Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  दैनंदिन भविष्य
मेष
नातेवाईकांशी पटणार नाही. कामात शिथीलता येईल. मित्र मैत्रिणींच्या समवेत करमणुकीत वेळ जाईल. महिला : थकवा जाणवेल. घरातील वृध्दांची काळजी राहील. युवक : मनोबल कमी. भानगडीच्या व्यवहारापासून दूर रहाल.
वृषभ
पत्रव्यवहार करा. गाठीभेटी घ्या. प्रवास घडेल. मोठे आर्थिक लाभ होतील. महिला : भावंडे भेटतील. तीर्थयात्रेचे बेत आखाल. घरातील वृध्दांची काळजी घ्या. पोटदुखी जाणवेल. सहजीवन लाभेल. युवक : युक्तीने कामे करा. मनोबल चांगले.
मिथुन
कच्चा माल खरेदी कराल. पतीपत्नीत असामंजस्य राहील. धार्मिक कामात लक्ष घालाल. महिला : कौटुंबिक खर्चासाठी पैसा उपलब्ध होईल. धार्मिक कामात लक्ष घालाल. युवक : कुटुंबात गप्पागोष्टीचा आनंद घ्याल. शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करा.
कर्क
कामाचा वेग चांगला राहील. धंदा व्यवसाया-तील अडचणीचे निराकरण कराल. महिला : थकवा जाणवेल. कौटुंबिक समस्या जाणवेल. युवक : महत्वाकांक्षी रहाल. सादरीकरण चांगले. गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न कराल. कार्य- साफल्याचा आनंद मिळले.
सिंह
खर्च वाढेल. चिडचिड होईल. कामे रेंगाळतील. सर्दी, पडसे थकवा इ. त्रास. महिला : कामाचा कंटाळा कराल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. मंगलकार्यात सहभागी व्हाल. युवक : मनोबल कमी राहील. चांगली बातमी समजेल.
कन्या
आर्थिक लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील. महिला : मित्रमैत्रिणींच्या समवेत करमणुकीत वेळ जाईल. शारीरिक तक्रार राहील. युवक : चांगले अनुयायी भेटतील. शिक्षणाचा उपयोग अर्थार्जनासाठी होईल.
तूळ
मानसन्मान लाभेल. मनोबल चांगले. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. महिला : करिअर व घर प्रपंच दोन्ही सांभाळाल. पतीपत्नीत सहकार्य राहील. कुटुंबात अशांतता अनुभवाल. युवक : कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. विद्याव्यासंगी रहाल. विरंगुळा म्हणून जवळचा प्रवास घडेल.
वृश्चिक
वरिष्ठांची मर्जी सांंंभाळा. चांगली बातमी समजेल. धंद्यात आव्हानात्मक परिस्थिती. घरात समस्या असतील. महिला : भावंडांशी संपर्क होईल. कुटुंबात समस्या असतील. हौसमौज करू शकाल. युवक : कामाचे नियोजन करा. महत्वाकांक्षी रहाल. टीकेचे लक्ष्य बनाल. मनोबल चांगले राहील.
धनु
सर्दी पडसे जाणवेल. शाबासकीच्या अपेक्षेने खूप परिश्रम घ्याल. कामात व्यस्त रहाल. मनावरील दडपण कमी होईल. महिला : गृहसौख्य मात्र बिघडल्यासारखे होईल. थकवा येईल. धार्मिक वृत्ती राहील. युवक : मनोबल कमी राहील. रोमॅंटिक मूड बनेल. वडिलांचा सल्ला उपयुक्त राहील.
मकर
संबंधितांशी सल्लामसलत करून महत्वाचे निर्णय घ्या. महत्वाची फक्त कामे कराल. महिला : काही कामे इतरांच्यावर अवलंबून अशी असतील. गृहकृत्यदक्ष बनाल. युवक : विरंगुळा म्हणून जवळची ट्रीप काढा. मित्राकडून फसवणूक होणे शक्य.
कुंभ
नेहमीपेक्षा जास्त कष्ट घेतल्याने कामे होतील. मोबदला कमी मिळेल. युक्ती प्रयुक्तीने कामे कराल. महिला : कामे वाढतील. वाद टाळा. मंगल कार्यात सहभागी व्हाल. युवक : कायदेशीर बाबी सांभाळा. तुमच्या कामाचा प्रभाव स्त्री वर्गावर पडेल.
मीन
धार्मिक कामात लक्ष घालाल. कौटुंबिक खर्च होईल. वरिष्ठांच्या सूचना पाळा. दिवस तसा चांगला जाईल. महिला : संततीच्या सहवासाचा आनंद मिळेल. खर्च तोलून मापून करा. युवक : नैतिक आचरण चांगले ठेवा. मूड रोमॅंटिक बनेल. विपरीत बुध्दी होईल.
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: