसार हळूहळू लोप पावायला लागली.

Tuesday, January 24, 2012 AT 04:42 PM (IST)

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: