|
|
|
|
|
|
|
एकदा काही बंगाली, पंजाबी लेखक स्वामी विवेकानंदांकडे त्यांचा उपदेश श्रवण करण्यासाठी आले. त्या वेळी पंजाबमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. स्वामीजींनी पंजाबी माणसाकडून दुष्काळासंबंधी सर्व माहिती करून घेतली. त्यानंतर दुष्काळ निवारण करण्यासाठी काय करता येईल, समाजसेवकांना तेथे जाऊन कसे कार्य येईल यासंबंधी तासभर चर्चा केली उपदेश ऐकण्यासाठी आलेल्या लोकांची वेळ जशी संपत आली तशी काही लोकांची अस्वस्थता वाढत गेली.
Saturday, March 13, 2010 AT 01:20 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका बाईच्या शेजारी दुसरी एक श्रीमंत बाई राहत होती. पैसा असल्याने ती श्रीमंत बाई नेहमी काही ना काही खरेदी करीत असे. गरीब बाईला या तिच्या श्रीमंतीचा फार हेवा वाटत असे. एकदा त्या श्रीमंत बाईने नवीन नक्षीच्या सोन्याच्या बांगड्या करवून घेतल्या. तिने सहज त्या शेजारच्या गरीब बाईला दाखवल्या. तिनेही "छान आहेत' असे म्हटले. पण मनात मात्र जळजळ सुरू झाली. आपणही अशाच बांगड्या बनवून घ्यायच्या व या शेजारणीला दाखवायच्या, असे तिने मनाशी ठरवले.
Thursday, March 11, 2010 AT 10:58 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका मोठ्या सरोवराकाठी एक काळवीट राहत असे. दुसऱ्या एका काळवीटाबरोबर झुंजत असता त्याच्या उजव्या डोळ्यास शिंग लागल्याने तो निकामी झाले होते. त्याला फक्त डाव्या डोळ्यानेच दिसे. त्यामुळे तो डोळा सरोवराकडे ठेवून डाव्या डोळ्याने आसपास लक्ष ठेवून ते सरोवराकाठी चरायचे. त्याच्या कल्पनेप्रमाणे सरोवराच्या बाजूने त्याच्यावर कोणी हल्ला करणार नव्हते. त्या डौलदार काळवीटाला पकडण्यासाठी एक शिकारी बरेच दिवस प्रयत्न करीत होता.
Wednesday, March 10, 2010 AT 09:58 PM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका जंगलात एक पारधी आपल्या बायको-मुलांसह राहत होता. एके दिवशी नेहमीसारखा सकाळी उठून शिकारीसाठी म्हणून निघाला तर त्याच्या एकुलत्या एक मुलाने त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट चालविला. पारध्याने त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण मुलगा ऐकायला तयार होईना. शेवटी त्याने मुलाला बायको जवळ दिले व पारधी शिकारीसाठी निघून गेला. इकडे मुलाने रडून रडून झोपडी डोक्यावर घेतली. त्याची आई तर अगदी वैतागून गेली.
Wednesday, March 10, 2010 AT 12:56 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका कासवाला आकाशातील चंद्र-तारे याबद्दल फार उत्सुकता होती. शिवाय आकाशातून ही पृथ्वी कशी दिसते हेही त्याला पाहायचे होते. शेवटी मनाचा हिय्या करून कासव एका गरुडाकडे गेले व म्हणाले, "गरुडदादा, तू मला आकाशातून जर एकदा फिरवून आणलेस तर मीही तुला पृथ्वीच्या पोटातील रत्नांच्या खाणी दाखवीन. गरुडाला कासवाचे म्हणणे पटले व लगेच त्याने कासवाला आपल्या बळकट पंजात घट्ट पकडून आकाशात उड्डाण केले. खूप उंचावरून पृथ्वीचे दर्शन घडविले. कासव अगदी खूष होऊन गेले.
Tuesday, March 09, 2010 AT 01:19 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एक कोंबडा व एक कुत्रा, दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. एकदा ते दोघे प्रवास करीत होते. प्रवासात रात्री झाडाच्या एखाद्या फांदीवर कोबंडा झोपत असे नि झाडाच्या बुंध्याशी कुत्रा झोपायचा. एकदा रात्र झाल्यावर दोघे झोपी गेले. पहाटे सवयीप्रमाणे कोंबड्याने बांग दिली. कोंबड्याचा आवाज ऐकून एक कोल्हा तेथे आला व कोंबड्याला म्हणाला, "अरे वा! किती दिवसांनी भेट होतेय आपली. मित्रा, तुला अगदी कडकडून मिठी माराविशी वाटतेय.
Monday, March 08, 2010 AT 01:09 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एकदा एक लांडगा काही तरी भक्ष्य मिळेल या आशेने एका गावात शिरला. एका घराच्या बागेतच एक मोठा कुत्रा साखळीने बांधलेला त्याला दिसला. लांडग्याला पाहून कुत्रा मोठ्या ऐटीने त्याला म्हणाला, "काय रे हे तुझं जिणं! उपाशीपोटी काही तरी खायला मिळेल का हे पहात वणवण करायची....काही नाही मिळालं, की पुन्हा गुहेत जाऊन निपचिप पडायचं! त्यापेक्षा माझं बघ! मी कसा खाऊन पिऊन धष्टपुष्ट आहे तो...' त्यावर लांडगा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं आहे.
Sunday, March 07, 2010 AT 02:24 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एकदा एक लांडगा काही तरी भक्ष्य मिळेल या आशेने एका गावात शिरला. एका घराच्या बागेतच एक मोठा कुत्रा साखळीने बांधलेला त्याला दिसला. लांडग्याला पाहून कुत्रा मोठ्या ऐटीने त्याला म्हणाला, "काय रे हे तुझं जिणं! उपाशीपोटी काही तरी खायला मिळेल का हे पहात वणवण करायची....काही नाही मिळालं, की पुन्हा गुहेत जाऊन निपचिप पडायचं! त्यापेक्षा माझं बघ! मी कसा खाऊन पिऊन धष्टपुष्ट आहे तो...' त्यावर लांडगा म्हणाला, "तू म्हणतोस ते खरं आहे.
Sunday, March 07, 2010 AT 01:52 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
एका बोरीच्या रानात एका म्हातारीने बरीच बोरे गोळा केली. ती एका लहान तोंडाच्या घागरीत ठेवून म्हातारी आणखी बोरे आणण्यासाठी पुन्हा इकडे तिकडे फिरू लागली. तिने घागरीत बोरे ठेवलेली एका माकडाने पाहिले होते. म्हातारी दूर गेलेली पाहून माकड हळूच घागरीजवळ गेले व त्याने बोरे पळविण्यासाठी घागरीत हात घातला. बचकभर बोरे हातात घेऊन ते पळणार होते पण हातात बोरे असल्याने त्या घागरीतून बोरांसकट त्याला हात बाहेर काढता येईना.
Saturday, March 06, 2010 AT 12:54 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
सैन्याच्या अग्रभागी रणशिंगे फुंकणारी काही माणसे असतात. त्यातल्या एकाला शत्रूकडील सैनिकांनी पकडून आपल्या सेनापतीकडे नेले. सेनापतीने त्यास कैदेत टाकण्याचा हुकूम दिला. त्यावर त्या शिंग फुंकणाऱ्याने गयावया करीत म्हटले, "महाराज, माझ्यावर दया कर.मी कोणालाही मारलेले नाही, कोणाला दुखापत केलेली नाही. इतकेच काय, मला शस्त्रदेखील चालवता येत नाही! केवळ हे शिंग फुंकण्यापलीकडे मला काहीच येत नाही. हे शिंग वाजवण्याबद्दल मला कैद करणे, हा माझ्यावर अन्याय आहे.
Friday, March 05, 2010 AT 01:01 AM (IST)
|
|
|
|
|
|
|